Link copied!
Sign in / Sign up
105
Shares

गर्भात असो की आईच्या कुशीत - बाळासाठी आईला स्पर्श करण्याचे महत्व

 

स्पर्श माणसाच्या भावना व्यक्त करण्याची खून आहे. ज्या गोष्टी कोणाला सांगू शकत नाही, त्या गोष्टी खूप सोप्या पद्धतीने दुसऱ्यापर्यंत पोहोचवू शकतात. जसे - जसे तुमचे बाळ गर्भात वाढते, तसे तुम्हाला पोट व नाभीला स्पर्श करण्याची इच्छा होते. आणि त्याला स्पर्श करून बाळाचे प्रेम समजून घेता येते. जेव्हा तुम्ही पोटावर हात फिरवता तेव्हा बाळाला, आई काहीतरी सांगतेय हे समजते. संशोधनानुसार सिद्ध पण झाले आहे की, आईचा कोमल स्पर्श बाळाला व आईसाठी लाभदायक असतो.

बाळाच्या जन्मानंतर त्वचेला स्पर्शाच्या अनुभूतीचे महत्व

१. बाळाच्या जन्मानंतर त्याची त्वचा जेव्हा आईला स्पर्श करते तेव्हा त्याला बाहेरचे जगाला समजून घेण्यात कमी वेळ लागतो.

२. त्यांचे शरीराचे तापमान सामान्यतः राहते.

३. श्वास घेण्यास  त्रास होत नाही.

४. अशी बाळ कमी रडतात आणि त्यांच्यात बाहेरच्या जगाला सहन करण्याची शक्ती निर्माण होते.

५. बाळाला त्याच्या आईकडे आल्यावर शांतता व स्वस्थता मिळते.

६. बाळ आजूबाजूचा आवाज, माणसं, प्राणी- पक्षी यांना लवकर ओळखण्यात तो तरबेज होतो.

७. बाळाला या स्पर्शामुळे वाटते की, त्याला कोणीतरी समजून घेतोय आणि त्याची देखभाल करतोय.

बाळाच्या स्पर्शाने आईवर होणार चांगले परिणाम

१. आईचा बाळाशी आलेल्या संपर्कामुळे आई ही स्वतंत्र व जबाबदार आई बनते.

२. आईच्या मनात बाळाविषयी आयुष्यभराचे प्रेम निर्माण होते, जे कधीच कमी होत नाही.

३.  बाळाला कोणताच त्रास व्हायला नको असे तिला नेहमी वाटते. तिला बाळाच्या शरीराला स्पर्श करण्याने तिला खूप बरे वाटते.  बाळ माझ्याचकडे व आनंदी आहे, म्हणूनच तिला बाळ नेहमी कुशीत असायला हवे असे वाटते.

४. बाळाला स्पर्श केल्यावर आईला त्याचे इशारे, मूक सूचना, त्याची भूक, सर्वच समजते.

५. बाळाच्या जन्मानंतर तासाभरासाठी तरी काहीच अडथळा येऊ न देता त्याच्या आईजवळच राहू द्यावे, त्यामुळे त्याचे व आईचे नाते जे अगोदरपासून घट्ट असते ते आणखी घट्ट होण्यास मदत होते.  

बाळाच्या वडीलांनी सुद्धा बाळाला खाऊ घालायला हवे, त्याच्याशी खेळायला हवे, आणि त्याच्या हाव-भावांचा सुद्धा आनंद घ्यायला पाहिजे. कारण हे अनमोल क्षण तुमच्या जीवनात पुन्हा येणार नाहीत. तेव्हा या इमोशनल आठवणी तुमच्या स्मृतीत कैद करा.Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon