Link copied!
Sign in / Sign up
0
Shares

गर्भवती असताना अशी घ्या त्वचेची काळजी


प्रत्येक आईसाठी तिचा गर्भारपणातील काळ हा अत्यंत आशेचा आणि आनंदाचा असतो. पण आईच्या त्वचेसाठी हा काळ म्हणजे थोडा वेदनादायी ठरू शकतो. या दरम्यान ताणली जाणारी त्वचा ही खूप मर्यादेपेक्षा जास्त असते. या प्रक्रियेमुळे त्या स्त्रीची ही जबाबदारी असते की, गर्भवती असताना आपल्या त्वचेची नियमित काळजी घेणे. जशी आपल्या लहान बाळाची काळजी घेण्यासाठी तयार असता तशीच काळजी स्वत:च्या त्वचेची घेणे गरजेचे असते. आज आपण त्वचेच्या आरोग्यासाठी काही टिप्स घेऊ :

- झोपताना मेकअप काढावा : मेकअपसाठी वापरण्यात येणारी उत्पादने दिर्घकाळ आपल्या त्वचेवर राहिल्याने वाईट परिणाम होतात. हे टाळण्यासाठी झोपण्यापूर्वी सर्व मेकअप काढून चेहरा स्वच्छ धुवणे आवाश्यक असते. रात्री झोपताना किमान त्वचेला ऑक्सिजन मिळावा हा त्यामागचा उदेश्य आहे.

रात्री त्वचेचा श्वासोत्छवास चांगला होतो. मेकअप त्वचेवर तसाच असल्यास ही प्रक्रिया होत नाही.

- दररोज आठ ते दहा तास झोपावे : झोपेमुळे शरीराला नवीन उर्जा निर्माण करण्यासाठी शक्ती मिळते. दुसèया दिवशी कामासाठी नवी उर्जा मिळण्याकरता दररोज आठ ते दहा तास झोप आवश्यक असते. कमी वेळ झोपल्याचे परिणाम जसे शरीरावर होतात तसेच ते त्वचेवर देखील होतात. तुमच्या त्वचेचर आलेली गडद काळी वर्तुळे तुम्हाला हेच सांगतात की,तुमची झोप अपूर्ण आहे.

- समतोल आहार : तुमचा यावर विश्वास असो qकवा नसो जसा तुमचा आहार तसेच तुमचे आरोग्य राहते. त्यामुळे तुमचा आहार हा समतोल, चौरस आणि परिपूर्ण असणे आवश्यक असते. तुमच्या दैनंदिन आहारात पोषणमूल्य असलेले पदार्थ,जीवनसत्वे, खनिजांनीयुक्त असावा. चांगल्या त्वचेचे आरोग्य हे आहारावर अवलंबून असते. समतोल आहारानी त्वचेला उजळपणा येतो तसेच त्वचा सैल पडण्यासारख्या समस्या दूर होतात. गर्भवती महिलांनी विशेषत: त्वचेसाठी पोषक आहार घेणे आवश्यक असते.

- कठीण साबणाचा वापर टाळा : साबणातील रसायनांमुळे त्वचेतील नैसर्गिक तेलाचे प्रमाण कमी होते आणि ती कोरडी पडते. रसायनांनीयुक्त साबणाने मृत त्वचेचे प्रमाण वाढते. परिणामी त्वचेवर व्रण उठतात qकवा इतर समस्या उदभवतात. गर्भवती असताना शक्यतो सॉफ्ट qकवा कमी रसायने असलेला साबण,बॉडी वॉश वापरावा. यामुळे त्वचेची होणारी हानी तुम्ही रोखू शकता.

- अनावश्यक ताण घेऊ नका : त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी ताण-तणाव हे एक महत्वाचे कारण आहे.ताणामुळे तुमचा मेंदू जास्त प्रयत्न करेल काही गोष्टी सुधारतील मात्र काही गोष्टींसाठी लागणारे अधिक कार्य तो कमी वेळात करू शकणार नाही. या तणावाचा सर्वाधिक वेगाने पहिला परिणाम हा

त्वचेवर होतो. यासाठी शक्यतो जास्ती ताण घेऊ नये. ही तणावाची परिस्थिती त्वचेवर परिणाम करणार नाही याची काळजी घ्या. ताण-तणावाचे नियोजन जर तुम्हाला जमले तरच तुमची त्वचा निर्धोकपणे श्वासोत्छवास करू शकेल आणि सुरकुत्या कमी पडतील. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon