Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

गर्भवतीला रडू आणणारी ७ मजेशीर कारणे


गर्भारपण जणू एक रोलर कोस्टरच म्हणायला हवा. कारण कधी काय वाटेल काही सांगता येत नाही. शेकडो प्रकारच्या संप्ररेकांचे असंतुलन, डोहाळे लागणे, विचित्र आणि अस्थिर भावना या काळात स्त्रीला अनुभवास येतात. गर्भार स्त्रीला तब्बल ९ महिने ह्या सर्वांतून जावे लागेत. त्यामुळेच की काय पण गर्भवतीची सहनशक्ती थोडी कमी असते आणि आपल्याला अगदी मजे़शीर किंवा हास्यास्पद कारणांसाठीही त्यांची चिडचिड होणे किंवा अचानक रडायला येणे असे घडताना दिसते. गर्भवतीच्या या काही विचित्र गोष्टी किंवा हे विचित्र काळ समजून घेण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही ७ हास्यास्पद आणि सत्य कारणे सांगतो आहेत ज्यामुळे गर्भवती स्त्रियांना रडू येऊ शकते.

१. मतमतांतरे

गर्भवती असताना बहुतांश वेळा आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांशीच वाद होतात. अगदी छोटीशी गोष्ट जरी इकडची तिकडे झाली तरी रागाने डोळ्यांतून अश्रु वाहायला लागतात. अगदी साध्या गोष्टीमध्ये एका आईला असाच अनुभव आला. एका रविवारी ती बसली होती आणि आवडती मालिका पहायची होती. पण तिच्या नवèयाने तिला आपण काही गाणी ऐकूया आणि एकमेकांशी गप्पा मारुया असे सुचवले. त्याने त्याचे वाक्य संपवलेच होते आणि तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वहायला सुरुवात. तिच्या नवèयाला आणि तिला स्वतःलाही कळले नाही की तिने कधी रडायला सुरुवात केली आणि या सर्वात अर्धा तास गेला. मग जेव्हा तिला आवडत्या आईस्क्रीमचे पाच कप दिले तेव्हा कुठे जाऊन गोष्टी थांबल्या आणि ती शांत झाली.


४. बदलत्या इच्छा किंवा डोहाळे

गर्भारपणात स्त्रीला काळ पुढे सरकतो तसे वेगवेगळे डोहाळे लागतात किंवा इच्छा होत असतात. गर्भवतीच्या नवऱ्याने किंवा इतर आजूबाजूच्या नातेवाईकांनी लोकांनी तिचे डोहाळे किंवा इच्छा पुरवल्या तर अधिक चांगले. एका गर्भवती स्त्रीच्या पतीला मात्र ही गोष्ट अगदी कठीण अनुभवाअंती शिकायला मिळाली. चांगल्या पतीदेवांप्रमाणे या महाशयांनी आपल्या बायकोसाठी संत्रा क्रीम बिस्किट आणली. आधी तिला ही बिस्कीटे आवडत होती मात्र त्याच दिवशी मात्र तिला ती बिस्कीटे अजिबात खायची नव्हती. त्यामुळे तिनेच नवऱ्याला ती बिस्कीटे घेण्यास सांगितले. दुसरा दिवस उजाडला. तशी तिला अचानक तिच संत्रा क्रीम बिस्किटे खाण्याची अतितीव्र किंवा अनियंत्रित इच्छा झाली आणि तिने वेड्यासारखी ती बिस्किटे घरात शोधली मात्र तिला ती मिळालीच नाहीत. अत्यंत दुःखी होऊन तिने आपल्या पतीला ती बिस्किटे कुठे ठेवली आहेत हे विचारण्यासाठी फोन केला. तिला हे माहितच नव्हते की तिनेच होकार दिल्यानंतर त्याने ती बिस्किटे ऑफिसमधील सहकाऱ्यांना वाटण्यासाठी नेली होती. आणि हे कळल्यावर मग पुन्हा गंगा जमुना तिच्या डोळ्यातून झरझर वाहू लागल्या.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon