Link copied!
Sign in / Sign up
44
Shares

गरोदर आहे की नाही? तपासण्यासाठी घरगुती टेस्ट अशी करा. . .


गरोदर होणे प्रत्येक स्त्री साठी महत्वाची गोष्ट असते. लग्न झाल्यावर जर समजा तिने चान्स घेतला असेल तर तिला आपण गरोदर आहोत का? असा प्रश्न पडतो. प्रेग्नेंसी चेक करण्यासाठी तसे प्रेग्नेंसी किट असतेच. पण काही अशा ट्रिक्स आहेत की, त्याने तुम्ही गरोदर आहात का? समजून येते पण या ट्रिक्स वरती किती विश्वास ठेवायचा याबद्दल आमच्याही मनात शंका आहे. गरोदर होण्यात मासिक पाळी खूप महत्वाची आहे. तिच्याविषयी काही समस्या असेल तर त्वरित तपासणी करून घ्या. कारण मासिक पाळीच्या अनियमितपणामुळे किंवा बंद होणे, ह्या कारणामुळे बऱ्याच स्त्रियांना गरोदर होण्यात अडचण येत असते. ज्या टेस्ट तुम्हाला खाली दिलेल्या आहेत त्या खूप स्त्रिया करत असतात आणि त्यांचा त्यावर विश्वासही आहे. तेव्हा ह्या टेस्ट विषयी जाणून घेणे सुद्धा महत्वाचे आहे.

१) साखरेच्या मदतीने गरोदर आहात का ते तपासणे

असे मानले जात की, साखरेच्या मदतीने केलेली टेस्ट खरी असते. ही टेस्ट कशी करावी त्याविषयी, कोणत्याही डिस्पोजल भांड्यात साखर घ्यावी. त्यात तुमचे युरिन टाकावे. काही वेळानंतर त्या मिश्रणाला तपासून घ्यावे. जर त्यामध्ये साखर विरघळली नाही आणि त्याच्या गुठळ्या बनल्या तर समजून घ्यावे. तुमची टेस्ट पॉजिटीव्ह आहे. तुम्ही गरोदर आहात. आणि जर त्या युरीन असलेल्या मिश्रणात साखर विरघळून जात असेल तर समजून घ्यावे की, तुमची टेस्ट निगेटिव्ह आहे. आणि तुम्ही गरोदर नाही आहात. ह्या टेस्टने केलेली चाचणी कितपत खरी किंवा खोटी ह्याविषयी शंका च आहे.

२) साबणपासून केलेली प्रेग्नेंसी टेस्ट

तुम्ही घरीच बसून प्रेग्नेंसी टेस्ट करू शकता. ह्यासाठी तुम्हाला साबण आणि तुमच्या यूरीनला (लघवीला) एका रिकाम्या भांड्यात टाका. जर तुम्हाला त्यात बुडबुडे आलेले दिसले तर समजून घ्यावे की, तुम्ही गरोदर आहात.

३) टूथपेस्टने तपासणी करणे

खूप स्त्रिया ही पद्दत वापरत असतात. आणि ही खूप सोपी आहे. त्यासाठी तुम्ही टूथपेस्टला एका भांड्यात घ्या. त्यात काही प्रमाणात तुमचे युरीन मिक्स करा. थोड्या वेळानंतर जर त्या मिश्रणाचा भाग हलका निळा आणि फेसाळ दिसला तर समजून घ्यावे की, तुम्ही गरोदर आहात. आणि ह्या सर्व टेस्ट सकाळीच करायच्या कारण त्यावेळी रिजल्ट हे योग्य येत असतात.

ह्या टेस्ट केल्यानंतर खरंच गरोदर आहे हे समजून येते आणि त्यावर विश्वास ठेवता येईल का ? तर नाही कारण बऱ्याचदा मासिक पाळी आली आहे सर्व काही बरोबर आहे तरी गर्भधारणा होत नाही. म्हणून ह्या टेस्टवर खूप विश्वास ठेवता येत नाही. फक्त तुम्हाला वाटत असेल तर तपासून घ्या आणि त्यानंतर डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या. ह्यामुळे जर काही समस्या असेल तर ती त्यातून समजून येईल.
 

 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon