Link copied!
Sign in / Sign up
35
Shares

गरोदर असताना कसा आहार घ्याल.

गर्भवती असताना त्या महिलेची प्रचंड काळजी घ्यावी लागते. यामध्ये प्रमुख गोष्ट असते ती म्हणजे गर्भवती महिलेचा आहार. हे सर्वानांच माहीत आहे की, गर्भधारणेदरम्यान आईपासून बाळाचे पोषण होता असते. अशा प्रकारे गर्भवती महिलेचा आहार हा विविध जीवनसत्वे आणि पोषक तत्वांनीयुक्त असल्यास आई आणि बाळासाठी लाभदायी ठरतो. आज आम्ही गर्भवती असलेल्या महिलेने जास्तीत जास्त कोणते पदार्थ खाणे आवश्यक आहे याची सविस्तर माहिती देणार आहोत.

१. फळे आणि भाज्या 

गर्भवती असताना विशिष्ट अशा एकाच फळाचा आणि भाजीचा विशेष उल्लेख केला जात नाही. हिरव्या पालेभाज्या, काळे वाटणे, शतावरी, डाळी, काळा सोयाबीन, अव्होकॅडो, नासपती हे फॉलीक आम्लाचे एक समृद्ध स्त्रोत आहेत. हे बाळाच्या मेंदूपासून ते मज्जासंस्थेच्या नलिकेतील दोषमुक्त करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात. ब्रोकोली, मोड आलेली कडधान्ये, द्राक्षे, संत्र, चेरी ही सर्व 'क' जीवनसत्वांनी युक्त असतात. हे सर्व घटक हाडांची निरोगी वाढ होण्यासाठी, उतींची वाढ होण्यासाठी, लोहाचे प्रमाण वाढण्यासाठी आवश्यक असते. त्यामुळे हे गर्भवती महिलेच्या आहारातील एक प्रमुख घटक असतात.

गर्भधारणेदरम्यान इतर आवश्यक फळे म्हणजे पोटेंशियमनी समृद्ध केळे, 'अ','ड','क','ई' जीवनसत्वांनी युक्त सफरचंद, ऍप्रिकॉट यामध्ये लोह, पोटॅशियम, बिटा कॅरोटीन, कॅल्शियम इत्यादी जीवनसत्वांचे उत्तम स्रोत आहेत. गर्भधारणे दरम्यान शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य असणे आवश्यक आहे. पाण्या व्यतिरिक्त, कलिंगड, काकडी हे शरीरात दीर्घकाळ पाण्याचे प्रमाण नियंत्रित करण्याचा चांगला मार्ग आहे. गर्भवती महिलेने भाज्यांमध्ये बटरनट स्क्वॉश (ई जीवनसत्व) रताळे, बटाटे, गाजर (बीटा कॅरोटीन), शालगम, मटार (फायबरयुक्त), श्रावणघेवडा यांचा समावेश करावा.

२. सर्व धान्ये 

 बहुतेक स्त्रियांना गर्भवती असताना बद्धकोष्ठता, अशक्तपणा किंवा लोहाच्या कमतरता जाणवते. सर्व धान्य, ब्राऊन राईस, ओटमील, ब्राऊन ब्रेड यासारखी धान्ये लोहानी परिपूर्ण असतात. आहारातील फायबर आणि विशेषतः 'ब' जीवनसत्वांनी युक्त असते. अशक्तपणा आणि बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी लाभदायी आहेत.

३. दुग्धजन्य उत्पादने 

गर्भधारणेदरम्यान दूध आणि इतर दुग्धजन्य उत्पादनांचे महत्व प्रचंड आहे. कॅल्शियमयुक्त दुधाचे पदार्थ जसे की, चीज, दही 'ड' जीवनसत्वाचा आणि प्रथिनांचे समृद्ध स्रोत आहे जे बाळाच्या विकासासाठी आणि वाढीसाठी अत्यंत गरजचे असते.

४. उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ 

 आतापर्यंत आपण प्रथिने बाळाच्या गुंतागुंत वाढीसाठी किती महत्वाची भूमिका बजावतात हे पाहिले आहे. जसे की मायंसाहार, मीट, अंडी, मासे (पाऱ्याचे उच्च प्रमाण असल्यास टाळा) सुके सोयाबीन, नट्स, मटार यासारख्या पदार्थांतून गर्भवती मातेला प्रथिने मिळतात. यासोबतच गर्भवती महिलेने नारळाचे पाणी, सुकामेवा, सुके आक्रोड, मनुका, खजूर, रासबेरी, स्ट्रॉबेरी, ब्ल्यूबेरी, ब्लॅकबेरी, फिश ऑलिव्ह ऑइलचा देखील आहारात समावेश करावा.

असंख्य फायदे असल्याने सुक्का मेवा आणि बेरी सारखी फळे हे माफक प्रमाणात खायला हवी.

गर्भधारणे दरम्यान पाळावयाचे काही नियम 

१. भाज्या, मांसाहार आणि पोल्ट्री उत्पादने आरोग्यासाठी लाभदायक असतात, तरी देखील या गोष्टीची काळजी घ्या की ते कच्चे राहणार नाहीत. अर्धवट शिजवलेल्या भाज्या आणि मांस गर्भेधारणे दरम्यान शरीराला हानीकारक ठरू शकतात.

२. छातीत जळजळणे, आम्लपित्त आणि पचनाच्या समस्या टाळण्यासाठी एकाच वेळी सगळे खाणे टाळा. थोड्या थोड्या वेळानी छोटे आहार घ्या.

३. जेवणानंतर लगेच झोपू नका. किमान १० मिनिटे तरी बसा त्यामुळे अन्न पचन चांगले होते.

४. थंड, शिळे, मसालेदार, प्रक्रिया केलेले आणि फास्टफूडला स्पष्ट नकार द्या. तसेच कॅफेनयुक्त पेयांना देखील नकार द्या.

 ५. शरीरात पाण्याची कमी भासू नये यासाठी भरपूर प्रमाणात पाणी आणि इतर आरोग्यदायी पेयांच्या आहारात समावेश करा.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon