Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

जाणून घ्या गरोदरपणात गर्भजलाची पातळी कमी झाल्यास काय होऊ शकते.......

 गर्भजल म्हणजे बाळाची जीव संरक्षक व्यवस्था आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. गर्भजल अर्भकाचे संरक्षण तर करतेच परंतू अर्भकाच्या विकासासाठी प्रोत्साहन देते. स्नायूंचा विकास, नितंब, फुफ्फुसे आणि पचनसंस्था यांच्या विकासाला प्रोत्साहन देते. गर्भधारणेनंतर १२ व्या दिवशी गर्भजल कोषाची निर्मिती होते आणि मग गर्भजलाची निर्मिती होते. सुरुवातीचे गर्भजल म्हणजे मातेकडून मिळणारे पाणीच असते. त्यानंतर तब्बल २० आठवड्यांनंतर गर्भातील भ्रूणाचे मूत्राचा भाग अधिक असतो. गर्भ जस जसा गर्भ मोठा होतो तसा तो गर्भाशयात फिरत असतो त्यासाठी गर्भजलाचीच मदत होते. तिसऱ्या तिमाहीत अर्भक गर्भाशयात श्वासोच्छवास करु लागते तेव्हा त्याच्या श्वासाबरोबर हे गर्भजल पोटात जाते. वर म्हटल्याप्रमाणे गर्भजल हे बाळाचे संरक्षक कवच qकवा गादीसारखे असते ज्याच्यामुळे बाळ गर्भात आरामात फिरते. पण काही वेळा मात्र गर्भजलाचे प्रमाण खूप कमी होते. त्या अवस्थेला ऑलिग्रोहाईड्रमनीओस म्हटले जाते.

 गर्भजलाचे प्रमाण कसे ठरवले जाते तर

१ गर्भजलाचे प्रमाण ५०० मिलीलीटरपेक्षा कमी

२ गर्भजल पिशवीची उंची कमी असेल

३ गर्भजलाचा निर्देशांक ५ सेंटीमीटर पेक्षा कमी असल्यास

गर्भजलाच्या कमतरतेचे परिणाम

गर्भजलाची पातळी गर्भावस्थेच्या कोणत्या काळात कमी होते यावर त्याचे दुष्परिणाम अवलंबून असतात. वर आपण पाहिलेच की गर्भधारणेच्या १२ व्या दिवशीच गर्भजल निर्मितीस सुरुवात होते  त्यानुसार गर्भजल पहिल्या सहा महिन्यात कमी झाले तर परिणामतः गर्भाची वाढ खुंटते.

पहिल्या तिमाहीत आणि दुसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीस गर्भजल कमी झाल्यास गर्भपात होण्याची शक्यता असते. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास मृत गर्भ जन्माला येऊ शकतो.

दुसऱ्या तिमाहीत गर्भजल कमी झाल्यास बाळामध्ये जन्मजात व्यंग निर्माण होऊ शकते, मुदतपुर्व प्रसुती होऊ शकते.

 तिसऱ्या तिमाहीत गर्भजलाचे प्रमाण कमी झाल्यास प्रसुतीच्या वेळी नाळ दबली जाऊ शकते. तसेच बाळाच्या वाढीचा वेगही कमी होतो. तसेच सी सेक्शन प्रसुती होण्याची शक्यता अधिक असते.

गर्भजलाचे प्रमाण कमी झाल्यास बाळांच्या अवयवांचा विकास होत नाही तसेच व्यंगही निर्माण होऊ शकते.

 गर्भजलाचे प्रमाण कमी झाल्यास प्रसुतीमध्ये गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ बाळाला गर्भात फिरण्यास वाव नसल्याने बाळाचे डोके वर असेल तर ते खालच्या बाजूला होऊ शकत नाही. त्यामुळे नैसर्गिक प्रसुती होऊ शकत नाही.

  गर्भजलकोष लवकर फाटला आणि पाणी अंगावरून जाऊ लागले तर मात्र मुदतपूर्व प्रसुती होऊ शकते. तसेच गर्भजल बाहेर आल्याने गर्भाला संसर्ग होऊ शकतो.

 प्रसुती कळा येत असताना गर्भजल कमी झाल्यास गर्भाला त्रास होतो qकवा बाळावर दबाव येतो आणि बाळ गर्भातच शी करू शकते. मेकोनियम नावाचा काळ्या रंगाचा घटक त्यात असतो. अशा परिस्थितीत बाळाने श्वास घेताना हा पदार्थ नाकात गेल्यास बाळाला जन्मानंतर श्वसनाचा त्रास होण्याची शक्यता असते. तसेच गर्भजल कमी झाल्याने बाळाच्या गळ्याला नाळेचा वेढा पडू शकतो.

गर्भजल कमी होण्याची कारणे

गर्भजल कोषाला छिद्र पडल्याने ते वाहून जाते आणि गर्भजल पातळी कमी होते.

मातेचे आरोग्य बिघडल्यास गर्भजलावर त्याचा परिणाम होतो. मधुमेह, रक्तदाब या आजारांच्या गोळ्यांच्या परिणामस्वरुप गर्भजल कमी होते.

गर्भावस्थेत आईला सकस आहार न मिळाल्याने आलेला अशक्तपणा

 गर्भामध्ये फुफ्फुस, किडनी यांच्या अनुवांशिक व्याधी गर्भात पहिल्या सहा महिन्यात निर्माण होतात. तेव्हाही गर्भजलाची पातळी कमी होते.गर्भाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांत येणारा अडथळा.

प्रसुतीच्या तारखेनंतरही २ आठवडे झाल्यास.

 उपचार

अंतःस्रावी कॅथेटरच्या मदतीने प्रसुतीदरम्यान गर्भजल दिले जाऊ शकते. या अतिरिक्त गर्भजलामुळे प्रसुतीदरम्यान नाळेभोवती संरक्षक कवच तयार करते. त्यामुळे सी सेक्शन प्रसुती होण्याची शक्यता कमी होते.

प्रसुतीपुर्वी गर्भजलाचे इंजेक्शनही दिले जाते. अर्थात त्यामुळे गर्भजला पातळी पुन्हा कमी होणार नाही याची काहीच शाश्वती नाही. मात्र यामुळे गर्भाच्या शारिरीक रचनेचे निरीक्षण करणे शक्य होते. तसेच त्याविषयी अंदाज व्यक्त करणे शक्य होते.

 आईच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण भरून काढण्यासाठी तोंडाद्वारे किंवा  सलाईन द्वारे गर्भजलाचे प्रमाण वाढवले जाते.

गर्भजल कमी होण्याची समस्या उद्भवू नये म्हणून गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यापासूनच गर्भवती स्त्रीने योग्य काळजी घ्यावी. नियमित पणे डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करावी तसेच योग्य प्रमाणात पाणी प्यावे. सकस आहार घ्यावा. जेणेकरून गर्भातील बाळाचे योग्य पोषण होऊ शकेल. तसेच शरीराची योग्य तितकी हालचाल आणि पुरेसा आराम दोन्हीकडे लक्ष द्यावे.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon