Link copied!
Sign in / Sign up
42
Shares

गर्भावस्थेत शरीरसंबंध ठेवण्याबाबतच्या काही चुकीच्या धारणा आणि वास्तव

तुम्ही गर्भवती आहात आणि या अवस्थेत जोडीदारासोबत  शरीरसंबंधाबद्दल अनेक प्रश्न तुमच्या मनात आहेत तर तुमच्या सर्व चिंता हा लेख वाचून मिटतील. खरे तर गर्भावस्थेत समागम आणि रोमान्सचा एक वेगळाच आनंद असतो आणि याचा अनुभव अनेक जोडपी या पूर्ण काळात घेतात. तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर तुम्हालाही यात कोणतीही अडचण वाटत नाही पण पोटातील बाळाचा वाढता आकार आणि अगदीच काही निरर्थक, क्षुल्लक चिंता तुमच्या मनात असू शकतात. खरोखर काळजी करण्यासारख्या गोष्टी कोणत्या आहेत चला जाणून घेऊ.

१) गर्भावस्थेत शरीसंबंध ठेवणे सुरक्षित आहे का?

बहुतेक महिलांची गर्भावस्था सामान्य म्हणजेच कोणतीही गुंतागुंत नसणारी असते आणि अगदी नवव्या महिन्यापर्यंतही शरीरसंबंधात काही त्रास जाणवत नाही. पण काही महिलांना संपूर्ण गर्भावस्थेत किंवा काही दिवसांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्या नुसार समागम पासून दूर रहावे लागू शकते.परंतु या दरम्यान समागम करताना अत्यंत काळजी पूर्वक गोष्टी करणे अपेक्षित असते. तरीही तुमच्या गर्भवस्थ्येनुसार  तुम्हाला काही समस्या किंवा त्रास होईल अशी शंका वाटत असेल तर तुमच्या डॉक्टरांना नक्की भेटा.

२) गर्भातील बाळाला शरीरसंबंधांमुळे इजा पोहचते का?

गर्भस्थ बाळाला शरीरसंबंधांमुळे काहीही इजा पोहचत नाही. गर्भपिशवीचे मजबूत स्नायू आणि  तिच्यात असणाऱ्या अम्नीऑटिक सॅक बाळाला सुरक्षित ठेवतात  तसेच गर्भशयाच्या आसपास असणारा घट्ट द्रव गर्भाशयाच्या मुखाला बंद आवळून ठेवतो आणि संक्रमणापासून बाळाचा बचाव होतो. तरीही या काळात समागम करताना पोटावर अति दाब येईल किंवा काही इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. 

३) शरीरसंबंधांमुळे प्रसववेदना होऊ शकतात का?

तुमची गर्भावस्था कमी त्रासाची आणि सामान्य असेल तर निश्चित: रहा. लैंगिक उत्तेजनामुळे गर्भपात किंवा प्रसववेदना सूरु होत नाहीत. पण स्तनाग्रांची उत्तेजना आणि संभोगादरम्यान परमोच्च बिंदूची अवस्था यामुळे गर्भाशयाचे हलकेसे आकुंचन होते आणि हे बहुदा कमी व विना त्रासाचे असते.

४) शरीरसंबंध हा गर्भावस्थेत वेगळा अनुभव ठरतो का?

तुमच्या ओटीपोटाच्या भागाकडे होणारा जास्तीच्या रक्तप्रवाहामुळें जननेंद्रियांच्या वाहिन्यांत रक्त साठते आणि  वाढलेल्या संवेदनशीलतेमुळे समागमातील आनंद द्विगुणित होतो. योनिमार्गाद्वारे होणाऱ्या स्राव आणि ओलसरपणा यामुळे ही हा फरक जास्त जाणवतो. गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांत स्पर्श झाल्यास स्तनांची अति संवेदनशीलता आणि चुरचुरण्याचा अनुभव येतो पण हळूहळू हे कमी होत जाते. बऱ्याच स्त्रियांना गर्भावस्थेतील शरीरसंबंधांचा अनुभव अवघडलेपणाचा तर काही जणींसाठी हा अतिशय आनंददायक तर शारीरिक बदलांमुळे काही जणींसाठी तितकासा सुखद नसतो.

५) तुमच्या गर्भावस्थेचा तुमच्या जोडीदाराच्या लैंगिक इच्छाशक्तीवर परिणाम होतो का?

काही पुरुषांना गर्भवती असणारी पत्नी जास्तच आकर्षक वाटते. तरीही तुमच्या गर्भावस्थेच्या काळात जोडीदाराची लैंगिक इच्छा कमी होण्याची काही वेगळी कारणे असू शकतात. कदाचित येऊ घातलेल्या पितृत्वाच्या जबाबदारीच्या धास्तीने त्याची शरीर संबंधांची इच्छा कमी होऊ शकते. आणखी दुसरे कारण म्हणजे संबंधा दरम्यान बाळाला काही इजा तर होणार नाही ना? याचीही काळजी त्याला लागून राहिलेली असते. तुमच्या जोडीदाराला धीर द्या आणि शरीरसंबंधांचा आनंद पूर्णपणे घेण्यास मदत करा. ज्या कुणाला या संबंधी माहिती नसेल त्यांना हा लेख शेअर करा.

महत्वाचे- गरोदरपणात समागम कितीही सुरक्षित असले तरी प्रत्येक स्त्रीची गर्भावस्था, शाररिक परिस्थिती, सहनशीलता निरनिराळी असते, त्यामुळे याबाबत डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा . 

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon