Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

गर्भधारणेत पॅरासिटामॉलची गोळी घेतल्याने काय होते ?


गरोदरपणात गोळ्या खात नाहीत ह्याविषयी तुम्हाला माहिती आहेच. नाहीतर तुमहाला सांगतो की, गर्भधारणेत गोळ्या घेतल्याने त्याचा परिणाम गर्भातल्या बाळावर पडत असतो. आणि डेन्मार्कमधील कोपेनहेगेन विद्यापीठ रुग्णालयातील डेव्हिड क्रिस्टेन्सेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गर्भधारणेत पॅरासिटामॉलचे सेवन केल्याने होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला. आणि त्यातून काय आढळून आले ते तुम्हाला ह्या ब्लॉगमधून सांगणार आहोत.

१) गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉल घेतल्याने होणाऱ्या दुष्परिणामांचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी तीन अहवालांचा अभ्यास केला. त्यात जन्माला येणाऱ्या मुलीच्या प्रजनन क्षमतेवर विपरित परिणाम होत असल्याचे दिसून आले. पॅरासिटामॉल किंवा अ‍ॅसेटामिनोफेन ही औषधे जगभरातील गरोदर महिला घेतात. याच संशोधनाच्या आधारे पॅरासिटामॉल घेतल्याने पुरुषांच्या आणि महिलांच्या प्रजनन प्रणालीवर होणारा परिणाम तपासण्यात येणार होता. मात्र हे संशोधन अद्याप सुरू आहे.

२) गर्भधारणेत वेदनाशामक म्हणून पॅरासिटामॉलचे सेवन केल्याने महिलेच्या प्रजननक्षमतेवरही काही प्रमाणात परिणाम होतो. मात्र जन्माला येणाऱ्या मुलीवर त्याचा गंभीर परिणाम होऊन प्रजननक्षमता कमी होते.

         ३) गर्भधारणेत सौम्य वेदनाशामक औषधे (पॅरासिटामॉल) जन्माला येणाऱ्या मुलीच्या प्रजननक्षमतेला बाधक असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात स्पष्ट झाले आहे.

 

४) तीन अहवालांचा अभ्यास केल्यानंतर याविषयी संशोधन मांडण्यात आले आहे. त्यामुळे हा चिंतेचा विषय ठरू शकतो. मात्र तरीही या संशोधनाला पुष्टी मिळण्यासाठी आणखी काही बाबी स्पष्ट होणे गरजेचे आहे, असे क्रिस्टेन्सेन म्हणाले. गरोदर महिलांनी कोणतेही औषध घेण्याआधी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 

        साभार - लोकसत्ता 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon