Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

गर्भाशयातील गर्भवाढ थांबली असण्याची ५ लक्षणे


गरोदरपणा हा प्रत्येक स्त्री च्या आयुष्यातील आनंदाचा सुखद काळ असतो. या काळात प्रत्येक स्त्रीने स्वतः ची जास्तीत जास्त काळजी घायची असते. बाळाच्या गर्भाशयातील योग्य वाढीसाठी सगळ्या प्रकारे दक्षता घेऊन योग्य आहार, व्यायाम आणि प्रसन्न मन ठेवायचे असते. प्रत्येक स्त्री हे सर्व आपल्यातून निर्माण होणाऱ्या छोट्या पाहुण्यासाठी करतच असते.

हे  सर्व करून देखील काहीवेळा गर्भाशयातील काही अडचणींमुळे गर्भ वाढण्याची प्रक्रिया थांबते. बाळ गर्भातच आजारी पडते. अशावेळी तात्काळ वैद्यकीय मदतीची गरज असते. परंतु तुम्हाला असे झाले आहे हे कसे कळणार? काळजी करू नका. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अशी ५ लक्षणे जी तुम्हाला तुमच्या बाळाच्या गर्भाशयातील सुरक्षित वाढीसंबंधी सूचना देतील.

१)  एच सिजी पातळीत घट

ह्युमन क्लोरीओनिक गोनाडोट्रॉपिन म्हणजेच एचसीजी हे एक केवळ गर्भवती स्त्रीच्या शरीरात तयार होणारे संप्रेरक आहे. याच संप्रेरकाच्या अस्तित्वामुळे प्रेग्नेन्सी टेस्ट पॉझीटिव्ह दिसते. जरी या संप्रेरकाच्या पातळीत चढ-उतार होत असतात तरी देखील एक विशिष्ठ सामान्य पातळीखाली हे संप्रेरक येणे याचा अर्थ बाळाच्या वाढीमध्ये काहीतरी अडथळा आहे. जर तुम्हास वाटले की या संप्रेरकाच्या सामान्य पातळीतील घट केवळ अंशाने देखील कमी आहे तर त्वरित डॉक्टरांना दाखवा.

 

२) हृदयाचे ठोके नसणे

बाळाच्या वाढीमध्ये समस्या असण्याचे एक सगळ्यात स्पष्ट आणि सरळ लक्षण म्हणजे बाळाच्या हृदयाचे ठोके न जाणवणे. हे ठोके गरोदरपणाच्या ९-१० व्या आठवड्यात ऐकू येणे सुरु होते आणि त्यानंतर ते अजून स्पष्ट होऊ लागतात. जर तुम्हाला हे ठोके ऐकू येणे बंद झाले तर शक्य तितक्या लवकर डॉक्टरांना भेटा .

३) अतिशय तीव्र वेदना/ कळ

पाळीमध्ये पेटका येणे म्हणजेच वेदना होणे ही बाब वेगळी आहे. परंतु गर्भावस्थेत असतांना अशाच वेदना होणे असामान्य आहे. असे झाल्यास तुमच्या पोटातील पाहुणा आजारी आहे हे लक्षात घ्या. नियमांप्रमाणे तुम्हाला गरोदर असतांना अशा वेदना वारंवार होणे असामान्य आहे. असे होत असल्यास काळजी घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने त्वरित उपचार करून घ्या.

४)  फंडल हाइट खुंटणे 

फंडल हाइट म्हणजे गर्भवती मातेच्या गर्भाशयाची प्युबिक बोन पासून वरती असलेली उंची. ही उंची डॉक्टर टेप च्या सहाय्याने मोजून घेतात. यातून गर्भाशय हा बाळाच्या वाढीनुसार वाढत आहे याची खात्री डॉक्टरांना होते. जर ही उंची गरजेनुसार किंवा अपेक्षित वाढीनुसार नसेल तर याचा अर्थ गर्भाचा विकास नीट तपासून पाहणे गरजेचे आहे.

५) गर्भाची शून्य किंवा खूप कमी हालचाल

मातेला सामान्यपणे दुसऱ्या त्रैमासिकापासून बाळ गर्भात हालचाल करत असल्याचे जाणवते. जर बाळाची हालचाल जास्त असेल तर हे एक चांगले लक्षण आहे. जर तुमच्या लहानग्याच्या हालचालींचा वेग लाक्षणिक कमी झाला किंवा हालचाल थांबली असल्याचे तुम्हाला जाणवले तर बाळ संकटात आहे. डॉक्टरांकडे जाऊन यासंबंधी योग्य उपचार करा. 

 

 

 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon