Link copied!
Sign in / Sign up
26
Shares

गर्भपातानंतर पत्नीला सावरण्यास कशी मदत कराल

गर्भपातानंतर त्यातून सावरणे खरंच खूप कठीण असते, वडिलांना, मुलांना आणि विशेष करून त्या आईला. गर्भपात झालेल्या प्रत्येक आईचा त्याबाबतीत अनुभव वेगळा असतो आणि प्रत्येकीच्या भावना देखील वेगळ्या असतात. आपले बाळ गर्भात किती दिवस होते, मग ते काही दिवस असो किंवा पूर्ण ६ ते ९ महिने, या पेक्षा आपण आपले मुलं गमावले याचे दुःख जास्ती असते.

जर का तुमच्या पत्नीचे गर्भपात झाले असेल किंवा काही अडचणींमुळे तसे करायला लागले असेल, तर खाली नमूद केल्या प्रमाणे काही गोष्टी आहेत ज्या केल्याने तुम्ही त्यांना या दुःखातून सावरू शकता.

१. दुःखाचा काळ 

शक्य तितक्या योग्य रीतीने दुःख व्यक्त करण्यास वेळ द्या. जर का बाळ ६ ते ९ महिन्याचे असेल तर डॉक्टर आणि हॉस्पिटल कर्मचाऱ्यांना विनंती करून ते भ्रूण मागून घ्या म्हणजे तुम्ही योग्य पद्धतीने त्याचे अंत्यसंस्कार करू शकाल. जर का गर्भपात पहिल्या त्रैमासिकात झाले असेल तर प्रतीकात्मक बाळ करून त्याचे अंत्यसंस्कार करा. तुमच्या पत्नी सोबत बोलून हे कुठे करायचे ते ठरवा. या अंत्यविधीसाठी तुमच्या पत्नीच्या जवळच्या नातेवाईकांना आणि मित्र मैत्रिणींना बोलवा.

२.प्रेमळ व्हा 

ही एक अशी वेळ असते जेव्हा तुमच्या पत्नीला असे वाटू शकते की तुमचे तिच्यावर प्रेम नाही किंवा ती आई होण्यास असमर्थ आहे. तुम्ही असे काही बोलला नाहीत तरी या विचारांनीच त्या खूप खचतात. त्यामुळे तुम्ही त्यांना सारखे पटवून द्या की तुमचे त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि तुम्ही कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या बरोबर आहात हे त्यांना रोज सांगत रहा म्हणजे त्यांना कळेल आणि नैराश्य येणार नाही. तुमचे प्रेम कृतीतून देखील व्यक्त करत रहा (कपाळावर चुंबन देणे, किंवा त्या रडत असतील तेव्हा त्यांना कवेत घेणे),या दुःखातून सावरण्यासाठी त्यांना त्यांचा वेळ द्या,.

३. त्यांना समजून घ्या.

या काळात, आपले बाळ गमावले या दुःखातून बाहेर पाडण्यासाठी तुम्ही आणि तुमची पत्नी दोघेही प्रयत्न करत असतात. अशावेळी आपण दोघे एकमेकांसाठी आहोत असे आपण कायम सांगत असतो. पत्नी ते बाळ तिच्या गर्भात वाढवत असते त्यामुळे त्यांना होणारे दुःख हे निश्चितच तुमच्या दुःखा पेक्षा जास्ती असते. त्या बाळाच्या हृदयाचे ठोके अनुभवत असतात आणि आता एकदमच हे सगळे नाहीसे होते. या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि कायम त्यांच्या बरोबर रहा.

४. विचार पूर्वक बोला.

एका आईसाठी तिच्या गर्भात असलेले भ्रूण हे तिचे बाळच असते, त्यामुळे बोलताना कायम "आपले बाळ किंवा मुलं" असाच उल्लेख करा. योग्य शब्द न वापरल्याने आपण त्यांच्या दुःखात अधिक भरच घालतो किंवा त्यांना असे वाटू शकते की,त्यांना होत असलेल्या दुःखाचे गांभीर्य कळत नाही . त्यामुळे बाळाविषयी बोलताना कायम योग्य शब्द प्रयोग करा.

५. त्यांना वेळ द्या.

या सगळ्यात धीर धरणे हा सर्वांत महत्वाचा भाग आहे. काही माता या दुःखातून लवकर सावरतात, पण काहींना मात्र वेळ लागू शकतो परत आपले जीवन होते तसे हसरे, खेळकर करण्यासाठी त्यांना यातून सावरण्यासाठी किती वेळ लागेल याचा त्या किती महिने गर्भवती होत्या याच्याशी निगडीत नाही. यासाठी किती वेळ लागू शकतो याचे अनुमान खरंच करता येणे आवश्यक आहे. कित्येक वर्षांनंतर देखील या गोष्टीची नुसती एखादी आठवण जरी मनात येऊन गेली तरी डोळे पाणावतात.

६.  तुमच्या मुलांना हे सांगा.

 तुमची पत्नी कदाचित मुलांना हे सांगू शकणार नाही तेव्हा तुम्हीच पुढाकार घेऊन हे त्यांना सांगा. त्याआधी तुमच्या पत्नी सोबत हे सविस्तर बोला. तुम्ही सगळे एकत्र असताना देखील त्यांना हे सांगू शकता जर का तुमच्या पत्नीला त्यातून काही त्रास होणार नसेल तर. हे सांगितल्यावर तुमची मुलं देखील रडू शकतात की त्यांचे भावंडं आत्ता येणार नाहीये, पण त्यांना हे सांगणे खरंच गरजेचे आहे त्यामुळे त्यांना देखील कळेल की त्यांचे आई-बाबा का दुःखात आहेत. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon