Link copied!
Sign in / Sign up
10
Shares

गर्भधारणेदरम्यान डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे


चॉकलेट प्रेमी मातांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गर्भवती असताना डार्क चॉकलेट खाणे फायदेशीर असल्याचे नुकतेच एका संशोधनातून सिध्द झाले आहे. गर्भवती महिलांनी डार्क कडसर चॉकलेट खाल्ल्याने बाळाची वाढ सुद्धा उत्तम होत असल्याचे दिसते. आज आपण या लेखातून हे चॉकलेट खाण्याचे नेमके काय फायदे आहेत ते बघू.

१) तणावमुक्तीसाठी उपयुक्त : गर्भवती असताना त्या महिलेच्या शरीरात अनेक शाररिक आणि मानसिक बदल होतात. यामुळे कदाचित ती महिला तणावाखाली असते. वा चीडचीडी होऊ शकते. डार्क चॉकलेट खाल्ल्याने हा तणाव काही क्षणात दूर होतो.

२) रोगप्रतिकारक शक्ती सुधारते : गर्भवती महिलांनी चॉकलेट खाल्ल्याने त्यांची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. चॉकलेट खाण्याचा हा फायदा मातेला गर्भाच्या वाढीलादेखील चांगला होतो.

३) हृदयासाठी सुरक्षित : डार्क चॉकलेटचे सेवन हे हृदयासाठी उपयुक्त असून त्यातील फ्लॅनोऑनड नावाचे अ‍ॅन्टीऑक्सिडंट असते. या अ‍ॅन्टीऑक्सिडंटमुळे हृदयाचे विकार दूर होतात आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

४) हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविते : बहुतेक गर्भवती महिलांना हिमोग्लोबिनची कमतरता असते. अशावेळी त्यांनी डार्क चॉकलेटचे सेवन केल्यास ही समस्या दूर होते. या चॉकलेटमध्ये असलेले मॅग्नेशियम आणि लोहाचे प्रमाण शरीरात हिमोग्लोबिन तयार करते.

५) कोलेस्ट्रॉल कमी : गर्भवती महिलेला जर कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यास त्याचा धोका बाळाला आणि आईला असतो. गर्भवती असताना चॉकलेट खाल्यास कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. डार्क चॉकलेटमध्ये साखरेचे चरबी वाढवणारे घटक खूपच कमी असतात. 

डार्क चॉकलेटच्या सेवनाने रक्तदाबाचा त्रास नियंत्रणात येतो. डार्क चॉकलेटमधील घटकांमुळे रक्तदाबचा समतोल राहतो. त्यामुळे आता गर्भवती महिलांनी बिनधास्त डार्क चॉकलेटचे सेवन करावे. गर्भवती महिलांनी त्यांच्या आहारात चॉकलेटचा समावेश करून तणावमुक्त रहा. हे खाण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याचे प्रमाण निश्चित करावे. कारण ऍलर्जी वैगरे असेल तर.

हॅपी प्रेग्नन्सी, आई !!!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon