Link copied!
Sign in / Sign up
36
Shares

गरोदरपणात पहिल्या त्रैमासिकात समागम करता येते का ?

 

तुमची गरोदरपणाची टेस्ट पॉजिटीव्ह आल्यावर तुम्ही गरोदर आहात. असे तुम्हाला व पतीलाही समजून जाते. मग त्यानंतर तुमच्यापुढे एक शंका उपस्थित राहते. आणि ती तुम्ही खुलेपणाने बोलत नाहीत. तसे ह्याबाबत कुणीच बोलत नाहीच. ती गोष्ट म्हणजे गरोदरपणाच्या पहिल्या त्रैमासिकात समागम (सेक्स) करता येईल का? कारण ह्याविषयी कुणी बोलत नाही त्यामुळे ह्या गोष्टीबद्धल जास्त माहिती मिळत नाही. पण आमच्याकडे बऱ्याच स्त्रियांनी शंका व्यक्त केली की, ह्याविषयी माहिती द्या जेणेकरून ह्याविषयी असलेल्या चुकीच्या समजुती दूर होतील.

१) ह्या दिवसात समागम करणे धोकादायक नसते. आणि तुम्ही करू शकतात. पण त्यासाठी कोणत्या गोष्टी आहेत त्या तुम्ही अगोदर बघून घ्याव्यात. त्याचबरोबर ह्या दिवसातला अनुभव प्रत्येक स्त्रीचा वेगवेगळा असतो. कारण काही स्त्रियांना ह्या दिवसात समागम करणे सुरक्षित आणि आनंददायक वाटतो. ह्याचे कारण भिन्न - भिन्न आहेत जसे की, गरोदरपणानंतर पेल्विकच्या भागात रक्ताचा प्रवाह वाढून जातो. आणि त्यामुळे शरीर रोमांचित आणि उत्साहित होऊन जाते. ह्याच उलट काही स्त्रियांना ह्या दिवसातले समागम त्रासदायक आणि अस्वस्थ वाटत असते.

२) काही जोडीदारांना ह्यावेळी असलेले गर्भनिरोधकाची चिंता नसल्याने अधिक मुक्त वाटू शकते. ह्या दिवसात स्त्रियांची स्तन खुप सवेंदनशील होऊन जातात. त्यांना स्पर्श केल्यावर त्रासही होतो. कारण हार्मोन्स सुद्धा बदलत असल्याने तुम्हाला कदाचित समागम मध्ये तितका इंट्रेस वाटत नाही. म्हणजे स्त्री परत्वे अनुभव वेगवेगळा असेल.

३) ह्यावेळेस पोटात दुखूही शकते. पण त्याची शक्यता कमी असते. आणि काही स्त्रियांना समागम झाल्यावर खूप अस्वस्थही वाटू शकते. आणि असेही वाटू लागते की, आता ही गोष्ट करायची नाही.

ह्या समागमाने माझ्या बाळाला काही धोका पोहोचू शकतो का ?

४) ह्याबद्दल कधीच शंका बाळगू नका की, समागमाने बाळाला काही हानी होईल. कारण बाळाच्या सुरक्षासाठी ऍम्नीऑटिक द्रवाचे कवच असते. त्यामुळे बाळाला काहीच धक्का पोहोचत नाही. तशी रचना निसर्गाने करून ठेवली आहे. काहींना गर्भपात होईल का ? अशीही भीती वाटते पण तसे काही होत नाही.

मला ह्या दिवसांमध्ये समागम करण्याची इच्छा का होत नाही

५) अशा खूप स्त्रियांना वाटत असते कारण उलट्या, मळमळ सारखे वाटत असल्याने खाण्याचीच इच्छा होत नाही. स्तन खूप दुखत असल्याने, वारंवार लघवीला जायचे वाटत असल्याने आणि हार्मोन्समुळे इच्छा मरू शकते.

कोणत्यावेळी समागम करणे धोकादायक असते ?

६) १. गर्भपात झालेला असेल किंवा गर्भपात होऊ शकतो अशी स्थिती असेल

२. काही कारण नसताना योनीतुन रक्तस्त्राव येत असेल

३. पोटात खूप दुखत असेल किंवा लचक

४. प्लॅसेंटा संबंधित काही समस्या असेल

५. गर्भात जुळे असतील

७) ह्या दिवसांमध्ये जोडीदारानेही खूप समजून घ्यावे एकदम, करायचे आहे अशी रट लावू नये. तर काही समस्या असेल काही दुखत असेल समजून घ्यावे. कारण बऱ्याचवेळा इच्छा नसताना किंवा त्रास होतोय तरीही करावे लागत असेल तर ते बाळासाठी व तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी हानिकारक होईल. म्हणून प्रेमाने समजून घ्या सर्व गोष्टी प्रेमाने घेतल्या तर सर्व सुरळीत होते. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon