Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

गरोदरपणात ब्रा घातल्याने अडचण येत असेल तर ….


गरोदरपणात हार्मोन बदलामुळे स्त्रियांच्या स्तनात सुद्धा खूप बदल होत असतात. आणि ती खूप मोठी होऊन जातात. आणि त्यात कमी जास्त पणा सुद्धा येऊन जातो. त्यामुळे त्या स्त्रियांना खूपच अवघडलेल्या सारखे होऊन जाते. आणि ह्यात काही स्त्रियांना खूपच समस्या येते. त्याचे कारण फक्त हार्मोन्स आहे. म्हणून ह्याबाबत खूपच कमीपणा वाटून घेऊ नका. गरोदरपण हे जेवढे सुख घेऊन येते तितकेच काही समस्या सुद्धा घेऊन येत असते. तेव्हा हे सामान्य आहे ही समजूत स्वतःला द्या आणि इतर स्त्रियांना सुद्धा द्या. आणि शरीरात जेही बदल होत असतील त्याबाबत स्थिर राहा. ते काही कालावधीनंतर निघून जात असतात.

१) ह्या वेळी तुम्ही तुम्हाला घट्ट आधार देणारी आणि व्यवस्थित बसणारी ब्रा परिधान करा. तुमच्या ब्रामुळे तुमच्या स्तनाग्रांना काही त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या. कृत्रिम धाग्यांच्या ब्राऐवजी सुती ब्रा वापरा, कारण त्या अधिक आरामदायी असतात. पण ह्यामध्ये खूप तंग ब्रा घालू नका. तुम्हाला आरामदायक वाटणार नाही.

२) ह्या ब्रा मध्ये तुम्हाला सोयीस्कर वाटत नसेल तर मॅटर्निटी ब्रा वापरून बघा त्या अधिक आधार देतात. अशा ब्रामध्ये साधारणपणे अधिकचे हुक असतात, जेणेकरून तुम्हाला तुमच्या शरीरातील बदलानुसार त्याचे आकारमान बदला येते. आराम आणि अधिकचा आधार यामुळे झोपताना स्त्रिया मोठ्या प्रमाणात मॅटर्निटी ब्रांना प्राधान्य देतात.

३) तुमच्या स्तनांमधून स्राव होत असेल तर विल्हेवाट लावता येण्याजोगे किंवा धुण्याजोगे ब्रेस्ट पॅड हा चांगला पर्याय असतो. अधिक चांगला वापर होण्यासाठी, काही वेळा दररोज आंघोळीपूर्वी आणि नंतर तुमचे स्तन हवेत सुकवा.

४) शेवटचे पण कमी महत्त्वाचे नाही; तुमचे स्तनाग्रे आणि स्तनाग्रांभोवतीच्या गडद भागावर साबण लावणे टाळा कारण साबणामुळे त्वचा कोरडी पडण्याची शक्यता असते.

५) ह्यावेळी रात्री जर तुम्हाला अवघडलेपण जास्त वाटत असेल तर ब्रा काढून घ्यावा. काहीवेळा पोटावर दबाव असल्याने छाती दुखायला लागते. म्हणून अशावेळी ब्रा काढून घेणे सोयीस्कर ठरते. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon