गरोदर होण्यासाठीच्या लेखमालेतील हा दुसरा लेख आहे. गरोदर राहण्यासाठी कोणत्या गोष्टीची कमतरता आणि कोणत्या गोष्टीचा परिणाम होतो. हे सर्व या लेखातून आपण बघणार आहोत. गरोदर न व्हायला बरीच कारणे असतात. काही कारणांवर उपाय करता येतो त्याच काही गोष्टी ह्या खाली दिलेल्या लेखात बघणार आहोत.
१) गर्भ निरोधक गोळ्या घेणे बंद करा
तुम्ही जर गर्भ निरोधक गोळ्या घेत असाल तर त्या बंद करा. कारण यामुळे तुम्ही गरोदर राहणार नाहीत. त्यात अडथळा येईल. त्या गोळीचा मासिक पाळी वरही परिणाम होतो. मासिक पाळी किती दिवस चालते त्याचा कालावधी किती दिवस राहणार त्यानुसार. आणि जर तुम्ही गर्भ निरोधक गोळ्या घेतल्या नाहीतर तुमचे शरीर नैसर्गिकरित्या अंडे धारण करण्याची क्रिया सुरु होईल आणि ही क्रिया समागमानंतर सुरु होत असते. त्यामुळे गोळी, सिरप, कॉपर घेणे बंद करा.
२) फॉलिक ऍसिड
तुमची स्त्रीरोगतज्ञ् गर्भधारणात मदत होण्यासाठी काही औषधी व गोळ्या लिहून देणार त्या घ्या. आणि जर तुम्ही तशा गोळ्या लिहून घेतल्या नसतील तर लिहून घ्या. कारण त्याच्यामुळे शुक्राणू आणि अंड्यात गर्भ धारण करण्याची क्षमता वाढेल. फॉलिक ऍसिडच्या गोळ्या घेण्यात आळस करू नका. त्या नियमित घेत चला.
३) संतुलित आणि पौष्टिक आहार
आहाराचे महत्वाला तुम्हाला टाळता किंवा दुर्लक्ष करता येणार नाही. कारण जे तुम्ही खाणार त्याचा परिणाम हा शरीरावर व विशेषतः गरोदर होण्याच्या प्रक्रियेत परिणाम होत असतो. तुम्ही ओमेगा ३ फॅटी ऍसिड ची गोळी घ्या. ही गोळी गरोदर होण्यात मदत करणारे घटक शरीराला पुरवत असते. तुमच्या खाण्यात प्रोटीनसाठी अंडे, डाळ आणि रक्तासाठी हिरवा भाजीपाला आणि फॉलिक ऍसिडच्या गोळ्या घ्या. शाकाहारी स्त्रियांनी सुखा- मेवा, बीज, प्रोटीन युक्त पदार्थ खाऊ शकता.
४) वजनावर नियंत्रण ठेवा
आज कालच्या स्त्रियांमध्ये पी. सी. ओ. डी (PCOD) नावाचा आजार मोठ्या प्रमाणात दिसून येतो. या आजारामुळे प्रजजन स्त्रीची प्रजजन शक्ती कमी होऊन जाते. याच्या काही कारणांमधील एक कारण वजन जास्त असणे आहे. तुमचे वजन कमी करून बॉडी मास इंडेक्स (BMI) च्या नुसार तुमचे वजन नियंत्रणात आणा.
५) चहा कॉफी बंद करा
ज्या स्त्रियांना कॉफी आणि चहा पिण्याची खूप सवय असते त्यांनी त्याचे प्रमाण कमी करावे व जमल्यास काही कालावधीकरता बंदच करायचे. कारण यामुळे स्त्रियांच्या प्रजजन क्षमतेत कमी होण्याची शक्यता वाढून जाते. किंवा गर्भ तयार होण्यात वेळ लागतो.
६) सेक्स केल्यानंतर
तुमच्या मासिक पाळीची तारीख लिहून ठेवा. आणि तुमच्या मासिक पाळीच्या चक्रानुसार ज्या दिवशी गर्भ राहू शकतो त्याच दिवशी संभोग( समागम) करा.
७) योनीमधून निघणारा पांढरा स्त्राव
योनीमधून निघणाऱ्या पांढऱ्या स्रावाचा रंग आणि वास ओळखा. जर तुमचा खूप पांढरा स्त्राव होत असेल आणि तुम्ही त्याला बोटाने स्पर्श केल्यावर घट्ट वाटत असेल तर याला ओव्यूलेशन ची खून मानली जाते. आणि हे गरोदरपणासाठी चांगले मानले जाते. यामुळे तुमची प्रजजनाची क्षमता वाढते.
८) मानसिक ताण-तणाव आणि चिंता पासून दूर रहा
तुम्ही एखाद्या गोष्टीच्या तणावात असाल जसे की, घरी सासूचा जाच, ऑफिसातल्या काही गोष्टीमुळे येणारा मानसिक ताण या सगळ्या गोष्टीमुळे तुमची सेक्स बद्धलची भावना कमी होऊन जाते किंवा तितक्या प्रमाणात ती क्रिया नैर्सगिक होत नाही. आणि त्यामुळे मादी अंड्याची संख्या कमी होऊन जाते. म्हणून स्त्रियांनी आनंदी रहायला पाहिजे ज्या गोष्टींनी त्यांना आनंद मिळतो त्या गोष्टी करायला हव्यात. त्यामुळे प्रजजन क्षमतेत वृद्धी होईल.