Link copied!
Sign in / Sign up
36
Shares

गरोदर न राहण्यामागे या पाच गोष्टी कारणीभूत असू शकतात

बराच काळ मुलासाठी प्रयन्त करत असून गर्भधारणा होत नसेल. तर त्यावर वेळीच उपचार करणे हे आवश्यक  परंतु गरोदर न राहण्यामागचे कारणं जाणून घेणे हे देखील तितकेच आवश्यक असते. गरोदर न राहण्यामागे दैनंदिन जीवनातील या काही गोष्टी कारणीभूत असू शकतात. त्या गोष्टी कोणत्या त्या आपण जाणून घेणार आहोत.

१. ताण -तणाव

गरोदर न राहण्यामागे हल्लीच्या दैनंदिन जीवनात असणारा ताण-तणाव हे मुख्य कारण असू शकते. आजच्या धकाधकीच्या जीवनात असणारा कामाचा ताण-तणाव किंवा नात्यातील ताण -तणाव हे दोन्ही गोष्टी गरोदर न राहणी मागचे कारण असू शकतात. यामध्ये फक्त स्त्रीच नाही तर ताण- तणावमुळे पुरुषांच्या शक्राणुंच्या गुणवत्तेवर देखील परिणाम होऊ शकतो. तसेच ताण-तणावामुळे जोडप्यांची समागम करण्याची इच्छा देखील कमी होते. आणि सगळ्याचा परिणाम प्रजनन क्षमतेवर होतो.

२. वजन

गरोदर ना होण्यामागे अजून एक प्रमुख कारण म्हणजे अतिरिक्त वजन किंवा स्थूलपणा हे एक गरोदर न राहण्याचे कारण असू शकते. स्थूलपणामुळे मासिकपाळीचे चक्र बिघडण्याची शक्यता असते, त्यामुळे स्त्रीबीज सोडण्यास समस्या निर्माण होऊ शकते त्यामुळे गर्भ राहण्यास समस्या निर्माण होते.

३. आहार

आहारात सकस पदार्थचा समावेश नसणे, जंक फूड खाणे, वारंवार प्रक्रिया केलेले अन्न खाणे, या गोष्टी जरी वर-वर फार सामान्य वाटत असल्या तरी याचा शरिरावर खोलवर परिणाम होत असतो. याचा गर्भधारणेवर परिणाम होऊ शकतो.

४.थायरॉईडची समस्या

खाण्याच्या बदलत्या सवयी वेळा आणि थायरॉड प्रकार यामुळे महिलांमध्ये थायरॉडची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. हायपो आणि हायपर या दोन्ही प्रकारच्या थायरॉड असणाऱ्या महिलांमध्ये प्रजनन क्षमतेच्या बाबत समस्या निर्माण होऊन गर्भधारणा होण्यास समस्या निर्माण होते. तसेच गरोदर असताना देखील थायरॉईडची समस्या निर्माण होऊ शकते

५. ड जीवनसत्वाची कमतरता

गरोदर न राहण्यामागे एक सामान्य समस्या म्हणजे स्त्रियांमधील ड जीवनसत्वाची कमतरता. ड जीवनसत्व हे मासिकपाळीचे कार्य योग्य राहण्यास मदत करते. तसेच गर्भ राहण्यासाठी शरीराला तयार करते. त्यामुळेच स्त्रियांमधील ड जीवनसत्वाची कमतरता हे देखील गरोदर न राहण्याचे कारण असू शकते. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon