Link copied!
Sign in / Sign up
37
Shares

गर्भाशय खाली सरकणे म्हणजे काय ? प्रत्येक स्त्रीने जाणून घ्यावे

         खूपदा बायकांना बाळंतपणाच्या चांगल्या सेवा मिळत नाही आणि त्याची व्यवस्थित माहितीही मिळत नाही. बाळंतपणाच्या वेळी जर काही त्रास झालाच आणि त्यावर          काहीच उपाय केला गेला नाही. तर नंतर काही आजार होऊ शकतात. बाळंतपणानंतर बाईला विश्रांतीची गरज असते पण तीसुद्धा खूप बायकांना मिळत नाही. आणि जर ह्यावेळी पुरेशी विश्रांती त्या आईला मिळाली नाही तर काही आजार निर्माण होतात. अशा आजाराविषयी बाय  बोलत नाहीत. त्यांना बोलायची लाज वाटत असते आणि तसा वेळ किंवा संधीही त्यांना मिळत नाही. तेव्हा या आजारांवर वेळीच उपचार झाले तर त्यातून पुढे निर्माण होणारी गुतागुंत टाळण्यास मदत होऊ शकते.

  अंग बाहेर येणे म्हणजे गर्भाशय त्याच्या मूळच्या जागेवरुन खाली येणे, खालच्या दिशेने घसरणे. गर्भाशय खाली येण्याची तीन टप्पे आहेत. त्यानुसार त्या स्त्रीला जर ह्याप्रकारे लक्षण जाणवले तर......

१) पहिल्या टप्प्यामध्ये गर्भाशयाची जी पिशवी असते तिचे तोंड त्या नैसर्गिक जागेहून थोडे खाली सरकते. आणि ह्याच वेळी जोडीला ओटीपोटात रग लागणे, कंबरेत दुखू लागणे, अंगावरुन खूप पांढरे जाणे, शारीरिक संबंधांच्या वेळी जास्त त्रास होणे अशी लक्षणे आहेत. 

२) त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये गर्भाशय हे योनीमार्गामध्ये येते. यामुळे ओटीपोट खूप जड होऊन जाते. जसे काही तरी निसटल्यासारखे वाटत असते, पोट हे खालीच सुटत असल्यासारखे वाटत राहते.

मायांगामध्ये सतत काही तरी असल्यासारखे वाटते. ओटीपोटात ओढ लागल्यासारखे दुखते. मायांगावर ताण पडल्यासारखे वाटते. मांड्यांना रग लागते. अंगावरुन पांढरे जाते. शरीरसंबंध करणे अवघड जाते किंवा संबंध करताना खूप दुखते.

पहिल्या दोन्ही टप्प्यांमध्ये व्यायाम आणि औषधं घेऊन अंग मूळ जागी जायला मदत 

३) तिसऱ्या टप्प्यामध्ये गर्भाशय योनीच्या बाहेर दिसायला लागते. विशेष करुन खोकला आला किंवा दोन पायावर बसले की अंग योनीच्या (मायांगाच्या) बाहेर पडलेले दिसते. याच्या जोडीने ओटीपोटात जड वाटणे, चालताना दोन मांड्यांमध्ये काहीतरी आल्यासारखे वाटणे, ओटीपोटात आवळून धरल्यासारखे दुखणे, कंबर दुखणे, अंगावरुन जास्त प्रमाणात पांढरे जाणे आणि संबंधांच्या वेळी खूप दुखणे अशी लक्षणे दिसतात. या टप्प्यामध्ये गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करावी लागते.

४) अंग बाहेर येण्याची प्रमुख कारणे

बाळंतपणाच्या वेळी कळा यायला लागल्यावर लगेच बाईने जोर केला तर गर्भाशयाच्या स्नायूंवर ताण पडतो. गर्भाशयाचं तोंड उघडेपर्यंत जोर लावू नये. तसे केल्यास स्नायू सैल पडतात. बाळंतपण झाल्यावर किंवा गर्भपातानंतर बाईने किमान दीड महिना विश्रांती घ्यायला हवी. या काळात कोणतीही जड कामं करु नयेत. बाळंतपणानंतर लगेच कामाला सुरुवात केल्यास गर्भाशयाच्या स्नायूंवर ताण पडतो आणि त्यामुळे गर्भाशय मूळ जागी येणे अवघड होते. परंतु बायकांना अशी विश्रांती मिळत नाही त्यामुळे गर्भाशयावर ताण येतो.

लहान वयामध्ये गरोदर राहणे, एकामागोमाग एक अनेक बाळंतपणं होणं, मुलगा व्हावा यासाठी सततची बाळंतपणं किंवा वारंवार गर्भपात ही देखील अंग बाहेर येण्याची कारणं आहेत.

अनेकदा स्त्रिया आपले आजार अंगावर काढतात. असे आजार अंगावर काढू नये तर त्यावेळी तपासणी करून उपचार घ्यावेत. तुमची व बाळाची तब्येत निरोगी व सुरक्षित ठेवावी. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon