Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

गर्भातली पाण्याची पिशवी फाटली तर ?


गरोदरपणाच्या ८ व्या किंवा ९ व्या महिन्यात असताना पाण्याची थैली फाटण्याची भीती वाटत असते. आणि फुटली आहे का अशीही शंका असते. ही पाण्याची पिशवी पोटातल्या बाळासाठी असते. ती पिशवीमुळे बाळ सुरक्षित असते म्हणजे एक प्रकारे पिशवी बाळासाठी कवच असते. तेव्हा ही पाण्याची पिशवी फाटलीच तर काय करायचे आणि खरंच फाटली आहे का ? ते कसे समजेल. ह्या विषयी आपण ह्या ब्लॉग मधून जाणून घेणार आहोत.

१) पाण्याची पिशवी केव्हा फाटते ? 

     ज्यावेळी ऍम्नीऑटिक द्रवाची थैली फाटते. हा ऍम्नीऑटिक द्रव बाळाला कोणत्याही आघातापासून वाचवतो. आणि ज्यावेळी हे फाटते त्यावेळी हे द्रव योनीमधून बाहेर यायला लागते.  

२) जर तुम्ही डॉक्टरांकडे गेलेच तर डॉक्टर तुमची तपासणी करणार. ते तुमचे सर्विक्स (cervix) ची स्थिती पाहणार आणि गरोदरपणाच्या शेवटी काही प्रमाणात द्रव निघत असतेच. आणि हे सामान्यतः होत असते.

३) काही वेळेला पिशवी थोडी फाटुनही जात असते. डॉक्टरांनाही चेक करणे कठीण जात असते. की, नेमकी पाण्याची पिशवी फाटली आहे की, थोड्याफार प्रमाणात द्रव निघत आहे.

४) जर तुमच्या डिलिव्हरीच्या अगोदरच पिशवी फाटलीच तर किंवा ३७ व्या आठवड्याच्या अगोदर फाटली तर ज्याला वेळेअगोदर पाण्याची पिशवी फाटणे असे मानले जाते. ह्याला वैद्यकीय भाषेत प्रीटर्म प्री-लेबर रप्चर आॅफ मैम्ब्रेन (पीपीआरओएम) असे म्हटले जाते.

डॉक्टर कशी तपासणी करतात ?

५) डॉक्टर तपासणीकरिता सॅनिटरी पॅड देतात आणि एक तास झोपायला सांगतात. ह्यामधून ते हे जाणण्याचा प्रयत्न करतात की, खरंच द्रव बाहेर निघत आहे का? किती प्रमाणात ? हे सर्व बघत असतात. ह्यातून समजते की, पिशवी फाटली आहे की नाही.

६) ह्यानंतर ते तुमचा पॅड चा रंग बघतात आणि त्या द्रवावरून ठरवले जाते की, ही लघवी आहे की, ऍम्नीऑटिक द्रव. कारण ऍम्नीऑटिक द्रव स्वच्छ आणि हलका पिवळा दिसतो. ह्यात थोडे रक्ताचे डाग सुद्धा असू शकतात. आणि ह्याचा वास लघवीपेक्षा वेगळा येतो.

७) ह्या सॅनिटरी पॅड च्या रंगावरून डॉक्टरांना बाळ पोटात कसे आहे हे समजायला मदत होते. जर एखाद्या वेळी बाळाने आत शी केली असेल तर, निघणारे पाणी हे हिरवे - भुरे असेल जे की, सांगते की, बाळ आत चांगल्या स्थितीत नाही.

८) जर तुमची पाण्याची पिशवी फाटली असेल तर तुम्हाला दवाखान्यातच ऍडमिट व्हावे लागते. कारण योनीमधून बाळाला संसर्ग व इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.

९) ह्या ही गोष्टी त्यावेळी तपासल्या जातात. १) रक्तदाब २) शरीराचे तापमान, हृदयाचे ठोके, बाळाच्या हृदयाचे ठोके. ह्या तपासण्या कराव्या लागतात म्हणजे बाळ आत ठीक आहे. आणि आईला खूप धोका नाही. तेव्हा खूप घाबरून जाऊ नका. तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असायल्या हव्यात त्यासाठी हा ब्लॉग प्रपंच.

तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला त्याविषयी तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच द्या. 

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon