Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

गरोदरपणात नाभी बाहेर का येते ?

गर्भावस्थेत अनेकविध प्रकारचे मजेशीर किंवा विचित्र कोणतेही असो पण सर्व अनुभव येतात. शरीरातील संप्रेरके आणि आपले शरीर सतत बदल करत असतात आणि शरीरात आई होण्यासाठीचे सर्व बदल घडवले जात असतात. गर्भावस्थेच्या दुसऱ्या तिमाहीत प्रवेश केल्यानंतर गर्भावस्थेचे आश्चर्यकारक अनुभव येण्यास सुरुवात होते.

गर्भावस्थेच्या या काळात पोट वाढू लागते. बाळ पोटात हालचाल करु लागते, आपण पोटाला हात लावल्यावर ते प्रतिसाद देऊ लागते आणि इतरही अनेक गोष्टी होतात. याच काळात बेंबी किंवा नाभीखालील पोट म्हणजे ओटीपोट बऱ्यापैकी सुटून बाहेर आल्यासारखे दिसू लागते. नाभी बाहेर येते कदाचित आपल्याला ते विचित्र वाटू लागते कारण ते आता कपड्यांच्या वरूनही बाहेर दिसू लागते आणि त्यामुळे आपल्याला थोडे ओशाळवाणे वाटू लागते.

१. गर्भावस्थेत नाभी बाहेर का बरे दिसू लागते

याचे अगदी सोपे कारण म्हणजे पोटात दिसामाजी वाढत जाणारा गर्भ. एक छोटे भ्रूण गर्भावस्थेच्या काळात अर्भकात रुपांतरित होते असते आणि ते आकारमानाने वाढत जाते. भ्रुणाचा वाढत जाणारा आकार सामावून घेण्यासाठी गर्भाशय जागा क़रण्यासाठी पोटाला बाहेरच्या बाजूला ढकलते. पुढच्या काळात पोट अजून बाहेर ढकलले जाते आणि पोट एखादे हूड पांघरल्यासारखे दिसते. त्यामुळे ओटीपोट आणि बेबी बाहेर येते. 

२. पुढे आलेले नाभी कसे हाताळावे

ओटीपोट वाढून नेमके कधी नाभी बाहेर येईल अंदाज वर्तवणे कठीणच आहे. पण प्रत्येक गर्भवती स्त्रियांमध्ये हा काळ वेग-वेगळा असू शकतो. तसेच सुटलेले ओटीपोट आणि बाहेर आलेली नाभी कोणत्याही प्रकारची हानी करत नाही आणि त्याविषयी फार चिंता करण्याची आवश्यकता नाही.

३. ओटीपोट आणि बाहेर आलेली नाभी पुन्हा सर्वसामान्य स्थितीत येऊ शकते का

या प्रश्नाचे उत्तर हो असे आहे. प्रसुतीनंतर काही काळाने पोट पुन्हा सामान्या स्थितीत येऊ शकते आणि त्यामुळे नाभी देखील पूर्ववत होते ओटीपोट थोडे ओढल्यासारखे दिसते आणि थोड्या सुरकुत्याही आलेल्या दिसतात पण काहीच हरकत नाही ते आईरपणाची एक खूण आहे तेव्हा आनंदाने स्वीकार करा मिरवा

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon