Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

प्रेग्नन्सीच्या काळात फक्त शाकाहारी आहारच घ्यावा का ?

आपल्यापैकी बरेच जण मांसाहार हा शरीरासाठी वाईट असतो असा विचार करतात. विशेषत: प्रेग्न्नसीच्या वेळी तर मांसाहार टाळणंच अधिक योग्य, असंही म्हटलं जातं. पण खरंच हे योग्य आहे का की फक्त तो आपला समज असतो ? चला शोधूया...

सर्वात पहिले कारण सांगितलं जातं ते म्हणजे फक्त अन्नासाठी कुणाचा बळी घेणं योग्य नाही. त्यामुळे मांसाहार निषिद्ध ठरवला जातो. जर तसं असतं, तर निसर्गात अर्ध्यापेक्षा जास्त वेळा तसं घडतं. आपल्यासह निसर्गानेच अन्नासाठी हा मार्ग शोधून काढला आहे.

दुसरं कारणे दिलं जातं की जर आपल्याला शाकाहारी पदार्थांपासून आवश्यक पोषक घटक मिळथ असतील, तर मांसाहाराची काय आवश्यकता आहे ? पण हे खरं नाही. मांसाहारात असे बरेचसे पोष्टिक घटक असतात, जे शाकाहारी पदार्थांत सहसा मिळत नाहीत. म्हणून जर तुम्ही मांसाहार घेत असाल, तर प्रेग्नन्सीदरम्यान तो घेणे टाळू नका. मासे आणि अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते, जे गर्भात बाळाच्या वाढीसाठी खूप आवश्यक असते.

तसेच चिकन आणि मटनमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आणि भेसळ असते, असंही सांगितलं जातं. काही अंशी ते खऱही आहे. जर पोल्ट्री स्वच्छ ठेवलेली नसेल, तसेच प्राणी प्लास्टिकसारखे हानीकारक घटक खात असतील, तर त्यामुळे आहारचक्र बिघडू शकतं. त्याचा परिणाम मनुष्यावरही होऊ शकतो.

बऱ्याच वेळा लोक आपल्या स्वत:च्या आनंदासाठी मांसाहार करत नाहीत. हेसुद्धा एक चांगल कारण आहे. जगात असे खूप लोक आहेत जे मांसाहारवर टीका करतात किंवा त्याचे समर्थन करतात. तसेच इतरांनाही त्यानुसार वागायला सांगतात. पण लोक काय म्हणातात याचा निचार न करता तुम्हाला काय अधिक योग्य वाटतं हे पाहून निर्णय घ्यावा.

पण प्रोफेशनली सांगायचं झालं, तर प्रेग्नन्सीदरम्यान स्वच्छतेची काळजी घेत मांसाहार केल्यास तुमच्या बाळावर काहीही परिणाम होणार नाही. पण मांसाहार घ्यायचा की नाही हा पूर्णपणे तुमचा निर्णय आहे. पण कुणी तरी सांगतेय म्हणून तुमचे आवड बदलू नका. तुम्हाला काय आवडतं आणि काय आवडत नाही याचा पूर्णपणे विचार करा

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon