Link copied!
Sign in / Sign up
43
Shares

गर्भनिरोधाच्या या पर्यायाबद्दल तुम्हांला माहिती आहे का ?

पहिल्या प्रसूतीनंतर परत गर्भवती राहायचं असेल तर किमान एक वर्ष तरी थांबायला हवे असे सर्वसाधारणपणे सांगितले जाते, कारण तुमच्या शरीराची झालेली झीज आणि तुमचे स्वास्थ परत पूर्णपणे मार्गावर यायला तेवढा वेळ द्यावा लागतोच. यामुळे दुसरा चान्स घेताना येणाऱ्या समस्या जसे की,जन्माच्या वेळी बाळाचे वजन कमी भरणे किंवा गर्भपात होण्याच्या शक्यता किंवा वेळेपूर्वीच प्रसूती होणे कमी होतात.

ज्यांना दुसरे बाळं नको आहे अश्या स्त्रियांसाठी  विश्वसनीय गर्भ निरोधकांचा उपाय बऱ्याच महिला करतात.परंतु बऱ्याच गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये इस्ट्रोजेन असते यामुळे आईच्या दुधाचा पुरवठा कमी होतो व स्तनपानाच्या कालावधीसुद्धा कमी होतो. इस्ट्रोजेनमुळे बाळाला काही नुकसान होत नाही परंतु तुम्ही अशा गोष्टी नक्की टाळायला हव्यात ज्यामुळे बाळाच्या दुधाचा पुरवठा कमी होऊ शकतो. स्तनपान हा एक गर्भधारणा प्रतिबंधक उपाय आहे. जेव्हा तुम्ही स्तनपान देत असता तेव्हा तुमच्या शरीरात प्रोलॅक्टिन संप्रेरकाची पातळी वाढते. यामुळे स्त्रीबीज तयार होण्याची शक्यता कमी होते.परंतु हा खात्रीशीर उपाय नाही. अशापद्धतीने आपण फक्त ६ महिन्यांपर्यंत गर्भधारणेपासून लांब राहू शकतो. या व्यतिरिक्त गर्भधारणा होऊ नये यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत जे आम्ही तुम्हाला तपशीलवार सांगणार आहोत.

१.इन्ट्रायुटेरीन डिवाइस (IUD)

ही ९९% प्रभावी पद्धत आहे. आययुडी दोन प्रकारात उपलब्ध आहे - संप्रेरकांशी निगडित आणि त्यांच्यासही निगडित नसलेले. हे फक्त डॉक्टरांच्या सल्यानीच मिळते. संप्रेरकांशी निगडित असलेले आययुडी मध्ये प्रोजेस्टिन असते, हे प्रोजेस्टेरॉन संप्रेरकाचे कृत्रिम रूप आहे. हे आपल्या गर्भाशयातील श्लेष्मा (चिकटपणा) वाढवते आणि शुक्राणूंना गर्भाश्यापर्यंत पोहचण्यापासून प्रतिबंधित करते. संप्रेरकांशी निगडित असलेल्या आययुडींमुळे तुम्हाला मासिक पाळीत त्रास देखील कमी होतो. प्रसूतीनंतर लगेच आपण आययुडी बसवू शकतो पण नेहमी डॉक्टरांच्या सल्यानी केलेले चांगले. याचे काही दुष्परिणाम पण आहेत जसे की, हे गर्भाशयात लावले की वांब येणे, मासिक पाळी नसताना देखील हलका रक्तस्त्राव होणे आणि मासिक पाळी मध्ये जास्ती किंवा अनियमित रक्तस्त्राव होणे. आययुडी तुम्ही जेव्हा परत गर्भवती राहण्यास तयार असला तेव्हा काढू शकता.

२. छोटी गोळी

आपण तोंडावाटे गर्भनिरोधक घेऊ इच्छित असल्यास एक छोटी गोळी एक व्यवहार्य पर्याय आहे. या गोळीमध्ये प्रोजेस्टीन देखील समाविष्ट आहे जेणेकरुन आई स्तनपान देणे सुरक्षित असते. ही गोळी केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मिळते. आणि सल्ल्यानेच घ्यावी. आपण गोळी घेत असाल तर मासिक पाळी येण्याची शक्यता नसते. तुमचे शरीर गोळीनुसार जसे नियमित होत जाते त्याचा तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते जसे कि अनियमित रक्तस्राव आणि स्पॉटिंग होते. यामुळे तुम्हाला डोकेदुखी आणि लैगिक भावना कमी होण्याची शक्यता सुद्धा उद्भवू शकतात. प्रसूतीनंतर सहा ते आठ आठवड्यानंतर गोळ्या घेयला सुरो करू शकता. तुम्हाला परत गर्भवती होण्याचे असल्यास गोळी घेणे त्वरित थांबवावे, डॉक्टरांशी संपर्क साधावा. काही स्त्रिया या नंतर लगेच गर्भवती राहू शकतात तर काहींना बरेच महिने लागू शकतात.

३. प्रतिबंधक पद्धत 

जन्मदर रोखण्याचा साधा आणि सोपा उपाय म्हणजे शाररिक संबंधांच्या वेळी शुक्राणूंना गर्भाशयात जाण्यापासून रोखायचे. कंडोम हा जन्मदर रोखण्याचा उत्तम आणि परवडेल असा पर्याय आहे. कंडोममुळे STIs किंवा STDs सारख्या रोगांपासून बचाव होतो. अतिरिक्त संरक्षण प्रदान करण्यासाठी इतर प्रकारच्या गर्भनिरोधक पद्धतीसह कंडोम्स वापरा, जसे की गोळी, शुक्राणूनाशक किंवा नैसर्गिक कुटुंब नियोजन.

४. नसबंदी 

 तुम्हाला दुसरे मुलाचा चान्स घ्यायचा नसेल तर जन्मदर नियंत्रण करण्याचा आणखी एका सर्वोत्तम उपाय म्हणजे नसबंदी. स्त्री लिंगातील,ट्युबल नसबंदी असेही म्हटले जाते. ही गर्भनिरोधकाची कायमची पद्धत आहे. स्त्री नसबंदीमध्ये फॅलोपियन ट्यूब गर्भधारणा टाळण्यासाठी ब्लॉक किंवा कापली जाते. मासिक पाळीवर त्याचा काहीच परिणाम होत नाही. या प्रक्रियेचे धोके ओटीपोटातील शस्त्रक्रियेसारख्याच आहेत ज्यात संक्रमण, ओटीपोटात वेदना, भूलवेदना इत्यादी असतात. जर का तुमचा निर्णय झाला असेल की, तुम्हाला आता परत कधीच गर्भधारणा नको आहे तरच या मार्गाचा अवलंब करा.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon