Link copied!
Sign in / Sign up
7
Shares

गरोदरपणात दात पिवळे होणे आणि दाढ दुखणे ह्यासंबंधी काही गोष्टी . . . .


गरोदरपणात दात पिवळे होणे किंवा दातांना पिवळसर थर येणे ही खूप गरोदर स्त्रियांना अनुभवास येत असलेली समस्या आहे. हार्मोन्स बदलामुळे शरीरात जसे बदल होतात तसेच त्याचा परिणाम दातांवर होत असतो. काही स्त्रियांची गरोदरपणात खूप दाढ दुखत असते. तर काही स्त्रियांच्या अचानक तोंडातून खूप वास यायला लागतो. आणि सामान्यतः ह्या समस्या सर्वच गरोदर स्त्रीला येत असतात म्हणून त्यात न्यूनगंड किंवा शरम वाटून घ्यायची नाही. आणि बऱ्याचदा ह्या समस्येवर डॉक्टरही बोलत नाहीत आणि स्त्रियाही त्यांना सांगत नाहीत. म्हणून ह्या ब्लॉगमधून / लेखामधून ह्याविषयीच्या शंका सोडविण्याचा प्रयत्न.

१) ह्या दिवसात गरोदर स्त्रीची झोप व्यवस्थित होत नाही तिला उलट्या येतात म्हणून ती दातांच्या स्वच्छतेकडे खूप मनापासून लक्ष देत नाही. तसा गरोदरपणात दातांची समस्या आल्यावर किंवा दाढ खूप दुखत असेल तर त्यावर उपचार करायला अडचण येत असते. म्हणून गरोदरपणात रोज सकाळी, दुपारी व रात्री हलके हलके ब्रश करत जा. जेणेकरून दात व दाढ संबंधी कोणतीच समस्या येणार नाही आणि येत असेल तर तिची तीव्रता कमी होईल. आणि ब्रश एका महिन्यात बदलला तरी चालेल. तसा ३ महिन्यात बदलायचा असतो

२) तुम्ही आहारातून किती प्रमाणात कॅल्शियम घेत आहात हेही बघून घ्या. आणि जास्तीस्त जास्त प्रमाणात कॅल्शियम घ्या कारण त्यामुळे दात मजबूत होतील आणि बाळाचेही दात मजबूत असतील. नाहीतर बाळाला दातांची समस्या येऊ शकते. म्हणून कॅल्शियम घेत चला. कारण बाळ आईच्या शरीरातूनच कॅल्शियम घेत असतो.

३) काही गरोदर स्त्रियांची दातांची वरची परत (एनेमिल) खराब होऊन जाते. त्यामुळे दात किडूही शकतात. आणि ह्याचे कारण हार्मोन्स बदल आणि कॅल्शियम ची कमी असते. त्यातच दाढ दुखणे आणि सुजून जाणे.

४) त्यासाठी रात्री जेवण झाल्यावर ब्रश करून गुळण्या करूनच झोपावे. जेणेकरून दातातल्या फटीत कण अडकणार नाही.

जेवण चांगले शिजवून घ्यावे. आणि कॅल्शियम असलेले पदार्थ व भाज्या जेवणात जास्त येऊ द्याव्यात.

५) दात आणखी मजबूत व आयुष्यभर चांगले टिकवण्यासाठी निंबचे दातन, आणि निंबाची साल पाण्यात भिजवून सकाळी उपाशी पोटी प्यावी. ह्यामुळे तुम्ही कधीच आजारी पडणार नाही.

६) जास्तच समस्या येत असेल तर दातांच्या डॉक्टरांना भेटून त्यांच्याकडून पेस्ट लिहून घ्या. व जर तोंडचा वास येत असेल तर माऊथ वॉशने गुळण्या करून घ्याव्या. ह्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होणार नाही. आणि ह्या समस्येतून बाहेर पडल्यावर तुम्हाला बरे वाटेल. व तुमचे दात मजबूत झाल्यावर तुम्हाला जे वाटेल ते खाऊ शकता. आणि बाळाचेही दात मजबूत असतील. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon