Link copied!
Sign in / Sign up
27
Shares

प्रेग्नट होण्याची शक्यता वाढवण्यासाठी महत्त्वाच्या टीप्स

खरंच लहान मुलं म्हणजे जगाला मिळालेला एक आशीर्वाद आहेत. ते आपल्या आयुष्यात आनंद निर्माण करतात. त्यांची प्रत्येक गोष्ट आपल्याला एक प्रकारची ऊर्जा आणि आनंद देत असतात. पण काही दाम्पत्यांना त्यांच्या जीवनात लहान मुलांचा हा आनंद मिळत नाही. काही आरोग्यविषयक अडचणी नसतानाही त्यांना मुलं होतं नाही. जर तुम्हीही त्यांच्यापैकीच एक असाल ? तुम्हालाही बऱ्याच काळापासून मुलं होतं नसेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. तुम्ही प्रेग्नंट होण्याचे चान्स वाढवण्यासाटी आम्ही तुम्हाला याठिकाणी काही उपाय सांगणार आहोत.

*तुमच्या मासिक पाळीच्या चक्रावर लक्ष ठेवा

- प्रेग्नंट राहण्यासाठी योग्यवेळी प्रजनन होणे आवश्यक आहे. बीजकोश फुटून स्त्री जनन पेशी बाहेर येण्याच्या वेळेस प्रजनन होणे आवश्यक आहे. त्यासाठी तुमच्या मासिक पाळीच्या चक्रावर तुमचे लक्ष असणे आवश्यक आहे. तसेच तुमच्या शरिराचे तापमान नियमित तपासत राहा. बीजकोश फुटून स्त्री जनन पेशी बाहेर येण्याच्या वेळेस तुमच्या शरिराचे तापमान वाढते. प्रेग्नन्सीसाठी या काळात प्रजनन होणे आवश्यक असते.

*तुमच्या डायटमध्ये योग्य तो बदल करा

- गर्भधारणेचे चान्सेस वाढण्यासाठी दररोज संतुलित आहार घेणे खूप आवश्यक आहे. जास्त अल्कधर्मी असलेले असलेलं अन्न आहारात असणे आवश्यक आहे. त्यात वाटाणे, दूध, मोड आलेले कडधान्य यांचा समावेश होते. आम्लीय पदार्थ तुमटी प्रेग्नन्सीची शक्यता कमी करतात. तसेच शक्य असेल तेव्हा चहा आणि कॉफी टाळा.

*डॉक्टरांना भेटा

- जर तुम्ही यासाटी डॉक्टरांना भेटला नसाल, तर डॉक्टरांसी भेटून संबंधित टेस्ट करून घ्या. त्यामुळे तुम्हा बाळ होण्यास कोणत्या गोष्टी अडचणीच्या ठरताहेत याची माहिती मिळेल. जर तुम्ही कोणती औषधे घेत असाल, तर त्या औषधांचा प्रेग्नन्सीवर काही परिणाम होतो कायाची डॉक्टरांकडून माहिती घ्या.

*योग्य पोझिशन्स ट्राय करा

- प्रेग्नन्सीसाठी योग्य त्या पोझिशन्समध्ये सेक्स करणंही आवश्यक असतं. त्यामुळे पुरूषाचे वीर्य गर्भाशयात योग्य ठिकाणी पोहोचण्यास मदत होते. त्यामुळे बीजांड व शुक्रजंतूचा संयोग होऊन गर्भाधारणा होण्याची शक्यता वाढते.

*पूरक आहार

- गर्भधारणेसाठी आपण व्हिटॅमिन पूरक आहार घेण्याबाबत विचार करत असाल, तर तत्पुर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच या फॉलिक अॅसिड घेतल्यास बाळाला जन्मविकृतीपासून बचाव करण्यास मदत करते. तसेच तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या तब्येतीसाठी पुरेसा पोषक आहार घ्या.                

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon