Link copied!
Sign in / Sign up
17
Shares

गरोदरपणात बटाटा खाणे सुरक्षित आहे का?


गरोदरपणा हा एका स्त्रीच्या आयुष्यातील सर्वाधिक महत्त्वाचा काळ असतो आणि तेव्हाच ती शारीरिक, भावनिक आणि मानसिकदृष्ट्या सर्वाधिक असुरक्षित असते. प्रत्येक निर्णय घेताना तिला ते तिच्यासाठी आणि तिच्या बाळासाठी सुरक्षित आहे ना; याची खात्री करावी लागते. जेव्हा आहाराचा प्रश्न येतो, तेव्हा काय खावे याबाबत इतकी मतांतरे असतात की, ती गोंधळात पडून जाते! यातीलच एक वादग्रस्त मुद्दा म्हणजे गरोदरपणात बटाटा खाणे.

बटाटा हा अनेक घरांमध्ये मुख्य पदार्थ असतो आणि तो वेगवेगळ्या भाज्या आणि आमट्यांमध्ये वापरला जातो. बटाट्यांमध्ये भरपूर पोषक द्रव्ये असतात आणि गर्भारपणात बटाट्यांचे योग्य प्रमाणात सेवन हे आरोग्यदायी असते. गर्भासाठी ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत हा ग्लुकोज असतो, जो कर्बोदकांमधे आढळतो. बटाटे हे भरपूर कर्बोदकेयुक्त असतात आणि कर्बोदकांच्या दिवसातून तीन ते चार मात्रा या गरोदरपणात सुरक्षित मानल्या जातात. बटाट्यांबरोबरच कर्बोदकांचे बाकी स्त्रोत म्हणजे भात, ब्रेड, बाकी धान्ये आणि त्यांचे पदार्थ.

तुम्ही गरोदर असताना बटाट्यांमुळे तुम्हाला हे फायदे होतात:

१. न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स' रोखते

बटाटे हे फॉलिक ऍसिडने परिपूर्ण असतात, जे गर्भविषयक चेतासंस्थेच्या विकासात मदत करते. त्यायोगे ते पाठीचा कणा आणि मेंदूविषयक संभाव्य धोके कमी करते. फोलेटने परिपूर्ण असलेले पदार्थ हे गर्भारपणाच्या अगोदरच्या टप्प्यांतील गर्भपात रोखू शकते.

२. जठरातील ॲसिडिटी कमी करते

जे पचनाच्या समस्यांनी ग्रस्त आहेत; त्यांना बटाटे भरपूर फायदेशीर ठरतात. योग्य शिजवलेले ताजे बटाटे हे जठरातील ॲसिडिटी कमी करण्यात भरपूर मदत करतात.

३. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

 भाजलेले बटाटे हे व्हिटॅमिन 'सी' चे मोठे स्त्रोत असतात, जे जखम भरून काढण्यात आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यात मदत करते. तसेच ते वेगवेगळ्या पदार्थांतून लोह शोषून घेण्याची शरीराची क्षमताही सुधारते.

४. हृदयविकाराचा धोका कमी करते

बटाट्यांच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम आढळते, जे उच्च रक्तदाब आणि हृदयाचा झटका होण्याची शक्यता कमी करते. सामान्यतः सालीसकट भाजलेले बटाटे हे एकावेळी ९६२ मिलिग्रॅम पोटॅशिअम पुरवू शकतात.

५. गर्भाच्या विकासात मदत करते

 बटाटे हे विटामिन ए, विटामिन सी आणि मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम आणि पोटॅशियम यांसारख्या खनिजांचे उत्तम स्रोत आहेत आणि ते गर्भाच्या वाढीत आणि विकासात भरपूर मदत करतात.

६. कोलेस्टेरॉलचा सामना करते

 बटाट्यांमध्ये विटामिन सी आणि विद्राव्य तंतुमय पदार्थ असतात, जे कोलेस्टेरॉलचा सामना करण्यास मदत करतात.

गरोदरपणात बटाटे खाण्यामुळे होणारे काही संभाव्य धोके पुढीलप्रमाणे आहेत:

१.  जठर आणि आतड्यांविषयक समस्या

हिरव्या बटाट्यांमध्ये ग्लायको अल्कलॉइड्स, अल्फा काकोनीन आणि अल्फा सोलानीन यांसारखी संयुगे असतात, जी अतिसेवन केल्यास विषारी ठरतात आणि त्यामुळे उलटी आणि हगवण होऊ शकते, जे गर्भाच्या विकासावर परिणाम करते.

२. गर्भधारणाविषयक मधुमेह

आठवड्यांतील पुष्कळ दिवस बटाटे किंवा चिप्स खाल्ल्यामुळे प्रसूतीकाळात गर्भधारणाविषयक मधुमेह होऊ शकतो. बटाट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पिष्ट असते, जे शरीराकडून जलद गतीने शोषले जाते आणि ग्लुकोज चयापचयावर परिणाम करते. पुष्कळ अभ्यासांनुसार बटाट्यांचे सेवन हे प्लाझ्मा ग्लुकोजचे प्रमाण आणि मेलिटस: टाईप- २ मधुमेहाचा धोका वाढवते. ज्यांना गर्भधारणाविषयक मधुमेह आहे, अशांची बाळे सामान्य बाळांपेक्षा मोठी असतात आणि त्यांना कमी रक्तदाब, श्वसनात अडथळा आणि प्रसूतीनंतर मृत्यूचा धोका असे विकार असतात. योग्य प्रमाणात बटाटे खाणे आणि बाकी कर्बोदकेयुक्त पदार्थांचे त्याजागी सेवन करणे, हे खरोखर गर्भधारणाविषयक मधुमेहाचा धोका कमी करते.

३. जन्मताना विकृती असण्याचा धोका

खूप जास्त हिरवे बटाटे खाण्याने जन्मतानाच काही विकृती होऊ शकतात; जसे की- अनेन्सफॅली आणि स्पायना बीफिडा.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon