Link copied!
Sign in / Sign up
54
Shares

४ फायदेशीर सेल्फ-फर्टीलिटी (गर्भवती राहण्यासाठीचे) मसाज.


स्वतःचे बाळ असणे हे कोणत्याही विवाहित स्त्रीचे मोठे स्वप्न असते. आई झाल्यावर गगनात मावणार नाही इतका आनंद कोणत्याही स्त्रीला होईल. आपल्यालाही बाळ व्हावे, बाळाचे संगोपन करावे, त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींतून आपणही आपले बालपण आठवावे असे प्रत्येक आई होऊ पाहणाऱ्या स्त्री ला वाटत असते. आयुष्यभर जपून ठेवण्यासाठी या आठवणी असतात. पण कधीतरी हे स्वप्न पूर्ण होण्यात अडचणी येतात. शेवटी ही तुमची जबाबदारी असते की तुमचे बाळाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हीच काही ठोस पाउले उचलवीत. आम्ही तुमची ही समस्या जाणतो आणि म्हणूनच तुमच्या मदतीसाठी आम्ही आज इथे काही फर्टीलिटी मसाज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत जे तुम्ही स्वतः देखील करू शकता. गर्भधारणा होण्यासाठी याचा नक्कीच तुम्हाला खूप उपयोग होईल.

 

फर्टीलिटी मसाज म्हणजे काय?

फर्टीलिटी मसाज म्हणजे एका विशिष्ठ पद्धतीने तुमच्या अंडाशयातील रक्ताभिसरण वाढावी यासाठी पोटावर केला जाणारा मसाज. या प्रकारचे मसाज करण्यासाठी कोणतेही औषध घ्यावे लागत नाही किंवा कोणत्याही रसायनांचा वापर इथे केला जात नाही. फर्टीलिटी मसाज तुम्ही स्वतः तुमच्या हाताने तुमच्या अंडाशय व गर्भाशयाच्या जागी तुमच्या पोटावरून करू शकता. यातून ओव्युलेशन आणि रिलीज या दोन्ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यास मदत होईल. यातून फर्टीलिटी वाढण्यास मदत देखील होईल. गर्भाशयाच्या आरोग्यासाठी हे मसाज सोपे आणि उत्तम आहेत.

वेगवेगळ्या पद्धती.

या मसाज करण्याच्या एकूण ४ पद्धती आहेत. यातून तुम्हाला गर्भधारणा होण्यासमदत होईल. इथे आम्ही ते सविस्तर मांडले आहेत.

१. गर्भाशयाचा मसाज. (युटेरीन लिफ्ट)

आजकाल वाढत्या फास्ट फूड आणि खाण्याच्या चुकीच्या वेळांमुळे स्त्रियांच्या गर्भाशयाची त्यांच्या शरीरातील स्थिती बदलत चालली आहे. गर्भाशयाला त्याच्या मूळ पोझिशन वर आणण्यासाठी हा मसाज तुम्हाला उपयुक्त ठरू शकतो. म्हणूनच या मसाजला युटेरीन लिफ्ट असे देखील म्हटले आहे.

दिलेल्या सूचनांचा वापर करून हा मसाज करा.

- एका समान पुष्ट्भागावर झोपा आणि तुमच्या गुडघ्यांच्या खालच्या बाजूस एक छोटी उशी ठेवा जेणेकरून तुमची पाठ रीलाक्स राहील.

- हळुवारपणे तुमचा बोट तुमच्या प्युबिक बोन वर ठेवा जे तुमच्या प्युबिक हेअरलाईनच्या बरोबर खाली आहे.

- हळुवारपणे तुमची बोटे वरती गर्भाशयाच्या दिशेने घेऊन या. या मसाज करतांना अलगद दाब द्या. खालून वरती या तर्हेने हा मसाज करा.

- गर्भाशयाजवळ आल्यावर बोटांनी दाब देऊन गर्भाशय वर उचला आणि १० सेकंद याच स्थितीत ठेवा.

- गर्भाशयाला उचलून दाब सोडून द्या आणि परत हीच क्रिया करा. असे दिवसातून ३ वेळा करा.

२. ओव्हरी मसाज.

या मसाज मुळे तुमच्या अंडाशयांना मिळणारे ऑक्सिजनयुक्त रक्त वाढेल. रक्तप्रवाह वाढल्यास तुमची फर्टीलिटी देखील वाढणार यात शंका नका. खाली दिलेल्या स्टेप्स नुसार हा मसाज करा.

- एका सपाट पुष्टभागावर झोपा. तुमच्या गुडघ्यांच्या खालच्या बाजूस एक उशी ठेवा जेणेकरून तुमची पाठ रीलाक्स राहील. दोन्ही हात गरम करण्यासाठी एकमेकांवर चोळून घ्या.

- दीर्घ श्वास घ्या आणि हळुवार सोडा. असे ३-४ वेळा करा. तुमचा जबडा मोकळा करून घ्या.

- बोटांच्या सहाय्याने अंडाशायांवर दाब देऊन गोलाकार मसाज करा.

- घडल्याच्या काट्यांच्या दिशेनेच हा गोलाकार मसाज करावा. उजव्या आणि डाव्या बाजूच्या दोन्ही ओव्हरी बोटांच्या सहाय्याने लोकेट करून हा मसाज करा.

जर तुम्हाला अंडाशयाच्या आजूबाजूस स्नायू लागत असतील तर त्यांना रीलाक्स करण्यासाठी बोटांचा दाब वाढवा.

- शेवटी एक दीर्घ श्वास घेऊन हळूहळू सोडा आणि मसाज पूर्ण करा.

३. रीप्रोडकटीव—ऑर्गन मसाज.

या मसाज मुळे तुमची अन्नपचन क्रिया सुधारेल आणि सोबतच प्रजनन क्षमता देखिल वाढेल. यात प्रजनन अवयवांचा मसाज आहे. खाली दिलेल्या स्टेप्स वापरून हा मसाज करा.

- एका सपाट पुष्टभागावर झोपा. तुमच्या गुडघ्यांच्या खालच्या बाजूस एक उशी ठेवा जेणेकरून तुमची पाठ रीलाक्स राहील.

- दोन्ही हात एकमेकांवर चोळून गरम करून घ्या. मसाजसाठी तुम्हाला हवे असल्यास एखाद्या तेलाचा वापर तुम्ही करू शकता.

- डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या. यानंतर श्वासांवर लक्ष केंद्रित करा.

- तुमच्या एका हाताचा तळवा तुमच्या पोटाच्या नाभीवर ठेवा आणि दुसऱ्या हाताचा तळवा पहिल्या हातावर ठेवा.

- हळुवारपणे नाभीच्या आजूबाजूच्या जागेवर हाताने मसाज करा. हा मसाज घडल्याच्या काट्याच्या दिशेने करा.

- अलगद तुमच्या पेल्व्हिक भागात म्हणजे उटीपोटाकडे सरका आणि तिथे पण मसाज करा. हा मसाज तुम्ही नाभीच्या वर आणि खाली करू शकता.

- यानंतर तुमच्या फुफुसांच्या लगेच खालच्या पोटापासून नाभीपर्यंत मसाज करा. मसाज करतांना हात हलका ठेवा आणि नेहेमी मसाजची दिशा वरून खाली अशी ठेवा.

- एका वेळी 30 वेळा हा गोलाकार मसाज करा आणि दिवसातून १ वेळा हा मसाज घ्या.

४. जनरल फर्टीलिटी मसाज.

 

हा मसाज रोज १५ मिनिटांसाठी करा. तुमचे मूत्राशय रिकामे आहे याची खात्री करूनच हा मसाज करा. खाली दिलेल्या काही स्टेप्स यासाठी काळजीपूर्वक वापरा.

- दोन्ही हात एकमेकांवर चोळून गरम करा आणि हातांनी तुमचे गर्भाशय लोकेट करा.

- हाताच्या बोटांनी गर्भाशयाच्या वरच्या टोकास पोटावरून हलका दाब द्या.

- आता हळू हळू गोलाकार दिशेने मसाज करत तुमच्या उटीपोटातील अवयवांवर हलका जोर द्या. तुम्हाला घट्ट वाटेल . हा मसाज अलगद आणि घडल्याच्या काट्याच्या दिशेनेच करा.

- एकूण २० वेळा हा मसाज करा.

काही लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी म्हणजे, हा मसाज तुमच्या मासिक पाळी आणि ओव्ह्युलेशन या दोन प्रक्रियांच्या मधल्या काळातच करावा. तुम्ही गरोदर असाल किंवा मासिक पाळी चालू असेल तर हा मसाज करू नका.

मसाजचा उपयोग वाढवण्यासाठी तुम्ही तेलाचा वापर करू शकता. आम्ही एरंडेल तेल किंवा बदामाचे तेल यांचा पर्याय सुचवू. या दोन्ही तेलांचा प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी खूप उपयोग होतो. 

हॅलो मॉम्स... आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.

Tinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया... हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon