गरोदरपणात भीती वाटणे तसेच नैराश्य येणे हे खुप सामान्य गोष्ट आहे. परंतु या काळात तुम्ही जास्त जास्त आनंदी असणे गरजेचे असते. संशोधनातून हे सिद्ध झाले आहे कि आईच्या आनंदी ,दुःखी अश्या विविध भावनांचा बळावर आणि बाळाच्या वाढीवर परिणाम होतो. त्यामुळे या काळात आईने आनंदी राहणे आवश्यक असते. गरोदरपणात आलेले हे नैराश्य घावण्यासाठी काही टिप्स देणार आहोत ज्याचा तुम्हांला नक्की उपायोग होईल.
१.लोह झिंक आणि क जीवनसत्व समृद्ध असलेला आहार
लोह आणि झिंक यांची शारीरीतील कमतरतेमुळे गरोदर स्त्रीला नैराश्य येण्याची शक्यता असते. तसेच की जीवनसत्व हे या काळात विविध कारणांनी उपयुक्त असते. तसेच अन्नातील लोह शरीरात शोषून घेण्यास मदत करते.
२. पुरेशी झोप घ्या.
अपुरी झोप आणि झोपेची योग्य वेळ नसणे हे देखील या काळातील नैराश्याचे कारण असू शकते. जो पर्यंत तुम्ही योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात झोप घेत नाही तो पर्यंत तुमच्या शरीराला योग्य विश्रंती मिळत नाही. त्यामुळे तुमची सतत चीड-चीड होण्याची शक्यता असते. एक जीव तुमच्यात वाढत असतो त्यामुळे या काळात विश्रंती घेणे आवश्यक असते
३. दिनचर्येत व्यायामाचा समावेश करा.
जरी तुम्ही गरोदर असाल तरी तुम्हांला डॉक्टरांच्या सल्ल्याने काही व्यायाम प्रकार करणे काही हरकत नाही. गरोदरपणात आणि प्रसूती दरम्यान तसेच प्रसूतीनंतर या व्यायामाचा खूप उपयोग होतो. जसे व्यायामाचा शाररिकदृष्ट्या उपयोग होतो तसेच,मानसिक आरोग्यसाठी देखील व्यायामाचा या दरम्यान उपयोग होतो. व्यायामाने आनंदी संप्रेरकांचा स्त्राव वाढतो. आणि नैराश्य कमी होते.
४. तिखट जळजळीत पदार्थाचे सेवन टाळा.
तिखट जळजळीत पदार्थ खाणे टाळा. तसेच प्रक्रिया केलेले कार्बोहायड्रेट, रिफाइन्ड शुगर्स, कॅफीन असणारे पदार्थ, कृत्रिम घटक असलेले पदार्थचे सेवन आणि नैराश्य उदासीनता निर्माण होण्यास उदुक्त याव्यतिरिक्त, पोट बिघडण्यासारख्या,पोट दुखणे अश्या पोटाच्या विविध समस्या निर्माण होऊ शकतात. त. होऊ शकते आणि त्यामुळे कोणताही पदार्थ खाताना आणि आहार घेताना काळजी घ्या
५.मित्र-मैत्रिणी,कुटूंब आणि डॉक्टर यांची मदत घ्या.
जर तुम्ही नैराश्यातून जात असला तर तुम्ही तुमचेच मित्र-मैत्रीण आणि कुटूंबीयांशी याबाबत बोला. तुम्हांला काय वाटते, तुम्हांला कसली काळजी वाटते, कशाची भीती वाटते या सगळ्या गोष्टी मनमोकळेपणाने मांडा, हे तुम्हांला नैराश्यातून बाहेर पडायला मदत करेल. गोष्टींचा जास्त विचार करू नका. छोट्या-छोट्या गोष्टीबाबत चिंता बाळगू नका. याबाबत डॉक्टरांची मदत घ्या. याबाबतीत डॉक्टर तुम्हांला काय करावे, या नैराश्याशी पायरी-पायरीने कसे लढावे हे सांगतील तसेच गरोदरपणाला अनुसरून नैरश्यातून बाहेर येण्यासाठी काही औषधांची गरज असल्यास औषधे देखील सुचवतील.