Link copied!
Sign in / Sign up
155
Shares

तुम्ही गरोदर आहात का ? जाणून घ्या या लक्षणांच्या आधारे

प्रत्येकाची शरीररचना वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येक स्त्रीमध्ये गरोदर असताना आढळणारी लक्षणे वेगवेगळी असू शकतात तसेच हिपरंतू स्त्री गरोदर असताना साधारणतः आढळणारी लक्षणे कोणती ते आपण पाहणार आहोत. साधारणतः ६ आठवड्यानंतर दिसू लागतात.

१.मासिकपाळी चुकणे / न येणे

हे सगळ्यांत मुख्य आणि प्रथम लक्षात येणारे लक्षण आहे. जर संभोग नंतर तुमची मासिकपाळी जर चुकली  तर तुम्ही कदाचित गरोदर असण्याची शक्यता असते. अश्यावेळी प्रेगन्सी किटद्वारे किंवा लॅब टेस्ट करून गरोदर आहेत की नाही याची खात्री करून घ्या आणि ही टेस्ट निगेटिव्ह आली तर मात्र अनियमित होणाऱ्या मासिकपाळीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

२. स्पॉटिंग

स्पॉटिंग म्हणजे योनीतुन होणार थोडासा रक्तस्त्राव ज्यावेळी स्त्रीबीज हे गर्भाशयात रोपीत होते. त्यावेळी थोडासा रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. याला स्त्रीबीजत रोपीत होतानाच रक्तस्त्राव देखील म्हणतात. हा रक्तस्त्राव स्त्रीबीज रोपीत झाल्यावर  एक किंवा दोन आठड्याने हा रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. अश्यावेळी प्रेगन्सी टेस्ट करून खात्री करून घ्यावी. आणि गरोदर नसल्याचे टेस्ट मध्ये आढळून आल्यास  डॉक्टरांचं सल्ला घ्यावा

३) मळमळणे

या काळात संप्रेरकीय बदलांमुळे मळमळणे,उलटी सारखे होणे, कोरड्या उलट्या होणे असे होऊ शकते. या गोष्टी मासिकपाळी सुरु असताना देखील होतात

४) हळवे आणि सुजलेले स्तन

हे बहुतांशी स्त्रियांमध्ये आढळणारे लक्षण आहे. ज्यामध्ये स्तन  हे हळवे होतात तसेच काही वेळा सुजतात देखील. कधी कधी स्तनाग्रे सुजतात. अशी लक्षणे आढळल्यास प्रेग्नसी टेस्ट करणे गरजेचे असते. परंतु प्रेगन्सी टेस्ट निगेटिव्ह आल्यास याबाबत डॉक्टरांच सल्ला घेणे महत्वाचे असते

५) सतत लघवीला लागणे

जर तुम्हांला कोणत्याही औषधाशिवाय जर सतत लघवीला जावे लागत असेल तर हे एक गरोदर असण्याचा लक्षणांपैकीच्या लक्षांपैकीचे एक लक्षण असते.

६) थकवा

 सुरवातीच्या काही दिवसात खूप थकल्यासारखे जाणवते. याकाळात तुमचे शरीरात मोठी प्रक्रिया चालू असते त्यामुळे  खूप थकल्यासारखे जाणवते .कधी-कधी असा थकवा अशक्तपणाचे देखील लक्षण असते.

७) काही वास आणि पदार्थ नकोसे वाटणे

या काळत नेहमी आवडणारे पदार्थ किंवा वास नकोसे वाटतात. त्याचा त्रास होऊ लागतो त्यामुळे उलटीसारखे किंवा मळमळायला होते

 ८ ) काही पदार्थ खावेसे वाटणे /डोहाळे

या काळात कधी कधी याआधी न आवडणारे पदार्थ आवडायल लागतात किंवा सतत तेच पदार्थ खावेसे वाटतात. किंवा काही पदार्थ सतत  खाण्याची इच्छा होते.

९ ) मूड स्विंग

या काळात सतत मूड  बदलत राहतात व कदाचित काही स्त्रिया खूप भावुक होतात किंवा सतत चिंता करायला लागतात. छोट्या छोट्या गोष्टीवरून त्यांना रडायला येते,भीती वाटते

 १०) सतत झोप येणे

या काळात सतत झोप देखील येत असते बऱ्याच स्त्रियांना थकल्यासारखे जेवते आणि झोप येते 

गरोदर असलेल्या स्त्रियांमध्ये वरील लक्षणे साधारणतः आढळतात. अश्यावेळी प्रेग्नसी टेस्ट करून त्याची खात्री करून घ्यावी

Click here for the best in baby advice
What do you think?
50%
Wow!
50%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon