Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

गर्भवती स्त्रियांना मलावरोध कसा दूर करता येईल ?

 गरोदर स्त्रीला फायबर खाण्याविषयी प्रत्येक जण सांगत असतो. पण नेमकं फायबर म्हणजे काय ? आणि ते कसे मिळवता येते. ते का घ्यायला हवे. आणि फायबर घेतल्याने शरीराला व गरोदरपणात काय फायदा होतो. ह्या सगळ्या गोष्टीविषयी तुम्ही एक गरोदर स्त्री म्हणून आणि स्त्री म्हणून जाणून घ्यायला हवे. त्यासाठी फायबरचे महत्व व माहिती देणारा हा ब्लॉग.

१) आपल्या आहारात फायबरचा समावेश करणे काही अवघड नाही. फायबर अनेक प्रकारच्या भाज्या, धान्य,फळांमधून मिळते. जास्त प्रमाणात प्रोटिन आणि कमी प्रमाणात कार्बोहायड्रेट घेतल्याने शरीरातील फायबर कमी होत जाते. सध्या पास्ता, ब्रेड, स्नॅक्स इत्यादी. प्रोसेस्ड फूड,जंकफूड खाल्यानेही फायबर कमी होते पास्ता, ब्रेड, स्नॅक्स इत्यादी.

२) बद्धकोष्ठतेचे महत्त्वाचे कारण म्हणजे शरीराला पुरेशा प्रमाणात फायबर मिळत नाही. प्रत्येकाने आपल्या आहारात फायबरचा समावेश करून सर्व अडचणींपासून दूर राहा. बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास डोकेदुखी,अस्वस्थपणा, गॅसेसचा त्रास इत्यादी समस्याही निर्माण होतात.

३) जर तुमच्या आहारात फायबर नसेल तर वजन वाढण्यास सुरवात होते. फायबरयुक्‍त पदार्थ तुलनेने जास्त चावून खावे लागतात. उच्च फायबरयुक्त पदार्थांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आणि उष्मांक कमी असतात. तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढली असेल तर फायबरचे सेवन कमी झाले आहे हे लक्षात घ्या.

४) विरघळणारे फायबर विशेष करून छोट्या आतड्यातून रक्‍तातील शर्कराचे शोषण थोडे उशिरा करते. या क्रियेमुळे रक्‍तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. खाल्यानंतर किंवा जेवल्यानंतर परत भूक लागली तर तुमच्या जेवणावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. रोजच्या जेवणात फायबरयुक्‍त पदार्थांचा समावेश नसल्यास अशी परिस्थिती उद्भवते. जेवणानंतर लगेच पचनाशी संबंधित अडचणी असल्यास योग्य डॉक्टरांच्या सल्ल्य्याने आहारात बदल करा.

५) वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, राजमा यासारख्या धान्यातून मुबलक प्रमाणात फायबर मिळते. त्यामुळे त्यांचा नियमित आहारात समावेश करा. याखेरीज निय मितपणाने जास्तीत जास्त फळे खावीत. नास्पती, सफरचंदासारखी फळे सालासकट खावीत. त्यांच्या सालांमध्येच भरपूर फाबर असते. नेहमीच्या तांदळासोबत ब्राऊन राईस अधूनमधून खावा. ओटस्मध्ये बीटा ग्लूकन असून त्यातील फायबर शरीराची रोगप्रतिकारकशक्‍ती वाढवते. या प्रकारचे फायबर शरीराला अत्यावश्यक असते. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon