Link copied!
Sign in / Sign up
8
Shares

अनेक स्त्रियांचे गरोदर असताना केस का गळतात

गर्भावस्थेत फोलिक अ‍ॅसिड, कॅल्शिअम आणि जीवनसत्त्वाच्या गोळ्या सुरु करतात त्यामुळे केसाची चांगला वाढ होते. मात्र केस गळतातही खूप जास्त. प्रसुतीनंतर केस गळण्याचे प्रमाण वाढते. त्यानंतरही काही काळ केस गळण्याची समस्या सतत असते. केस गळू नये म्हणून काही औषधेही मिळतात मात्र जोपर्यंत बाळ स्तनपान करीत आहे तोपर्यंत या गोळ्या घेणे अयोग्य आहे त्यामुळे त्यांचा वापर नकोच. काही वेळा केस कोरडे आणि रुक्ष होतात. पण या सर्व समस्यांच्या मुळाशी जाऊन केसाच्या आरोग्याच्या तक्रारी सोडवता येतील.

गर्भावस्थेत आणि प्रसुती नंतर आहारात काही बदल होतात. त्या मुळेही केस गळू शकतात. केस गळण्याची कारणे समजून घेतली पाहिजेत जेणेकरून त्यावर घरगुती उपायही करता येतील.

केस गळणे ही काही जगावेगळी समस्या नाही पण qचतेची बाब जरुर आहे. कारण शरीराला काही आवश्यक पोषक घटकांची कमतरता भासू शकते. प्रसुतीनंतर कित्येक महिने केस गळू शकतात.

केस गळण्याची कारणे-

केस गळण्यासाठी महत्त्वाचे कारण म्हणजे प्रसुतीनंतर हार्मोन्सच्या पातळीमध्ये बरेच बदल होतात. बाळाला स्तनपान सुरु असल्याने केस कमी प्रमाणात गळतात. प्रतिदिन १०० केस गळत असतात. गर्भावस्थेत अ‍ॅस्ट्रोजेन ची पातळी वाढते पण प्रसुतीनंतर मात्र अ‍ॅस्ट्रोजेन वाढण्याची प्रक्रिया थांबते. केस खूप दाट होतात पण गळतातही.

गर्भावस्थेत वाढलेल्या हार्मोन्सच्या पातळीमुळे केस विश्रामअवस्थेत जातात. त्यामुळे प्रसुतीनंतर काही काळ केस गळत नाहीत. पण काहींच्या बाबतीत मात्र प्रसुतीनंतर अगदी पहिल्या महिन्यापासूनच केस गळू लागतात ते पुढील पाच सहा महिने सुरुच राहते.

गर्भावस्थेत अ‍ॅस्ट्रोजेनची पातळी वाढलेली असते त्यामुळे केस झपाट्याने वाढतात. पण प्रसुतीनंतर मात्र आराम करत असल्याने केस खूप गळतात. प्रसुतीनंतरच्या काही महिन्यात केस धुतले किंवा विंचरले तरीही गळतात. दिवसाला १०० केस गळतात असा अंदाज आहे. काही वेळा प्रसुतीनंतर केस गळण्याची समस्या ही अ‍ॅनिमिया किंवा थायरॉईड मुळेही जाणवते.

केस गळती थांबवण्यासाठी 

तणावापासून दूर-

प्रसुतीनंतर केस गळती सुरु होते. त्याचे प्रमाण अधिक असते. तणाव असेल तर ते अधिक गळतात. त्यामुळे गळणाऱ्या केसाची चिंता किंवा इतर कुठलीही चिंता करु नये. त्यामुळे केस अधिकाधिक गळतात.

घट्ट हेअरस्टाईल-

प्रसुतीनंतर शरीर हलके होते असे म्हणतात. त्यामुळे कपडे सुद्धा सैलसर घालण्याचा सल्ला देण्यात येतो. केसही खूप घट्ट बांधू नयेत. खूप घट्ट केस बांधल्यास केस तुटतात, डोक्यावर दाब वाढतो त्यामुळे केस ओढले जातात तुटतात.

पौष्टीक आहार-

गर्भावस्थेत वेळोवेळी पौष्टीक आहार घेतला जातो त्यामुळे त्वचा, केस यांचे आरोग्य चांगले होते. ती गोष्ट प्रसुतीनंतरही करायला हवी. भाज्या, सुकामेवा सेवन केला पाहिजे. त्यात अँटीऑक्सिडंट आणि फ्लॅवोनाईडस असतात. त्यामुळे केसाची मुळे मजबूत होतात.

रसायनयुक्त उत्पादने -

प्रसुतीनंतर लगेचच रोजच्या रोज केस धुवु नयेत. कारण बाळाला सर्दी होते. मात्र नियमितपणे आठवड्यातून एकदा केस धुताना रसायनयुक्त शॅम्पूचा वापर करु नये. हानीकारक रसायनांमुळे केसाची मुळे कमजोर होतात. तसेच स्ट्राँग साबण, शॅम्पू वापरू नयेत. तसेच केस सरळ किंवा कुरळे क़रण्यासाठीची उपकरणेही वापरू नयेत.

केसाचा रंग-

केसाला रंग लावत असाल तर रंगांची निवड करताना काळजी घ्या. उच्च गुणवत्ता असणारा रंग वापरावा. शक्यतो प्रसुतीनंतर लगेचच रंग करण्याच्या भानगडीत पडू नये. रसायनांचा दुष्परिणाम होऊ शकतो.

सतत विंचरू नका-

केस सतत विंचरल्याने केस गळती वाढते. त्याशिवाय ओल्या केसात कंगवा फिरवू नये, किंवा मोठ्या दातांचा कंगवा वापरावा त्यामुळे केस ओढले जाणार नाहीत.

केस कापावे-

बाळ लहान असल्याने खूप मोठ्या केसाची काळजी घेणे, निगा राखणे शक्य नसते त्यामुळे केस छोटे करावे. जेणेकरून ते कमी प्रमाणात गळतील.

घरगुती उपाय-

दही -

केसाला दही लावावे. त्यामुळे केसाचा पोत सुधारतो. शिवाय दही उत्तम कंडिशनर असल्याने केस मऊसुत होतात. तसेच आहारात दही समाविष्ट केल्यास शरीराचे पोषण होते.

हेड मसाज-

तेलाने नियमितपणे मालिश केल्यास रक्ताभिसरण वेगाने होते आणि केसही वाढतात. दिवसभरात कोमट तेलाने पाच दहा मिनिटे मालिश करा. तेल नको असेल तरी नुसते बोटांनी केसांना मालिश करा. त्यामुळे डोके शांत राहते.

मेथी दाणे-

मेथीचे दाणे उत्तम कंडिशनर असतात. रात्री मेथी दाणे पाण्यात भिजवावेत. सकाळी पाणी गाळून ते पाणी १-२ तासांसाठी केसाला लावावे. त्यामुळे केसातील कोंडाही जातो. तसेच भाजलेल्या मेथी दाण्यांची पावडर केसाला लावू शकता किंवा तेलात मेथी घालून लावू शकता.

आवळा-

आवळा केसाच्या आरोग्यासाठी उत्तम असतो. त्यामुळे आवळ्याच्या तेलाने केसाला मालिश करा. शिवाय आवळ्याचे सेवन केल्यानेही फायदा होतो.

नारळाचे दूध-

केसाला नारळाचे दूध लावल्यास केस गळती कमी होते. तसेच नारळाची कवटीची राख करून ती तेलात मिसळून त्याने केसाला मालिश केल्यास केस चमकदार आणि घनदाट होतात.

सुकामेवा आणि जवस-

आहारात जवस किंवा अळशी असावी. त्यामुळे ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड मिळते. तसेच सुकामेवा खाल्ल्याने शरीराचे आतून पोषण होते.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon