Link copied!
Sign in / Sign up
8
Shares

गरोदरपणात तुमच्या लग्नाच्या नात्यातील होणारा बदल !

गरोदरपणा हा तुमच्या विवाहाचा एक असा टप्पा असतो, जो चांगलाही असतो आणि थोडा वेदनादायकही. हा एक असा सुंदर टप्पा आहे, जो तुम्हा दोघांना एकत्र तर आणतोच; पण तसेच तो तुमच्यात अनेक गैरसमजुती निर्माण करतो. यातील काही विवाद तर फक्त लहरीपणा आणि अस्वस्थतेच्या सामान्य स्थितीमुळे होतात. बहुतांशी वेळा दोन्ही जोडीदार आपण का भांडतोय, यावर उपाय शोधण्याची तसदी घेत नाहीत. ह्यावेळी अश्रू, रात्री-बेरात्री उठणे, आणि दवाखान्यात जाणे ह्यामध्ये तुम्ही दोन्ही असतात. आणि त्यावेळी नात्यात कसा बदल होत असतो त्याविषयी हा ब्लॉग. 

१) तुमच्या पतीमध्ये वगळले जायची भावना येईल 

जेव्हा एक स्त्री गरोदर असते; तेव्हा सगळ्यांचे लक्ष तिच्यावर आणि तिच्या स्थितीवर केंद्रित झालेले असते. हितचिंतकांच्या सगळ्या भेटवस्तू या आई अथवा बाळासाठी असतात. कधीकधी पित्याचेही अभिनंदन केले जाते; पण फुले, प्रसूतिकालीन कपडे आणि फळे हे सर्व आईसाठीच असते. याचे कारण म्हणजे शिशुची वाढ आईच्या शरीरात होत असते आणि तिच्यात त्यावेळी असंख्य नाट्यमय बदल घडत असतात. फक्त तिचे स्तन आणि पोटच विस्तारतात असे नव्हे; तर तिच्या उर्वरित शरीराचा ही विस्तार होतो. म्हणून ह्यावेळी सर्वजण तिच्या सोबत असतात. म्हणून पतीने ह्याबाबत खूप नम्र होऊन तिला साथ द्यावी. 

 २) पतीबरोबरचे तुमचे नाते अधिकाधिक घट्ट होत जाते

जसजशी तुमची प्रसूतीची वेळ जवळ येत जाते, तसतसे तुमच्यातील नाते अधिकाधिक मजबूत आणि घट्ट होत जाते. तुमच्यात अधिकाधिक अर्थपूर्ण संभाषणे होऊ लागतील आणि तुम्ही एक दुसऱ्यांना चांगल्या प्रकारे समजू लागाल. तुमच्यातील कधीकधी निर्माण झालेली शांतता एका अपानवायू किंवा ढेकरने भंग पावते आणि तुम्ही यावर मनसोक्त हसता. हे तुम्हाला लक्षात आणून देते की शेवटी तुम्ही एक माणूसच आहात आणि प्रत्येक गोष्टीचा ताण घ्यायचे काहीच कारण नाहीय! आपण सर्व चुका करतो आणि त्यातूनच शिकतो. 

३) वेगळया प्रकारची संभाषणे 

जेव्हा तुमच्या पोटात तुमच्या पतीचा अंश वाढत असतो, तेव्हा तुमच्या पतीबरोबरच्या संभाषणांमध्येही नाट्यमय बदल होत जातो. तुमचे बोलणे बाळाभोवती घुमत राहील आणि किती पैसा खर्च केला पाहिजे, बाळासाठी तुमच्याकडे पुरेसा पैसा आहे ना; अशा भरपूर विषयांवर तुम्ही बोलाल. या संभाषणांचे वादात रुपांतर होऊ शकते; म्हणून तुम्ही नेहमी आशावादी बोलले पाहिजे. तुमच्या संभाषणांतून काहीच निष्कर्ष निघत नसेल, तर लगेच ते थांबवा. निरर्थकपणातून नाराज होण्यात काहीच अर्थ नाही. फक्त एक हलका विनोद करा आणि चर्चेचा विषय बदला. गरोदरपणाचा संबंध नसेल अशा विषयांवर बोलायचा प्रयत्न करा; उदा. राजकारण, जागतिक घडामोडी, कामाचे स्वरूप आणि तुमच्या नातेवाईकांबद्दल सुद्धा! हे तुम्हा दोघांना ताण हलका करायला आणि तुमच्यातील नाते घट्ट करायला मदत करेल.

तुमच्यातील भांडणे होतील 

अगोदरच उल्लेख केल्याप्रमाणे, तुम्हाला आवडो वा ना आवडो; तुमच्यात असंख्य भांडणे होतील. हे घडणे वाईटच ठरावे, असे काही नाही. तुमची बलस्थाने आणि त्रूटी जाणून घेणे फायद्याचे असते. तुमच्या नात्यांमध्ये कोणत्या उणिवा आहेत आणि नात्यातील कोणता भाग गोड आणि छान आहे, हे तुम्हाला कळून येईल. जेव्हा तुमच्यात भांडण भडकण्याची चिन्हे दिसतील, तेव्हा फक्त त्यांपासून बाजूला होऊन विचार करा- हे भांडण खरेच गरजेचे आहे का? तुमचा पती योग्य बोलतोय का? तुम्ही दोघे यावर काही मार्ग काढू शकता का? एक दीर्घ श्वास घ्या आणि आणि यावर तुमच्या पतीसोबत चर्चा करा. तुमच्यातील मतभेदांवर शांतपणे बोलणे हा एका निर्णयाप्रत येण्यासाठी चांगला उपाय आहे- भांडणातून कोणताच मार्ग निघत नसतो.

तुम्हाला जास्त बाहेर फिरता येणार नाही

जेव्हा तुम्ही गरोदर असता; तेव्हा तुम्हाला दररोज किंवा वेळ आल्यास आठवड्यातून एकदासुद्धा बाहेर फिरणे शक्य होणार नाही. तुम्ही एकत्र किराणा दुकानात किंवा अल्पोपहार करण्यासाठी बाहेर जाऊ शकता पण तेवढ्यापुरतेच! पण तरी तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत बाहेर फिरायची आणि बाहेरचे जग अनुभवण्याची संधी मिळते. तुम्हाला कसे वाटत आहे, तुमच्या जोडीदाराला कसे वाटत आहे आणि कामाचे स्वरूप यांवर बोला आणि तुम्ही विचार केलात त्यापेक्षा जास्त समान गोष्टी तुमच्या दोघांमध्ये आहेत, हे पाहण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पालकांसाठी बाळंतपणाचा काळ कठीण असतो, म्हणून तुमच्या पतीशी नियमितपणे बोलणे आणि त्याच्या भावनांबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon