Link copied!
Sign in / Sign up
5
Shares

गरोदरपणातील या सामान्य समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.

गर्भारपणात स्त्रियांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अश्या काही समस्या असतात ज्या वरवर सामान्य वाटतात. परंतु नंतर त्या त्रासदायक ठरतात. म्हणून गरोदरपणात पुढील समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. 

१. बध्दकोष्ठता  

ज्या स्त्रिया सुयोग्य प्रमाणात पालेभाज्या, द्रव पदार्थ व फळे यांचे सेवन करत नाहीत, त्यांना हा त्रास होतो. त्यातूनच छातीत जळजळणे व गॅसेसचा त्रास सुरू होतो. बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी आहारात भरपूर प्रमाणात चोथा असलेल्या पदार्थांचा समावेश करावा, फळे, भाज्या विशेषत: पालेभाज्या, ओट्स, काळ्या मनुका, अंजीर असे पदार्थ घेतले पाहिजेत. याचबरोबर आहारात पाण्याच्या प्रमाणावर लक्ष ठेवले पाहिजे. पाणी व इतर पातळ पदार्थ जसे सूप, ताक, शहाळ्याचे पाणी इत्यादीचा समावेश आहारात करायला हवा

२.रक्ताची कमतरता 

ज्या स्त्रियांचा आहार या काळात संतुलित नसतो व त्यात लोह, प्रथिने, जीवनसत्वे इ. सारख्या आवश्यक घटकांचा समावेश नसतो, त्यांच्या शरीरातील रक्तपेशींचे प्रमाण कमी होऊन, हा त्रास होतो. विशेषत: लोह व बी कॉम्पलेक्स या दोन घटकांची कमतरता निर्माण होते. काहींच्या पोटात जंतही होतात. पालेभाज्या, बीट, गव्हाचे अन्नपदार्थ, योग्य प्रमाणातील अंडी, मासे खाऊन या तक्रारीची तीव्रता कमी करता येते.

३. छातीत जळजळणे.  

गर्भवती स्त्रीच्या गर्भाशयाचा आकार वाढतो. त्यामुळे पचन संस्थेवर व पोटावर दबाव येतो व त्यामुळे हा त्रास होतो. मधून मधून थोडे थोडे खाल्याने हा त्रास कमी होतो.

४. पायांना गोळे/पेटके येणे.  

र्भवती स्त्रीच्या शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी झाल्याने तिला हा त्रास होऊ शकतो.

५. स्थूलता 

गर्भवती माता व तिचे भ्रूण या दोघांच्या सुरक्षिततेस यामुळे बाधा येऊ शकते. याकाळात डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्या आहारात योग्य नियंत्रण/बदल करावा. म्हणजे वजन घटण्यास मदत होऊ शकते.

इतर आजार  

मधुमेह, विशिष्ट प्रकारचे ताप, विशिष्ट प्रकारची कावीळ  झालेल्या गर्भवती मातेने खूपच काळजी घ्यावी. तिचा आजार बाळाच्या आरोग्यस देखील अपायकारक ठरू शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने  त्वरित उपाययोजना सुरू करावी. मधुमेहाची तक्रार असलेल्या स्त्रीने आहाराबाबत जागरूक असावे. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon