Link copied!
Sign in / Sign up
23
Shares

गरोदर स्त्रीशी काय बोलू नये

गरोदर स्त्रिया या ९ महिन्यांच्या काळात मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अनेक बदलांमधून जातात. संप्रेरकांच्या असमतोलामुळे मूडमध्ये अचानक बदल होणे, चिडचिड होणे किंवा अत्यानंद होणे या सर्व गोष्टींमधून जात असतांना त्यांना जर कोणी वेडेवाकडे प्रश्न विचारले तर मात्र काय होत असेल याचा विचार तुम्हीच करा.

गरोदर स्त्रियांशी बोलण्याआधी किंवा काही प्रश्न विचारण्याआधी २ वेळा विचार करूनच बोला. आम्ही इथे दिलेल्या गोष्टी गरोदर स्त्रियांना ऐकायला आवडत नाहीत.

१. मी तुझ्या पोटाला हात लाऊ का ?

 

एखादी स्त्री गरोदर आहे म्हणजे अचानक ती अनोळखी लोकांसोबत कम्फर्टेबल होईल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. अजूनही ते तिचेच शरीर आहे आणि कोणी असं येऊन हात लावलेला किंवा लावण्यासाठी विचारणा केल्यास तिला अवघडल्यासारखे वाटणे साहजिक आहे. तुमची कितीही इच्छा झाली तरी असे तिला विचारू नका. तुम्ही जवळच्या नात्यातले किंवा मैत्रीत असाल तरच तुम्हाला हा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे.

२. नक्की जुळे नाहीयेत ना ?

 

 

हा प्रश्न विचारणे तर अजिबातच योग्य वाटत नाही. असा प्रश्न विचारणे म्हणजे त्या स्त्री चे पोट २ बाळे मावतील इतके गरजेपेक्षा मोठे दिसत आहे. आधीच गरोदरपणात वाढलेल्या वजनामुळे या स्त्रिया त्यांच्या दिसण्याबद्दल सजग झालेल्या असतात. अशात त्या अजून जाड दिसत आहेत असे भासवून तुम्ही त्यांचा आत्मविश्वास कमी करू नका.

३. तू हे खाऊ शकत नाहीस!

 

गरोदर स्त्रिया त्यांची काळजी स्वतः घेत असतात. काय पथ्य पाळायचे ,काय खायचे, कसे खायचे हे त्यांना चांगलेच माहित असते. त्यांचे डाइट त्या सांभाळत असतात. यात तुम्ही त्यांना अडवून ‘टू प्रेग्नंट आहेस ना, हे खाऊ नकोस!’ असे म्हटल्यास त्यांना या गोष्टीचा तिटकरा येऊ शकतो. तुम्ही शांत कधी बसाल असे त्यांना वाटेल. तुम्हाला जर खरच महत्वाचा सल्ला द्यायचा असेल तर योग्य भाषेत आणि समजावून सांगा.

४. हे बाळ प्लान केलं होतं का ?

हा प्रश्न विचारणाऱ्या लोकांना ही गोष्टी विचारावीच कशी वाटते हा अभ्यासाचा विषय आहे. मुळात प्रत्येक स्त्रीने प्लान केलेल्या प्रेग्नेन्सीतच खुश असावे, असा काही नियम आहे का ? प्लान नसेल जरी तरीही काय फरक पडणार आहे ? जर ही गोड बातमी तिने तुमच्यासोबत शेअर केली आहे आणि जर ती तिचा गरोदरपणाचा काळ एन्जॉय करत असेल तर हे प्लान होते किंवा नव्हते याने काहीच फरक पडत नाही. तिला या काळात आधाराची आणि मनःशांतीची गरज आहे. ती तिला मिळेल एवढेच तुमच्याकडून बघा.

५. नक्कीच तुला मुलगा / मुलगी होणार.

नाही ! अजिबात नाही! आईच्या पोटाच्या घेरावर बाळाचे लिंग अवलंबून नसते. पोट उभे आहे की आडवे आहे किंवा मोठे आहे की छोटे याने काहीच सांगता येत नसते. तिला मुलगा किंवा मुलगी होणार आहे याविषयी काही सांगून तिच्या अशा वाढवणे चुकीचे आहे. तिच्या पोटाकडे बघून म्हणायचेच असेल तर मुलगा असेल की मुलगी यापेक्षा तुम्ही “तुझे बाळ नक्कीच गोड-गुटगुटीत होणार बघ” असे म्हटल्यास तिला जास्त बरे वाटेल.  

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon