Link copied!
Sign in / Sign up
8
Shares

जाणून घ्या प्रेग्नन्सीदरम्यान जंक फुड खाल्ल्यास काय होतं ?

=

प्रेग्नन्सीदरम्यान महिलांची लालसा वाढते. विशेषत: खाद्यपदार्थांच्या बाबतीतही ती खूपच जास्त असते. आपल्याला तरुणपणापासून सांगितलेलं असतं की जंक फूड आरोग्यासाठी घातक असतात, तरीही आपल्याला जंक फूडच सर्वात जास्त टेस्टी वाटतं असतं. तसेच प्रेग्नन्सीदरम्यान वजन वाढवायचं असतं. ते वजन वाढवण्यासाठी जंक फूड हाच सर्वात चांगला उपाय आहे, असं प्रेग्नंट महिलांना वाटतं असतं. आपण प्रेग्नंट असल्यामुळे आपल्याला हवं ते खाता येईल, कुणीच काही म्हणणार नाही, असंही त्यांना वाटतं.

पण सत्य हे खूप वेगळं आहे. प्रेग्नन्सीच्या काळात तुम्हाला आहाराविषयी जास्त जागरूक राहणं आवश्यक असतं. तुम्हाला जे हवं ते तुम्हा खाऊ शकतं नाही. तुमच्यावर दुसरा एक जीव अवलंबून असतो. तुम्हाला आणि तुमच्या गर्भातील बाळाला तंदुरूस्त ठेवण्यासाठी पोषक आहाराची खूप आवश्यकता असते.

या काळात वजन वाढवणं जेवढं आवश्यक असतं, तेवढंच निरोगीपणे योग्य प्रमाणात वजन वाढवणं आवश्यक असतं. त्यामुळे तुमच्या बाळाच्या मेंदू, हाडं, अवयव आणि रोगप्रतिकार शक्ती योग्यप्रकारे वाढण्यास मदत होते. एखाद्या जंक फूड खाण्यात काहीच चुकीच नाही. पण पण त्याचा तुमच्या बाळाला काहीच फायदा होणार नाही हेही लक्षात घेणं आवश्यक आहे. तसेच जंक फुडमुळे तुम्हाला नेहमी पोट भरल्यासारखे वाटेल. त्यामुळे तुम्हाला इतर सकस आहार खाता येणार नाही, जो तुमच्या आणि बाळाच्या शरीरासाठी आवश्यक असतो.

प्रेग्नन्सी दरम्यान जंक फुड खाण्याचे तोटे

१. बाळालाही सवय लागते

- आईच्या खाण्याच्या सवयीची मुलांवरही परिणाम होतो. मुलांनाही त्याच सवयी लागतात, असं सांगितलं जात. काही अंशी ते खरंही आहे. आरोग्यदायी नसलेलं अन्न खाल्याने बाळाच्या शरीरातील फॅटी फुड्सचे प्रमाण वाढते. तसेच त्याला तशा पदार्थांची सवय लागते. त्याउलट आईने चांगला सकस आहार घेतल्यास बाळालाही त्या आहाराची सवय लागते.

२. अॅलर्जीचा धोका

- आहारात साखरेसारखा एखादा घटक जास्त प्रमाणात असेल, तर त्यामुळे तुम्हाला तसेच अॅलर्जी आणि अस्थमाचा धोका संभवू शकतो. सुक्रोज आणि फ्रुक्टोजच जास्त प्रमाणात सेवन बाळाच्या आणि आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसतं.

३. अनुवांशिक विकृती

- जंकफुडमध्ये फॅट आणि शुगरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे अनुवांशिक दोष पुढील पिढीत उतरण्याचा धोका वाढतो. हा अनुवांशिक दोष फक्त बाळातच नाही, तर पुढील ३ पिढ्यांमध्येही उतरू शकतो.

४. अतिप्रमाणात वजन वाढणे

- ज्या महिला प्रेग्नन्सीच्या काळात नियमितपणे जंक फुड खातात, त्यांचे वजन गरजेपक्षा जास्त प्रमाणात वाढते. त्याचा प्रेग्नन्सीच्या काळात काहीही परिणाम होणार नाही. पण हे वाढलेले वजन प्रेग्नन्सीनंतर कमी करणे खूप कठीण होते.

५. पचनाची समस्या

- जास्त प्रमाणात जंक फूड खाल्ल्यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होतात.

६. गर्भधारणेचा मधुमेह

- तुम्हाला मधुमेह नसेल. पण तुम्हाला तो प्रेग्नन्सीदरम्यान होणार नाही असं नाही. जंकफुडमध्ये शुगर आणि कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे गर्भधारणेचा मधूमेह होण्याचा धोका संभावतो.  

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon