Link copied!
Sign in / Sign up
13
Shares

गर्भवती स्त्रीने गरोदरपणात ह्या गोष्टी कराव्यात


एखाद्या गर्भवती महिलेच्या आहाराचा तिच्या बाळाच्या जन्मावेळच्या वजनावर थेट परिणाम होतो. गर्भधारणेदरम्यान संरक्षणात्मक अन्न मोठ्या प्रमाणात घेतले पाहिजे.

गर्भवती महिलांना अतिरीक्त 300 किलो कॅलरी ऊर्जा, अधिक 15 ग्रॅम प्रथिनं आणि 10 ग्रॅम चरबी गर्भधारणेच्या काळाच्या मध्यापासून आवश्यक असते.

* गर्भधारणेदरम्यान आणि स्तनपानादरम्यान हाडे आणि दांत यांच्या सुयोग्य निर्मितीसाठी तसंच स्तनातून दूध येण्यासाठी अतिरीक्त प्रमाणात कॅल्शिअमची आवश्यकता असते.

* गर्भधारणेदरम्यान लोहाची कमतरता झाल्यास माता मृत्यु दर आणि जन्मावेळी वजन कमी राहण्याची शक्यता वाढते. म्हणून, लोहसमृध्द अन्न घेणं अत्यावश्यक आहे.

*** गर्भधारणेदरम्यान काय करावे, काय करु नये

* गर्भधारणेदरम्यान आणि स्तनपान करवण्याच्या काळात अधिक अन्न घ्यावे.

एक अतिरीक्त जेवण चालू शकेल.

* संपूर्ण धान्य, मोडवलेलं कडधान्य आणि आंबवलेले पदार्थ खावेत.

* दूध । मांस । अंडे यांचे सेवन करावे.

* भरपूर पालेभाज्या आणि फळे खावीत.

* मद्य किंवा तंबाकू यांचे सेवन करु नये.

* लिहून दिली असतील तेव्हाच औषधे घ्यावीत.

* गर्भधारणेच्या 14-16 व्या आठवड्यानंतर नियमितपणे लोह, फोलेट आणि कॅल्शिअमचा पूरक डोस घ्यावा आणि स्तनपान करवण्यादरम्यान तो चालू ठेवावा.

* चहा आणि कॉफी यांसारखी पेये आहारातील लोहाला बांधून ठेवतात आणि उपलब्ध होऊ देत नाहीत, त्यामुळं ती आहारापूर्वी आणि नंतर लगेच घेऊ नयेत.

* गर्भवती महिलांना चालणे आणि अन्य शारीरिक कामं आवश्यक आहेत आणि त्यांनी अति शारीरिक काम, विशेषतः गर्भधारणेच्या अंतिम महिन्यात टाळावे.

 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon