Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

गर्भधारणेच्या काळात जोडीदारीशी वाद कसे टाळावेत ?


प्रेग्नंट राहणं ही काही तेवढी सोपी बाब नाही. प्रेग्नंट होण्यासाठी जोडप्याला महिन्यातील फक्त 20 टक्के वेळ मिळतो. यादरम्यान प्रणयक्रिडा झाली, असेल तरच महिले प्रेग्नंट राहू शकते. त्यामुळे या काळात दोघांनीही चिंतामुक्त राहणे खूप आवश्यक असते. त्यावेळी दु;खी, तणावग्रस्त असता कामा नये.

याच दुःखी असल्यामुळे आणि असहायतेमुळे वाद होतात. त्यातून असंतोष, चिडचिड, आणि मोठे वाद होऊ शकतात. त्यातून तुमच्या जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करा. तेसुद्धा तुमच्या प्रमाणेच खूप तणावाखाली आहेत, हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्ही वाद टाळून तुमचं प्रेमाचं नातं टिकवणं आणि एकमेकांना मदत करणं खूप आवश्यक आहे. अन्यथा या काळात तुमच्या नात्यात खूप वाद निर्माण होऊ शकतात. त्यासाठी तुमच्यातील वाद टाळण्यासाठी आम्ही इथे तुम्हाला काही टीप्स देणार आहोत.

अडथळे स्वीकारा


नात्यात अशी वेळ बऱ्याच वेळा येते की, दोघंही खूप फ्रस्ट्रेटेड आणि असहाय्य झालेले असतात. त्यासाठी ते एकमेकांना दोष देत असतात. त्यावेळी तुमच्या भावनांचा खूप उद्रेक होतो. पण त्याचवंळी गर्भधारणेचा विचार करताना या गोष्टी होणं सामान्य बाब आहे, हेही तुम्ही समजून घेणं आवश्यक आहे. त्यातून कुणालाही दोषं देणं योग्य नाही. त्यामुळे तुम्हाला हे वास्तव स्वीकारणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे ही बाब समजून घेऊन पुढील प्लॅनिंग करणं आवश्यक आहे.

एकमेकांचे सर्वात मोठे चाहते बना 

तुम्ही दोघंही एका भावनिक उद्रेकातून जाताय हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. या काळात तुम्ही एकमेकांना जास्तीत जास्त समजून घेणं खूप आवश्यक आहे. जर तुम्ही प्रेग्नंट राहण्याचा विचार करत असाल, तर हे महत्त्वाच आहे. एकमेकांचा प्रयत्नांचे कौतूक करा. जोडीदाराच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे  त्याच्या पाठीशी उभे राहा. मोकळेपणे बोला, ते तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हे त्यांना सांगा.

विजयाचा आनंद साजरा करा

जर  तुम्ही गर्भधारणेचा विचार करत असाल, तर बाळाचा जन्म हा तुमच्यासाठी सर्वात मोठा विजय असतो. पण जर तुमच्यादृष्टीने तोच एकमेव विजय, असेल तर बाळ होईपर्यंतच्या काळात तुम्हाला पराभव झाल्यासारखे त्यामुळे या काळातील प्रेग्नंट होण्याची थोडी थोडी लक्षणे विजयासारखी साजरी करा. त्यामुळे तुमच्यात उत्साह वाढतो, जो पुढील काळात तुमच्यासाठी उपयुक्त ठरतो.  

फक्त या एकाच गोष्टीचा विचार करू नका

जर तुम्ही प्रेग्नंट होण्यासाठीच तुमचं सर्वस्व देत असाल आणि हेच जर तुमच्या जीवनाचं एकमेव ध्येय बनलं असेल, तर तुम्ही जीवनात आनंदी राहू शकत नाही. त्यामुळे तुम्हा आनंद मिळणाऱ्या इतर गोष्टीही करा. मित्रासोबत बाहेर जा, नाईट आऊटचे प्लॅन बनवा. मोठ्या ट्रीपला जा. तुम्हाला जे काही करायचं ते करा. जर एकदा बाळाच्या जन्माचा प्रवासस सुरू झाला, की तुम्हाला या गोष्टींसाठी वेळ मिळणार पण नाही.

गर्भधारणेसाठी फक्त योग्य वेळ आणि योग्य पद्धत आवश्यक असते असं नाही. तर तुम्ही ज्या व्यक्तींवर प्रेम करता त्यांच्यासाठी तुमच्या लाईफस्टाईलमध्येही मोठे बदल करणं खूप आवश्यक असतं. तुमच्या जोडीदाराशी आपली वचनबद्धता वाढवून मजबूत करणंही तेवढंच आवश्यक असतं.   

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon