Link copied!
Sign in / Sign up
5
Shares

सर्व्हिकल सर्कलेज (गर्भाशयाचे तोंड बंद करणे) : या विषयीची माहिती घेऊ


सर्व्हिकल सर्कलेज ही एक शस्त्रक्रिया आहे, या मध्ये गर्भाशयाचे तोंड शिवले जाते जेणे करून वेळेपूर्वी होणारी प्रसूती किंवा गर्भपात या सारख्या गोष्टी घडू नयेत. सर्व साधारण पणे होणाऱ्या सगळ्या गर्भधारणेच्या दहा टक्के (१०%) प्रसूती या वेळेपूर्वीच होतात. अशी मुले आरोग्य समस्यांना जसे की श्वसनाचे विकार, संसर्ग आणि शरीराचे तापमान संतुलित ठेवणे या सारख्या आजारांना अधिक प्रवण असतात. वेळेपूर्वी झालेल्या प्रसूतींमुळे साधारणपणे ७५% मुलं दगावली जातात आणि ८५% मध्ये कायमचे अपंगत्व येते.

तुम्ही गर्भवती असताना गर्भाशयाचे तोंड घट्ट बांधले जाते आणि अगदी प्रसूतीच्या वेळी ते उघडले जाते.अकार्यक्षम गर्भाशय हे असुरक्षित असते, आतमध्ये वाढणाऱ्या गर्भामुळे गर्भाशयावर खूप ताण येतो, यामुळे दुसऱ्या त्रैमासिकातच प्रसूती होण्याचे प्रमाण वाढते आणि कदाचित गर्भपात देखील होऊ शकतो. ज्या महिलांचे गर्भाशय अकार्यक्षम असते त्यांची वेळेपूर्वी प्रसूती होण्याची शक्यता ३.३ पट जास्ती असते. यामुळेच सर्व्हिकल सर्कलेज (गर्भाशयाचे तोंड बंद करणे) गरजेचे असते.

जर का खालील पैकी एक किंवा त्यापेक्षा जास्ती लक्षणे आढळून आली तर डॉक्टर सर्व्हिकल सर्कलेज करण्यास सांगू शकतात :

- गर्भाशयाची आधी एखादी शस्त्रक्रिया किंवा त्यावर आघात झाला असेल तर

- संप्रेरकांचा प्रभाव

- यापूर्वी कधी वेळेपूर्वी प्रसूती झाली असले तर

- वेळेपूर्वीच पाणी जात असेल तर

- गर्भाशयाची अनैसर्गिक वाढ झाली असेल तर

निदान :

गर्भाशय अकार्यक्षम आहे किंवा नाही याची चाचणी डॉक्टर ओटीपोटाचे चाचणी करतात त्यावेळी हातानीच करून बघतात किंवा अल्ट्रासाऊंड तंत्रज्ञायाद्वारे केली जाते. याचे निदान करताना अनुवंशकतेचा अभ्यास देखील केला जातो. गर्भाशयाचे तोंड बंद करायचे किंवा नाही हे पुढील लक्षणे बघून ठरवले जाते गर्भाशयाचे आकुंचन होणे, गर्भाशयाच्या मुखाचे प्रसरण होणे, आणि २५% किंवा त्याहून जास्ती गर्भाशयात पोकळी तयार होणे.

प्रारंभिक तयारी :

तुमची संपूर्ण वैदकीय माहिती घेतली जाते.

गर्भाशयाच्या स्थितीचे आकलन करण्यासाठी सामान्यत: ट्रांसव्हजायनल अल्ट्रासाऊंड चाचणी केली जाते.

ज्या दिवशी शत्रक्रिया करायची आहे त्याच्या आदल्या मध्यरात्री पासून कोणत्याच प्रकारचे अन्न आणि पेय घ्यायचे नाही. हे मळमळ किंवा उलटी होऊ नये यासाठी करतात.

 स्त्रक्रियेच्या २४ तास आधी लैंगिक संभोग करू नये.

आयव्ही कॅथेटर बसवले जाते यामुळे शस्त्रक्रियेच्या आधी तुम्हाला दिली जाणारी औषधे आणि आतील पाण्याची चाचणी केली जाते.

सर्व्हिकल सर्कलेजच्या पद्धती

१. शिरोडकर सर्कलेजच्या पद्धत 

या पद्धती मध्ये डॉक्टर योनी पटल बाजूला करून गर्भाशय बाहेर ओढून घेतात व त्याला चिर देतात. या नंतर त्या चीरेतून सुई आणि टेपच्या साह्याने गर्भाशय बांधतात. हे टाके गर्भाशयाच्या भिंतीतून जातात त्यामुळे ते उघडलेले नसतात. या पद्धती नंतर प्रसूती ही सिझेरियनच करायला लागते.

२. मॅकडोनाल्ड सर्कलेजच्या पद्धत 

या पद्धती मध्ये डॉक्टर सुईच्या मदतीने, योनीच्या आतल्या भागात गर्भाशयाला बाहेरून टाके घालतात. जेव्हा प्रसूतीकाळ जवळ येतो तेव्हा हे टाके काढले जातात.

३. ट्रान्सव्हजायनल सर्कलेजच्या पद्धत 

 जर का गर्भाशय खूप लहान असेल आणि वरती सांगितलेल्या दोन्ही पद्धतींचा अवलंब करता येत नसेल तर ही पद्धत अवलंबली जाते. ही पद्धत असामान्य आणि कायमस्वरूपाची आहे. या पद्धतीमध्ये, एक टेप गर्भाशयाच्या मार्गावर त्याला बांधून ठेवण्यासाठी लावला जातो. या पद्धतीचा अवलंब केल्यास प्रसूतीच्या वेळी सिझेरियनच करावे लागते.

नंतर घ्यावयाची काळजी :

वेळेपूर्वी प्रसूती कळा येऊ नयेत यासाठी तुम्हाला निग्राणी खाली ठेवले जाते.

प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) आणि औषधे सांगितली जाऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला होणाऱ्या वेदना आणि संसर्गाचा त्रास कमी होईल.

शस्त्रक्रियेनंतर काही आठवडे तरी शाररिक संभोग आणि कष्ट करू नयेत.

स्त्रक्रियेनंतर काही दिवस तुमच्या योनीतुन रक्तस्त्राव, स्पॉटींग किंवा वांब देखील येऊ शकतात.

डॉक्टर टाक्यांचे परीक्षण करून वेळेपूर्वी प्रसूती कळांसारखे काही जाणवते का याचे परीक्षण करतील.

शस्त्रक्रियेनंतर तुम्हला जर का कोणत्याही प्रकारच्या संसर्गासोबत ताप किंवा थंडी वाजून येणे किंवा योनीमार्गातून रक्तस्त्राव, वेदना, किंवा पाणी जाण्यासारख्या किंवा सातत्याने उलट्या किंवा मळमळ होणे किंवा पोट आतून आकुंचन झाल्यासारखे वाटणे किंवा वांब येणे असे काही होत आहे असे जाणवले तर लगेच डॉक्टरांची मदत घ्या. तुम्हाला स्वतःची चांगली काळजी घेणे आणि कोणत्याही प्रकारच्या मानसिक आणि शाररिक तणावापासून लांब राहणे गरजेचे आहे. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon