Link copied!
Sign in / Sign up
384
Shares

गरोदरपणात बाळाची वाढ अशी होते

गरोदरपणापासून बाळाची वाढ कशी होते ? ही गोष्ट प्रत्येक आईला माहिती करायला आवडते. लग्न झाल्यावर कुटुंबाला नव्या जीवाचे वेध लागते. आम्हाला बऱ्याच आईणीं सांगितले की, “बाळाच्या गरोदरपणापासूनचे सर्व टप्पे जसे की, त्याची वाढ कशाप्रकारे होते. आणि कोणत्या अवस्थांमधून एक स्त्रीला जावे लागते.” आणि ही गोष्ट खरीच आहे की, प्रेग्नेंसी ते डिलिव्हरी हा टप्पा कुणासाठीही ९ महिने वाटत असेल पण ह्यामध्ये स्त्री ही खूप अशा हास्याच्या, दुःखाच्या, आनंदाच्या आणि वेदनेच्या अवस्थेतून जाते. कधी - कधी ती खूप चिडून जाते आणि म्हणते की, “ बाळाला जन्माला घालणे म्हणजे वेदनाच झेलणे, पण कधी - कधी तिला पोटातल्या बाळाची लात खायला मिळणे म्हणजे तिच्यासाठी अत्त्युच्च आनंद असतो. गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यापासून खाण्याच्या बाबतची पथ्ये, त्याचबरोबर स्वतःला घरीच कैद करून घेणे, रात्री एका कुशीतून त्या कुशीत विसावाने तरीही झोप येण्याची वाट पाहणे आणि सकाळी उठून उलट्या आणि मळमळ. आणि दर महिन्याला वाढणारे बाळाचे वजन त्यामुळे पाठीवर पडणारा ताण. ह्या सर्व अवस्थेतून जाऊन डिलिव्हरीच्या वेळी खूप वेदनांचा त्रास झेलल्यावर बाळाचा किंचितसा चेहरा पाहिल्यावर सर्व मागच्या वेदना व त्रास विसरून, ती आई आनंदाची अनुभूती घेत असते. तो आनंद तिच्यासाठी किती अवर्णीय असतो ते फक्त तिलाच ठाऊक असते. ते तिच्या नवऱ्याला आणि कुटुंबाला माहिती नसते.

गर्भवती स्त्रीला काय काळजी घ्यावी लागते ?

प्रत्येक गर्भवती स्त्रीने आपले हिमोग्लोबीन दर तीन महिन्यांनी तपासणे आवश्यक आहे. आणि तपासून घ्यायलाच हवे. हिमोग्लोबीन हे नेहमीकरिता 11 ग्रॅमच्यावर असणे गरजेचे असते. लघवीमध्ये प्रोटीन अल्बोमीन बघण्याकरिता लघवीची तपासणी करून अल्बोमीन लघवीमध्ये आहे का हे तपासून घेणे गरजेचे असते. लघवीमध्ये अल्बोमीनचे प्रमाण जास्त असल्यास गरोदरमातेच्या पायावर, अंगावर सूज येण्याची शक्यता असते. प्रत्येक मातेने आपले रक्तदाब तपासून घ्यावे, रक्तदाब 120/80 असावा. प्रत्येक मातेने बाळाच्या हालचालीकडे लक्ष ठेवावे. बाळाची हालचाल 18 आठवड्यानंतर मातेला माहिती पडते, तरी मातेने पाच महिन्यानंतर बाळाची हालचाल बघावी. जर बाळाची हालचाल होत नसल्यास गर्भाशयातच बाळ मृत होण्याची शक्यता असते. अशी स्थिती उद्‌भवल्यास तत्काळ जवळच्या वैद्यकीय अधिकाऱ्याना दाखवावे किंवा सोनोग्राफी करुन घ्यावी. गरोदरपणात तीन ते पाचवेळा तपासणी करावी. पहिली तपासणी तिसऱ्या महिन्यात, दुसरी तपासणी 18-20 आठवड्यात तिसरी तपासणी सातव्या ते आठव्या महिन्यात आणि पुढे दर महिन्यांनी किंवा 15 दिवसांनी करावी.

गरोदरपणात आईचा आहार असा असावा 

*  गरोदरपणात मातेचे वजन 8 ते 12 किलोग्रॅमने वाढलेले असावे, यासाठी प्रत्येक मातेने आपल्या वजनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. गरोदरपणात प्रत्येक मातेला 400 किलोग्रॅम कॅलरी आहार जास्त घेणे गरजेचे आहे. प्रथिने 23 ग्रॅम जास्तीचे घेणे आवश्यक आहे. प्रथिने हे तुरीची दाळ, दुध, अंडी व मोड आलेली धान्ये यामध्ये जास्त असते. यासाठी मातेने हे प्रमाण जेवणामध्ये घेणे गरजेचे आहे.

*  पहिल्या चार महिन्यात आणि शेवटच्या आठव्या महिन्यानंतर मातेने वजन उचलणे व वाकण्याचे काम करु नये. यामुळे गर्भपात होण्याची शक्यता असते. तसेच पूर्ण दिवस होण्यापूर्वी प्रसुती होण्याची शक्यता असते. परिणामी बाळाचे फुफ्फुस परिपक्व होत नाही. सुखरुप प्रसुतीसाठी जवळच्या रुग्णालयात प्रसुती करावी. प्रसुतीनंतर बाळ 1 ते 5 मिनिटात रडणे जरुरीचे आहे. बाळ जर तत्काळ रडले तर मेंदू आणि शरीराची वाढ योग्य प्रमाणात होते. बाळंतपणानंतर 30 मिनिटांनी बाळाला दूध द्यावे. बाळाला दोन ते तीन तासाने मातेचे दूध देण्यात यावे. पहिल्या सहा महिन्यात रोज 730 मिली दूध मातेकडून बाळाला मिळते. पहिल्या 24 तासात इंजेक्शन व्हिटॅमिन के, बीसीजी, हिपॅटाइझीस बी, पोलिओ याप्रकारे इंजेक्शन आणि लसी मातेने आपल्या बाळास नर्स किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याला सांगून देण्यासाठी बाध्य करावे.

*  सहा महिन्यापर्यंत बाळाला फक्त आईचे दूध द्यावे. बाळाला पाणी देवू नये सात ते अकरा महिन्यापर्यंत बाळाला पातळ द्रव्य द्यावे. बाराव्या महिन्यापासून बाळाला पूर्ण आहार देता येतो. प्रथम 48 तासात कॉपर टी लावून घेतल्यास पाळणा लांबतो. माता आणि बाळाचे आरोग्य चांगले राहते. मातेचा मृत्यूदर कमी होतो. बाळ कुपोषित होत नाही. त्यामुळे बालमृत्यू दर कमी होईल. यासाठी समाजातील नागरीकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरोदर मातेला प्रवृत्त करावे.

* कुपोषित बालके जन्माला येणार नाहीत, तसेच बाळ सुदृढ राहिल, नातेवाईकांनीही त्यावर योग्य लक्ष ठेवावे, गरोदर स्त्रियांनी गरोदरपण आणि प्रसुतीनंतर वरीलप्रमाणे काळजी घ्यावी.

* गर्भधारणा झाली आहे हे कळल्यापासूनच तुमच्यामध्ये वाढत असलेल्या जीवाची तुम्हाला जाणीव होण्यास सुरवात होते. केवळ तुम्हालाच या बाळाची वाढ आणि त्याची प्रत्येक हालचाल कळणार आहे ही जाणीव अदभूत असते. नाही का? तुमच्या बाळाची या ९ महिन्यांत अगदी पहिल्यापासून पूर्ण वाढ कशी होते हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असालच. मातेचे पोषण, गर्भारकाळातील मातेचे आजार, मानसिक ताण, मातेचे आरोग्य, यांचा बाळाच्या वाढीवर परिणाम होत असतो. प्रसूती ही टप्प्याटप्प्याने होणारी क्रिया आहे.

https://www.tinystep.in/blog/janmanusar-balche-bhavishya

अधिक माहितीसाठी ह्यावर जाऊ शकता. 

 गर्भावस्थेतल्या बाळाच्या वाढीचे टप्पे आणि त्याची प्रत्येक महिन्यातील वाढ

गरोदरपणाचे टप्पे

१) गर्भधारणा

२) प्रेग्नेंसीचा पहिला महिना

३) गरोदरपणाचा दुसरा महिना

४) तिसरा महिना

५) चौथा महिना

६) पाचवा महिना

७) सहावा महिना

८) सातवा महिना

९) आठवा महिना

१०) नववा महिना

१) गर्भधारणा

* तुमच्यात जीवधारणा झाली आहे म्हणजेच शुक्रणूचा गर्भनलीकेतून अंड्यात यशस्वीपणे प्रवेश झाला आहे. . काही घरगुती टेस्ट करून तुम्ही तुम्ही गरोदर असण्याची खात्री करून घेऊ शकता. आणि शंका वाटत असल्या डॉक्टरांच्या निर्देशनीसार इतर टेस्ट करून घेऊ शकता. हे सुरवातीचे ३ महिने काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे कारण या तीन महिन्यात गर्भपात होण्याचा धोका सर्वाधिक असतो.

२) पहिला महिना

सुरवातीला पेशींचे वर्गीकरण होते. एक पेशीच्या दोन, दोनाच्या चार, चाराच्या आठ अशा पेशी वाढून पेशींचा समूह तयार होतो. याच पेशी नंतर पुन्हा वेगळ्या होऊन बाळाचे शारीरिक भाग हात, छाती, डोकं बनते. गर्भ वाढायला सुरवात होते आणि मुटकुळी करून बसलेल्या भृणाचा आकार घेते.

३) दुसरा महिना

तुमचे बाळ आता,अंदाजे १ इंच चे झालेले असते . याकाळात बाळाची वाढ झपाट्याने होत असते म्हणून हा काल महत्वाचा असतो. स्वतःची विशेष काळजी घ्या, सकस अन्न खा आणि निरोगी रहा. पौष्टीक व सकस आहार अवयवांच्या प्रथम जडणघडणीत अत्यंत आवश्यक आहे.

४) तिसरा महिना

यावेळी बाळ वाटाण्याच्या शेंगे एवढे म्हणजे २-३ इंचाचे असते. त्याच्या हाताची आणि पायाची बोटे आकार घेऊ लागतात. कधी कधी बाळाच्या हालचाली तुम्हाला जाणवू शकतात, त्याच्या हृदयाचे हलके हलके ठोके संथ गतीने चालू होतात.

५) चौथा महिना

चौथ्या महिन्यात तुमच्या गर्भाशयाचा आकार वाढतो म्हणजे तुमचं बाळ आकाराने आणि वजनाने वाढते. त्यामुळे साहजिकच तुमचे पोट मोठे दिसू लागते ! बाळाचे वजन यावेळी साधारणत: १४२ ग्राम एवढे असते. त्याच्या मेंदूची कवटी कडक आवरणासह बनण्यास सुरवात होते आणि आताशा त्याच्या हृदयाचे ठोके ठळक होऊ लागतात.

६) पाचवा महिना

तुमच्या बाळाची आतापर्यंत २७ सेमी इतकी वाढ झालेली असते (पाय लांब करून). त्याचे डोळे, भुवया ,पापण्या हे सर्व तयार झालेले असते. तुम्हाला त्याच्या हालचालींची पूर्ण जाणीव होईल, कदाचित त्याच्या काही खोडकर लाथा देखील आता तुम्हाला लागतील!

७) सहावा महिना

तुम्ही आता गर्भाचा अल्ट्रासाऊंड (Ultrsound) करून गर्भातल्या बाळाला बघू शकता. काही वर्षानंतर, गर्भात असताना तो किंवा ती किती छोटेसे होते हे दाखवायला ‘पहिला फोटो’ म्हणून ह्या प्रतीची हवी तर फ्रेम बनवा.

८) सातवा महिना

 गरोदर महिलेच्या पोटावर कान ठेवल्यास बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू येतात.

 

 बाळ अंगठा चोखत असते

 

आता बाळाचे वजन ६०० ग्राम एवढे भरते. त्याच्या वाढीच्या हालचाली आणि प्रगती त्याचे एका संपूर्ण मानवात रुपांतर करत असतात. बाळाच्या लाथा आणि धक्के आता पूर्णपणे ठळक होतात.

९) आठवा महिना

गर्भातल्या जीवाने आता एका परिपूर्ण बाळाचे रूप घेतलेले असते. जर तुमची मुदतपूर्व (प्रीमच्युअर) प्रसुती झाली तर असं अर्भकाची अत्यंत चोख काळजी घेतल्याने ते जगू शकते. त्याचे वजन आता जवळपास २ किलो असते.

१०) नववा महिना

बाळाचे डोके गर्भाशयाच्या खालील बाजूला आणि पाय वरच्या बाजूला असतात

 

बाळ जास्त शांत राहते. तर कधी - कधी अशांत. 

प्रसूतिपूर्व काळ - गर्भाशयामधील गर्भकाळ आणि गर्भाचे वजन यावर प्रसव केंव्हा होणार हे ठरते. तुमचे बाळ बाहेर येण्यास आता पूर्णपणे तयार आहे. डॉक्टरांनी एव्हाना तुमचे वेळापत्रक ठरविलेले असते आणि तुम्ही आई होण्यास उत्सुक असाल!

बाळ सदृढ जन्मास येईल त्यासाठी काय करावे ?

* बाळ सुदृढपणे जन्माला येण्याकरिता गरोदर स्त्रियांनी गरोदरपणातच काळजी घ्यावी.

* गरोदर मातेने गरोदरपणात तीन महिन्यांत आपली नोंदणी जवळच्या सरकारी रुग्णालयात (प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय) येथे करुन घेणे आवश्यक आहे.

* गरोदर मातेने गरोदरपणात दोन टीटीचे इंजेक्शन, लसीकरण डोस घेणे आवश्यक आहे. तसेच गरोदरपणात दोन सोनोग्राफी करणे आवश्यक आहे.

* पहिली सोनोग्राफी 16 ते 18 आठवड्यात बाळामध्ये काही व्यंगत्व तपासण्यासाठी असते. व्यंग असल्यास किंवा अपंग मुल जन्माला येऊ नये म्हणून गर्भपात करणे आवश्यक आहे.

* गर्भपात नियमानुसार (एमटीपी ॲक्ट) 20 आठवडे म्हणजे पाच महिन्यांच्या आत गर्भपाताची परवानगी आहे. या नियमानुसार अशा परिस्थितीत गर्भपात करता येईल.

* दुसरी सोनोग्राफी आठ ते नवव्या महिन्यात करणे गरजेचे आहे. या सोनोग्राफीमध्ये बाळंतपण किंवा प्रसुती सामान्य होईल किंवा शस्त्रक्रिया करावी लागणार याचे नियोजन करता येते. त्यासाठी दुसरी सोनोग्राफी करणे गरजेचे आहे.

https://www.tinystep.in/blog/nisrgikritya-garbhdharana-kashi-talal-xyz

अधिक माहितीसाठी ह्यावर जाऊ शकता. 

हॅलो मॉम्स... आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.

Tinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया... हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon