Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

गर्भाशयातील बाळाच्या आरोग्याविषयी शरीराकडून मिळणारे सात संकेत


गर्भातील बाळाची वाढ योग्य आणि विनाअडथळा व्हावी यासाठी होणाऱ्या आईचे आरोग्य तंदुरुस्त असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तंदुरुस्त बाळाचा जन्म होण्यासाठी गर्भवतीने केवळ शारिरीक तंदुरुस्त राहणे महत्त्वाचे नाही तर मानसिक तंदुरुस्त राहणे आवश्यक आहे. बाळाची वाढ नीट होते आहे की नाही यासाठी अल्ट्रासाऊंड आणि विविध चाचण्या करुन जाणून घेता येईलच पण इतरही अनेक बाह्य शारिरीक लक्षणांमधूनही बाळाच्या आरोग्याविषयी अंदाज बांधू शकता.

सोप्या भाषेत सांगायचे तर आईचे शरीर हेच गर्भाची वाढ नीट होते की काही कमतरता आहे का याचे संकेतक आहे. गर्भातील बाळाच्या आरोग्यस्थितीविषयी जाणून घेण्यास मदत करणारे हे काही मार्ग जाणून घेऊया.

१. योग्य रक्तदाब आणि योग्य रक्तशर्करा पातळी

बाळ होऊ देण्याचा निर्णय घेताना रक्तशर्करा पातळी आणि रक्तदाब हे दोन अत्यंत महत्त्वाच्या घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. गर्भाच्या वाढीमध्ये व्यवस्थित रक्तदाब आणि साखरेची योग्य पातळी नसेल तर धोकादायक ठरते. त्यामुळे गर्भावस्थेतील तीनही तिमाहीमध्ये या दोन गोष्टींचे निरीक्षण करणे अत्यावश्यक आहे. हे दोन्ही घटक नियंत्रणात असतील तर त्याचे सकारात्मकच परिणाम पहायला मिळतात.

२. नाळ किंवा वार ची स्थिती आणि गर्भाशय

गर्भपात टाळण्यासाठी आईने नियमित वैद्यकीय तपासणी करून नाळ किंवा वार ही गर्भाशयाच्या अस्तराशी किंवा आवरणाशी मजबूत बांधली गेली आहे की नाही ह्याची खात्री करून घ्यावी तसेच गर्भातील बाळाला सुव्यवस्थित पोषण मिळते आहे ना याचीही खात्री करून घ्यावी. गर्भाशयाच्या आरोग्यावरूनही बाळाच्या आरोग्याबाबत थोडक्यात कल्पना मिळू शकते.

३. वजनात योग्य वाढ

गर्भधारणेपुर्वी आपले वजन सर्वसाधारण श्रेणीमध्ये म्हणजे प्रमाणशीर असल्यास गर्भावस्थेच्या काळात कमीत कमी १० ते १५ किलो वजन वाढले पाहिजे. जर अतिवजन किंवा स्थूल असाल तर मात्र यापेक्षा कमी प्रमाणात वजन वाढले पाहिजे. अर्थात त्यासाठी डॉक्टरी सल्ला महत्त्वाचा आहे. अर्थात बहुतेकदा गर्भावस्थेत वजन वाढणे याचा संबंर्ध तंदुरुस्त बाळ आणि तंदुरुस्त किंवा आरोग्यदायी गर्भावस्था याच्याशी लावला जातो, मात्र कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात असेल तर ती घातकच असते.

 

४. प्रोजेस्टेरॉन आणि ऑस्ट्रोजेन पातळी

 गर्भावस्थेच्या काळात सर्वच संप्रेरकांपैकी ही दोन संप्रेरके किंवा हार्मोन्स अत्यंत महत्त्वाची आहेत. गर्भधारणा न झालेल्या स्त्रीच्या तुलनेत गर्भार स्त्रीमध्ये प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक २० पट अधिक असते. मासिक पाळी थांबवण्यासाठी शरारीला एन्डोमेट्रीयमची निर्मिती करण्यासाठी ही अगदी सर्वसामान्य आवश्यकता आहे. गर्भावस्थेदरम्यान गर्भाशय मोठे होण्यासाठी ऑस्ट्रोजेनची प्राथमिक गरज भासते. गर्भवती महिला १२०० ग्रॅम ऑस्ट्रोजेनची निर्मिती करते तर गर्भवती नसणारी महिला केवळ ६० ग्रॅम ऑस्ट्रोजेनची निर्मिती करत असते.

५. पोटाची योग्य वाढ

गर्भावस्थेत पोट नैसर्गिकरित्या वाढणार असे आपण गृहितच धरतो मात्र त्यालाही काही मर्यादा असतात याची आपल्याला कल्पना नसते. पोटाची वाढ सर्वसाधारण की कमी आहे किंवा जास्त आहे ह्याचे विश्लेषण क़रण्यासाठी आपले डॉक्टर मदत करु शकतील.

६. गर्भाची योग्य वाढ

आईकडे पाहूनच गर्भाच्या तब्येतीचा किंवा आरोग्याचा अंदाज येतोच मात्र गर्भाच्या वाढीकडे लक्ष देणे ही तेवढेच महत्त्वाचे आहे. आपले बाळ आरोग्यदायी तंदुरुस्त आहे की नाही हे लक्षात येण्यासाठी अल्ट्रासाऊंड तपासणीची नक्कीच मदत होईल.

७. गर्भाच्या हालचाली

 सर्वसाधारणपणे गर्भधारणेच्या ६ ते १० आठवड्यांनंतर आईला गर्भाच्या पोटातील हालचाली जाणवू लागतात. गर्भाच्या चांगल्या आरोग्याचे हे लक्षण म्हणावे लागेल. या हालचालींचे निरिक्षण किंवा त्याकडे कशे लक्ष द्यायचे हे कळण्यासाठी डॉक्टर मदत करु शकतील.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon