Link copied!
Sign in / Sign up
13
Shares

मूलाचा विचार करताय ? गरोदरपानाच्या अगोदर हे प्रश्न डॉक्टरांना नक्की विचारा


गरोदर होण्याअगोदर तुम्ही प्रसूतीतज्ज्ञाला भेटायला हवे. कारण खूप स्त्रियांना गरोदर झाल्यावर काही ना काही समस्या येते. आणि अचानक गर्भपात होतो तेव्हा ह्यासाठी अगोदरच तपासण्या करून घेतल्या तर नंतर काही समस्या येत नाही. जसे की, मधुमेह असेल तर त्यासाठी काय खबरदारी घ्यायची, अस्थमा किंवा आणखी काही असेल तर. अगोदर जर तुम्ही त्यावर उपचार घेत असाल तर आता तुम्हाला त्याची ट्रीटमेंट बदलावी लागेल. कारण आता तुमच्या पोटात बाळ आहे. आणि त्याचीही तब्येत महत्वाची आहे.

१. गरोदरपणात खूप औषधी घेता येत नाही. त्यातच तोंड आले असेल तर त्याचीही औषधी घेता येत नाही. आणि जर तुम्हाला काही गोळ्या चालू असतील तर गरोदर होण्याच्या अगोदर तुम्हाला डॉक्टरांना भेटून घेतलेले बरे.

२. ज्या वेळी तुम्ही डॉक्टरांना भेटाल तेव्हा त्यांना तुम्ही कोणत्या गोष्टीविषयी सांगाल.

तुमची आताची प्रकृती आणि lifestyle (जीवनशैली)

तुमच्या खानाच्या सवयी आणि जेवण

मासिक पाळीविषयी असलेल्या काही समस्या

तुम्ही व्यायाम करत असाल तर सांगा

जर तुम्ही नोकरी करत असाल तर कोणत्या ठिकाणी करत आहात आणोनि ते ठिकाण धोकादायक आहे का ? त्यासंबंधी सांगून टाका.

तुमची आताची प्रकृती कशी असते त्याविषयी काही माहिती

जर तुम्हाला नैराश्य आणि मानसिक ताण- तणाव असेल तर

३. जर तुमचे वजन जास्त असेल आणि बीएमआय (BMI) २५ पेक्षा जास्त असेल तर सांगून टाका. आणि जर मोजले नसेल तर त्या दवाखान्यात अगोदर मोजून घ्या. कारण जर वजन जास्त असेल तर तसा आहार तुम्हाला ठरवता येईल.

४. आणि जर तुमचे वजन कमी असेल. ह्या गोष्टी करताना तुम्ही तुमचे हिमोग्लोबीन आणि बाकीच्या टेस्ट करून घ्या जर तुमचे हिमोग्लोबिन कमी असेल तर तुम्हाला वाढवता येईल आणि त्यासाठी तुम्ही काय करू शकता ह्याही गोष्टी तुम्हाला डॉक्टर सांगतील.

५. आणि जर तुमचे वजन कमी असेल तर डॉक्टरांना तुमचे बीएमआय (BMI) कसे वाढवता येईल त्याविषयी विचारता येईल. वजन कमी राहिल्यास मासिक पाळीचे चक्र अनियमित राहू शकते. आणि त्याची शक्यता खूप जास्त असते.

चांगला बीएमआय १८.५ ते २२.९ च्या दरम्यान असतो.

६. तुम्ही स्वतःहून डॉक्टरांना तुमची थॉयरॉईड, PCOS, यूटेरिन फायब्रॉइड, एंडोमेट्रियोसिस आणि ब्लड प्रेशर ह्या गोष्टी स्वतःहून डॉक्टरांना तपासायला लावा. कारण अचानक डॉक्टर काही नसताना नंतर ह्या टेस्ट करायला लावून पैसा उकळतात.

७. तुमच्या कुटुंबात किंवा नवऱ्याला काही आरोग्याविषयी काही समस्या असतील तर त्यांना सांगून द्या. जसे की, डाउंस सिंड्रोम, सिकल सेल, थैलेसिमिया, सिस्टिक फायब्रोसिस ह्या समस्या असतील किंवा नसतील आणि जय असतील त्याविषयी डॉक्टरांशी बोला. जेणेकरून तुमचा गर्भ व्यवस्थित राहील.

८. जर तुम्ही काही इंजेक्शन घेत असाल त्याविषयी सांगून द्या.

ह्या गोष्टी आम्ही ह्यामुळे सांगतोय कारण आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो. त्यावेळी त्यांना काय विचारायचे हेच आपल्याला माहित नसल्याने डॉक्टरही जास्त लक्ष देत नाहीत. आणि त्यांनाही वाटते बरे आपली वेळ वाचतेय. आमचा हाच विचार की, तुम्हाला जास्तीस्त जास्त हाय गोष्टीविषयी माहिती मिळायला हवी. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon