Link copied!
Sign in / Sign up
12
Shares

गर्भधारणेसाठी किती काळ लागतो?

गर्भधारणेसाठी किती काळ लागतो?

तुम्हाला गरोदर होण्यास किती काळ लागेल, हे कुणीही अचूकपणे सांगू शकत नाही. पण दाम्पत्यांना गर्भधारणा करण्यास साधारणपणे किती काळ लागतो आणि तुम्ही त्याला कशी गती देऊ शकता, हे आम्ही तुम्हाला सांगू शकतो.

गर्भधारणा करण्यास किती काळ लागतो?

बहुतांशी जोडपी त्यांनी प्रयत्न चालू केल्यापासून तीन महिन्यांच्या आत गरोदर होतात. जर तुमचे जास्त वयोमान असेल, गर्भधारणा रोखणाऱ्या सवयी असतील (जसे की धूम्रपान) किंवा गर्भधारणेवर परिणाम करणारा आजार असेल; तर तुम्हाला जास्त कालावधी लागू शकतो!

गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असलेल्या सर्व दाम्पत्यांमध्ये

30% जोडपी पहिल्या चक्रामध्ये (साधारण एक महिन्यात) गरोदर होतात.

60% तीन चक्रांमध्ये (साधारण तीन महिन्यांत) गरोदर होतात.

80% सहा चक्रांमध्ये (साधारण सहा महिन्यांत) गरोदर होतात.

85% बारा चक्रांमध्ये (साधारण एक वर्षामध्ये) गरोदर होतात.

91% छत्तीस चक्रांमध्ये (साधारण तीन वर्षांमध्ये) गरोदर होतात.

93 ते 95% अठ्ठेचाळीस चक्रांमध्ये (साधारण चार वर्षांमध्ये) गरोदर होतात.

जर तुम्ही कोणत्याही यशाविना एक वर्ष प्रयत्न करत असाल; तर गर्भधारणा तज्ज्ञाची मदत घेणे हिताचे ठरते. तुम्ही प्रयत्न करत राहिलात, तर आपणहून गरोदर होऊ शकता; पण तुमच्यामध्ये कोणती गर्भधारणाविषयक समस्या आहे का, ते लवकर जाणून घेणेच योग्य आहे; म्हणजे तुमचा मौल्यवान वेळ वाया जाणार नाही.

जर तुम्ही 35 वा त्यापेक्षा जास्त वयाचे असाल; तर लवकरात लवकर एक पूर्ण फर्टिलिटी वर्कअप करून घ्या. जर तुम्ही सहा महिन्यांच्या आत गरोदर झाल्या नसाल; तर गर्भधारणा तज्ज्ञाची भेट घ्या.

गरोदर होण्याबाबत: समागम कधी करावा?

सर्व दांपत्यापैकी 80 ते 90 टक्के जोडपी नैसर्गिकपणे गर्भधारणा करतात. 10% दांपत्यांचे नंतर वंध्यत्वाचे निदान होते. (साधारण 93 ते 95% दांपत्यांची गर्भधारणा जर त्यांनी खूप काळ प्रयत्न केला की नैसर्गिकपणे होते. त्यांमध्ये काहींना वाट बघत बसण्याऐवजी लवकर मदत मिळते.)

वंध्यत्वाचे निदान म्हणजेच तुम्ही गरोदर होण्यासाठी एक वर्ष प्रयत्न केला; तरी अयशस्वी ठरलाय. (तुम्ही 35 वा जास्त वयाचे असाल आणि कोणत्याही यशाविना सहा महिने प्रयत्न केल्यानंतर गर्भधारणा तज्ज्ञाकडे जायला पाहिजे, हे खरे असले; तरी एक वर्ष पूर्ण झाल्याशिवाय तुमचे वंध्यत्वाचे निदान होत नाही.)

एकदा वंध्यत्वाचे निदान झालेल्या दाम्पत्यांनी वैद्यकीय मदत घेतली की, त्यातले भरपूर कालांतराने गरोदर होतात. उर्वरित दांपत्ये बाकी पर्यायांचा विचार करतात: जसे की वीर्यदान, सरोगेसी किंवा दत्तक घेणे.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon