Link copied!
Sign in / Sign up
8
Shares

गर्भधारणेची तपासणी नेमकी केव्हा करावी ?

 

गरोदर आहे की, नाही ह्याबाबत  स्त्रीला उत्सुकता असते. पण नेमक्या कोणत्या गोष्टीमुळे मी गर्भवती आहे. त्यासाठी कोणत्या गोष्टी आहेत त्या माहिती करून घेणे महत्वाचे आहे. सर्व गरोदरपणाच्या तपासणीत शरीरात गर्भावस्था हॉर्मोन ह्यूमन कोरिओनिक गोनाडोट्रॉफिन (hCG) ची मात्रा बघितली जाते. तेव्हा ह्याविषयासंदर्भात जास्त माहिती जाणून घेऊ.

१) घरात जी तपासणी केली जाते. म्हणजे लघवीद्वारे जी तपासणी करतो त्यात एच.सी.जी. ची मात्रा बघतो आणि त्यावरून ठरवतो. पण काही तपासण्या खूप संवेदनशील असतात. त्या किटमधून एच.सी.जी. ची कमी मात्रा सुद्धा समजू शकतो. अशी तपासणी मासिक पाळीच्या चार दिवस अगोदर आणि गर्भधारणेच्या सात दिवसानंतर एच.सी.जी. आहे की नाही हे समजू शकते.

२) गरोदर तपासणी करण्याचे किटच्या पॅकेजिंगवर एम.आई.यू./एम.एल. (मिली इंटरनेशनल यूनिट प्रति मिलीलीटर) दिलेले असते. आणि गरोदर तपासण्याची क्षमता 10 एम.आई.यू./एम.एल. से 40 एम.आई.यू./एम.एल. च्या दरम्यान असते. आता हे समजायला थोडे अवघड आहे, वाटल्यास ह्या गोष्टी तुम्ही डॉक्टरांना भेटायला जाल तेव्हा त्यांना विचारू शकता. कारण ते ह्या गोष्टी सविस्तर तुम्हाला सांगतील.

३)  जर तुम्ही गरोदरपणाच्या सुरुवातीलाच किट ने चेक केले तर तुम्हाला तुमच्या लघवीत एच.सी.जी. ची मात्रा खूप कमी आढळून येईल तर ह्याचा अर्थ लगेच असा नाही लावता येईल की, तुम्ही गरोदर नाही आहेत. त्यासाठी थांबावे लागेल.

४) ह्यासाठी मास्क पाळीच्याच दिवशी म्हणजे डिंबोत्सर्जन च्या दोन आठ्वड्यानंतर गरोदरपणाची तपासणी करावी. म्हणजे परिणाम अचूक येतील.

५) मासिक पाळी चुकल्यावरही १० मधून एखाद्या स्त्रीमध्ये एच.सी.जी. चा अंश खूप कमी असू शकतो. आणि तुमची तपासणी निगेटिव्हही येऊ शकते. आणि ह्यामध्ये काही स्त्रियांची मासिक पाळी नाही आलीच तर तीन दिवसनंतर हार्मोन चा स्तर वाढतो, त्यात तुम्हाला दिसून येईल. ह्या तपासणीत परिणाम पॅझिटिव्ह येईल.

६) रक्ताची तपासणी करू शकता. कारण लघवीपेक्षा रक्ताची तपासणी खूप अचूक येत असते. आणि ह्यात लवकरच समजून येते की, तुम्ही गरोदर आहात की, नाही.  

७) ह्यात तुमच्या मासिक पाळीचा खुप महत्वाचा संबंध आहे तेव्हा ह्यात काही समस्या असेल. तर डॉक्टरांकडून त्यावर उपचार घेता येतील.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon