Link copied!
Sign in / Sign up
56
Shares

गर्भावस्थेत रक्तस्त्राव का होत असतो

एका सर्वेक्षणानुसार असे लक्षात आले आहे की 25% स्त्रिया गर्भावस्थेत असताना रक्तस्त्राव झाल्याची तक्रार करतात, तर 8% स्त्रिया खुप जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे सांगतात . येथे खाली आम्ही 5 कारणे दिली आहेत ज्यामुळे गर्भावस्थेत रक्तस्त्राव होऊ शकतो -

१. इम्प्लांटेशन ब्लीडिंग किंवा स्ट्रीकिंग:

जेव्हा एक फलित झालेले अंडज गर्भाशयात येते तेव्हा याचा परिणाम म्हणून हलका रक्तस्त्राव होऊ शकतो. सामान्यतः हा रक्तस्त्राव एक किंवा दोन दिवस होतो आणि तुमच्या मासिक पाळीच्या दिवसांदरम्यानच हे घडते. यामुळे काही महिलांना वाटते कि त्यांना नेहमीप्रमाणे मासिक चक्र सुरु झाले आहे आणि हलका रक्तस्त्राव होत आहे. पण त्यांना लक्षात येत नाही की त्या गरोदर आहेत.


२. जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होणे.


काही स्त्रियांना गर्भावस्थेत असतांना जास्त रक्तस्त्राव होत असल्याचा अनुभव येतो आणि हे मासिकचक्राच्या दरम्यानच घडते. म्हणजे हे चौथ्या, आठव्या किंवा बाराव्या आठवड्यात होते. याची लक्षणे देखील मासिक पाळी सारखीच असतात जसे, पाठ दुखणे, पोट दुखणे, मूड बदलणे, गॅसेस होणे इ. जर तुम्ही गर्भवती आहात तर तुम्हाला मासिक पाळी येऊ शकत नाही जरी तुम्हाला मासिक पाळी आल्यासारखे वाटत असले तरीही. कारण गर्भावस्थेत शरीरातील संप्रेरके मासिक पाळीला रोखतात. ही संप्रेरके अजून पूर्णपणे तयार झाली नसतील तर रक्त पडते. असे केवळ ३ महिन्यांसाठी घडते. यानंतर अंडाशयात तुमची प्लासेंटा  संप्रेरक तयार करण्यास सुरवात करते. काही महिला गर्भावस्थेच्या संपूर्ण कालावधीत रक्तस्त्राव अनुभवतात आणि तरीही निरोगी बाळाला जन्म देतात.
३. गर्भपात (मिसकॅरेज) होण्याची भीती किंवा खरच गर्भपात होणे.
एका संशोधनात असे दिसून आले आहे की एक त्रितीयांश गर्भवती महिलांचा गर्भपात (मिसकॅरेज) होतो. हे प्रमाण खूप मोठे वाटते आहे पण घाबरू नका गर्भाचे पडणे सुरवातीच्या ३ महिन्यातच होऊ शकते जेंव्हा अनेक मातांना कळत देखील नाही की त्या गर्भवती आहेत. अशाप्रकारचे मिसकॅरेज होण्यामागे कारण असते की या काळात मातेचे शरीर त्या गर्भाला वाढवण्यात असक्षम असते. हे जोखीम गर्भाशय घेऊ शकत नाही तेंव्हा गर्भ पडतो. एकदा तुमच्या गर्भधारणेचे १४-१६ आठवडे झाले की हा धोका नसतो. गर्भपात होण्याची लक्षणे म्हणजे पोट दुखणे, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होणे, पाठ दुखणे, इ.
   
४. संभोग झाल्यानंतर रक्तस्त्राव होणे.
संभोग केल्यानंतर लगेच रक्तस्त्राव झाल्यास गर्भावस्थेत रक्तस्त्राव होत राहतो. यात हानिकारक असे काहीच नाही आणि रक्ताचे प्रमाण जास्त असल्यामुळे असे घडते. यात असामान्य असे काही नसले तरीही संभोगानंतर रक्त पडल्यास तुमच्या डॉक्टरांना जरूर सांगा. तुमच्या डॉक्टर कडून तुम्हाला ‘’तुम्ही अशात सेक्स केला आहे का ?’’अशाप्रकारचे प्रश्न विचारण्यात येऊ शकतात. तुम्हाला सेक्स थांबवण्याची गरज नाहीये परंतु काळजी घ्या की सेक्स करतांना तुमच्या पतीकडून तुमच्या गर्भाशयात सुरक्षित असणाऱ्या बाळाला काही हानी पोहोचणार नाही.

५. . एक्टोपिक गर्भावस्थाएक्टोपिक गर्भावस्था म्हणजे जेंव्हा फलित झालेले अंडे तुमच्या गर्भाशयाच्या बाहेर फेलोपाइन ट्यूब मध्ये रुजले जाते. यात तुम्हालातुमच्या उटीपोटात खूप वेदना होऊ शकतात किंवा तीव्र दुखणे ज्यामुळे तुम्हाला बेशुद्धी येऊ शकते. जशी ही ट्यूब आपोआप तुटून जाते तश्या वेदना अचानक बंद होतात. यानंतरही काही काळाने परत दुखणे सुरु होऊ शकते जे काही तासांसाठी किंवा काही दिवसांसाठी असते ज्यामुळे तुमची तब्येत खालावते. ही एक गंभीर समस्या आहे. एक्टोपिक गर्भावस्था तुमच्या फेलोपाइन ट्यूब ला तोडू शकते आणि यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव होतो. याचा परिणाम म्हणून तुमच्या फेलोपाइन ट्यूबला आणि गर्भाला काढून टाकावे लागते. पण याचा अर्थ असं नाही की तुम्ही पुन्हा गरोदर राहू शकणार नाही. जोपर्यंत तुमचे दुसरे अंडाशय आणि फेलोपाइन ट्यूब योग्य स्थितीत आहेत तोपर्यत तुम्ही गर्भवती राहू शकता.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon