Link copied!
Sign in / Sign up
187
Shares

गर्भावस्थेत येणारी सूज आणि त्यावर उपाय

सकाळी उठल्यावर तुम्हाला खूप अंग भरल्यासारखे वाटत असते. गरोदर स्त्रीचे शरीर सकाळी उठून जड झाल्यासारखे वाटत असते. अंगावर सूज आलेली असते. म्हणून तुमचे शरीर हे थोडे भरून आल्यासारखे वाटत असते. ह्याला एडिमा असेही म्हणतात. हा गर्भावस्था मध्ये होत असते. आणि ही सूज तुम्हाला कधी-कधी खूप त्रास देत असते. पण हे कशामुळे होत असते तेच आपण ह्या ब्लॉगमधून बघणार आहोत.

१) गर्भावस्थेच्या वेळी तुमच्या बाळाच्या विकासासाठी तुमच्या शरीरात ५० टक्के रक्त तयार होते आणि काही फ्लुइड निर्माण होत असतात. आणि ते जास्तीची फ्लुइड तुमच्या हातात, पायात, बाकी शरीराच्या टिश्यूत जमा होऊन जातात. आणि ह्याच कारणाने गरोदरपणात स्त्रीचे २५ टक्के वजन ह्या फ्लुइड पदार्थानी वाढत असते.

 

 
फ्लुइड शरीरात नेमके काय करत असते

तुमच्या शरीरात जे जास्तीचे फ्लुइड आहे ते शरीराला नरम करते. आणि आपल्या वाढणाऱ्या बाळाला जागा देण्यासाठी शरीराला स्ट्रेच करते. आणि प्रसूतीसाठी तुमचे पेल्विक जॉईंट उघडते. गरोदरपणाच्या काही दिवसानंतर तुमचे वाढते वजनामुळे आपल्या पायाच्या नसांवर दबाव पडायला लागतो. शरीर सुजल्यामुळे काही वेदना किंवा दुखत नसते. पण त्यामुळे तुम्ही अस्वस्थ होत असाल. तर ह्यावर काही उपाय आहे का? तेच आपण बघणार आहोत.

२) स्वतःला हायड्रेट ठेवा

तुम्ही जास्त पाणी पिल्यानंतर सूज कमी होऊ शकते? ते कसे. तर तुम्ही खूप पाणी पिणार तर तुम्हाला जास्त लघवी लागणार आणि त्याचमुळे तुमच्या शरीरातील जास्तीची तरल पदार्थ बाहेर निघून जातील. गरोदरपणात पोहणे सगळ्यात छान व्यायाम आहे असे सांगतात. कारण पोहण्याच्या वेळी तुमच्या शरीराला जो दबाव पडत असतो. त्यामुळे आपल्या टिश्यू वर प्रेशर पडून आपल्या शरीरातील जास्तीची फ्लुईड बाहेर निघून जातात.

३) गरोदरपणात चांगला आहार घ्या. शरीरात पोटेशियम च्या कमी मुळे सूज येऊ शकते. खाण्यात खूप मीठ असेल तर सूज वाढते असते. आहारात कमी मीठ आणि अधिक सोडियम चा सहभाग करा. जसे की, केळी त्यात पोटेशियम ची मात्रा खूप आहे. कॉफी कमी घ्या.

४) डाव्या कुशीवर झोप घ्या

गरोदरपणात पाठीवर झोपायला नाही सांगत. तेव्हा डाव्या कुशीवर झोपणे चांगले राहील. कारण ह्यामुळे पोटाच्या खाली कमी दबाव येतो. आणि ह्या त्या नसा असतात त्या शरीराच्या अर्ध्या भागात डीऑक्सिसिजेनेट रक्ताला शरीराच्या एका भागातून हृदयापर्यंत पोहोचवत असतात. काहीवेळा तुम्ही उजव्या कुशीवर झोपू शकता.

५) ह्यावर खूप तंग कपडे घालू नका. स्टाकींग्ज किंवा लेगगिन्स परिधान करा. मोजे घालण्यावेळी लक्षात असू द्या की, खूप टाइट मोजे घालू नका. कारण त्यांना घातल्यानंतर सूज आणखी वाढून जाते. सैलसर कपडे घाला.

कोणत्या वेळी इमरजेंसी येऊ शकते

जर तुम्हाला अचानक सूज आल्यामुळे खूपच त्रास होत असेल. तर तो प्रीक्लैम्प्सिआ असू शकतो. आणि तो धोकादायक असतो. प्रीक्लैम्प्सिआ बद्धल अगोदरच लेख लिहला आहेच. प्रीक्लैम्प्सिआ चे लक्षण : उलटी, चक्कर, तीव्र डोकेदुखी,

मान दुखणे, पोटदुखी, श्वास घ्यायला अडचण, अंधुक दिसणे, ब्लड क्लॉट, अचानक खूप वजन वाढणे,

तुमच्या बोटांमध्ये गुदगुल्या सारखी संवेदना होते का ? तुमचे हात इतके स्तब्ध झालेत की, तुम्ही कॉफी मग उठवू शकत नाही. ? तर ह्याला दुर्लक्षित करू नका. हा गर्भावस्थेच्यामुळे कार्पल टनल सिंड्रोम होऊ शकतो. हा तुमच्या नस ला व स्नायूंवर व हाताच्या नसांवर परिणाम करत असतो. जर असे काही गरोदरपणात झालेच तर त्वरित डॉक्टरांना सांगा.

तुमचे आरोग्य निरोगी राहावे व प्रसूती खूप सुलभ व्हावी हाच आमचा उद्धेश आहे. त्यासाठी वरती दिलेल्या गोष्टी लक्षात असू द्या आणि इतर मातांनाही ह्याविषयी सांगून त्यांनाही मदत करा. 

आमचा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद ! आमच्या वाचकांसाठी आम्ही एक सवलत ऑफर देत आहोत त्यासाठी इथे क्लिक करा.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon