गर्भधारणा कशी होते हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ बघा.
गर्भधारणा कशी होते हे एक रहस्यच आहे. स्त्री-पुरुषाच्या मिलनातून एक छोटासा जीव जन्माला येतो. हे रहस्य म्हणजे गर्भधारणा कशी होते हे व्हिडिओच्या आधारे जाणून घेऊया
१)मासिक पाळी सुरू झाल्यानंतर साधारण १४व्या दिवशी स्त्रीच्या अंडकोषातून एक बीजांड बाहेर पडते.(प्रत्येक स्त्रीच्याबाबतीत हा दिवस वेगळा असू शकतो)
२)स्त्रीबीज बीजनलिकेमध्ये शिरते. या बीजामध्ये फलित होण्याची क्षमता साधारणत: २४ तासांपर्यंत असते. या कालावधीत जर शुक्रजंतूशी जर मिलन झाले तर गर्भधारणा होण्याचा संभव असतो.
३)शारीरिक संबंधांनंतर शुक्रजंतू गर्भाशयातून बीजनलिकेत शिरतात.
४)या गर्भनलिकेत स्त्रीबीजाच्या चारही बाजूंनी शुक्रजंतू चिकटतात. एका रासायनिक प्रक्रियेमुळे स्त्रीबीजाच्या सभोवताली असलेल्या Zonapellucida या आवरणामध्ये छेद निर्माण होतो व शुक्रजंतूमधील केंद्रक म्हणजे गुणसूत्र असलेला भाग स्त्रीबीजाच्या आत शिरतो.
५)त्याच वेळी असे काही बदल होतात, ज्यामुळे एकापेक्षा जास्त शुक्रजंतू स्त्रीबीजाच्या आत शिरू शकत नाहीत. अश्याप्रकारे फलित झालेल्या स्त्रीबीजाला 'Zygote' असे म्हणतात. ही बाळाच्या अस्तित्वाची पहिली खूण असते . यानंतर गर्भारपणाला सुरवात होते.