Link copied!
Sign in / Sign up
13
Shares

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबद्दल. . .

 

   गर्भाशय मुखाचा कर्करोग हा जगभरातील महिलांना होणाऱ्या कर्करोगांपैकी दुसरा सर्वांत मोठा कर्करोगाचा प्रकार आहे आणि यातून वाचवण्याचे प्रमाण केवळ ५०% पेक्षा थोडे जास्त आहे. भारतात दरवर्षी, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची १,४०,००० प्रकारे समोर येतात . आम्ही या कर्करोगाची कारणे ,लक्षणे,उपचार आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे या पासून कसा बचाव करता येऊ शकतो हे सांगणार आहोत.

-गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग कशा मुळे होतो?

 

Human papillomavirus (HPV) या विषाणूमुळे हा आजार होतो. या विषाणूंमुळे झालेल्या संक्रमणाद्वारे गर्भाशयाच्या पेशींची असामान्य वाढ होते आणि या संक्रमित पेशी शरीराच्या इतर भागात पसरतात पण सर्वच प्रकारच्या  HPV विषाणूंमुळे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होत नाही.  या प्रकारालाcervical dysplasia म्हणून ही  ओळखले जाते.

धूम्रपान, गर्भनिरोधक गोळ्या किंवा तोंडावाटे घेतली जाणारी इतर गर्भनिरोधक साधने, अनेक गर्भधारणा, HPV संक्रमित व्यक्तीसोबत शरीरसंबंध आणि अनेक जोडीदारासोबत शारीरिक संबंध हि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्या मागील काही धोकादायक घटक आहेत.

अगदी सुरुवातीला काहीही लक्षणे जाणवत नसली तरीही जसजसा कर्करोग बळावत जातो हि लक्षणे जाणवायला सुरुवात होते. प्रत्यक्षात कर्करोग हा १० ते २० वर्षे आधीच असणाऱ्या कर्करोग पूर्व अवस्थेतून विकसित होतो.

pap smear आणि यानंतर गर्भाशयाची  biopsy या तपासण्यांद्वारे या कर्करोगाचे निदान केले जाते.पु ढची पायरी म्हणजे, कर्करोग शरीरात किती प्रमाणात पसरला आहे हे तपासण्यासाठी वैद्यकीय तंत्रज्ञानाद्वारे छायाचित्र काढले जाते . याची नेमकी अवस्था माहित करण्यासाठी केल्या जाणाऱ्या इतर तपासण्या म्हणजे

Palpation, inspection, hysteroscopy, cystoscopy, x -ray छायाचित्र.

- गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लक्षणे

-भूक न लागणे

-वजन कमी होणे

-थकवा

-ओटीपोट ,पाय आणि पाठीत वेदना होणे

-पायांवर सूज

-हाडे तुटणे

-योनिमार्गाद्वारे विष्टा किंवा लघवी गळणे  

-गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा उपचार

उपचार कर्करोगाच्या अवस्थेनुसार बदलतो तरीही सामान्यपणे केले जाणारे उपचार म्हणजे:

Hysterectomy म्हणजेच अशी शस्त्रक्रिया ज्यात ओटीपोटातील लसीका गाठी काढून टाकल्या जातात आणि अंडाशय तसेच बीजवाहिका काढण्याची गरज भागू शकते. कमी त्रासदायक असणाऱ्या कर्करोगाच्या   सुरुवातीच्या १A या अवस्थेत सामान्यपणे हि शस्त्रक्रिया केली जाते.

हि शस्त्रक्रिया केल्यानंतर मूल होत नाही परंतु जेव्हा कर्करोग शरीरात अत्यंत वेगाने पसरत असतो तेव्हा शेवटचा पर्याय म्हणून या शस्त्रक्रियेचा विचार केला जातो.

या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात किमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपीचा वापर करून कर्करोगाच्या मोठ्या गाठींचा उपचार केला जातो. एखादी व्यक्तीला कर्करोगमुक्त तेव्हाच म्हटले जाते जेव्हा सूक्ष्मदर्शकाखाली चाचणी करण्यासाठी घेतलेल्या उतींमध्ये कर्करोगाच्या पेशीचे अंश आढळत नाहीत.

-प्रतिबंध

कदाचित तुम्हाला माहित असेलच कि अगदी सुरवातीच्या अवस्थेत कर्करोगाचे निदान झाले नाही तर या आजारातून पूर्णपणे सुटका होणे खूपच कठीण असते आणि यासाठीच उपचारांपेक्षा प्रतिबंध केव्हाही बरा !

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा प्रतिबंध करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे PAP SMEAR हि चाचणी नियमितपणे करवून घेणे. या चाचणीद्वारे  सामान्य पेशीचे रूपांतर कर्करोग कारक पेशींत होण्याअगोदर शोधले जाते. डॉक्टरांकडूनच हि चाचणी करवून त्याचा पाठपुरावा करा आणि त्यांच्याशी या चाचणीच्या परिणामांविषयी चर्चा जरूर करा.

HPV लस,Gardasil, हि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याची शक्यता तब्बल ९३% ने  कमी करते. सामान्यतः १९ ते २६ वयोगटातील स्त्रियांना हि लस दिली जाते आणि या कर्करोगाचे संक्रमण होण्याआधी घेतली तरच हि लस परिणामकारक ठरते. या लसीचा परिणाम किती दिवस टिकतो यावर संशोधन सुरु आहे.  याची किंमत ३००० ते ४००० रुपये आहे आणि भारतातील काही राज्ये यावर अनुदान देण्याचा विचार करत आहेत. तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करून तुम्ही हि लस घेऊ शकता का याबद्दल जाणून घ्या.

नेहमी सुरक्षित शरीरसंबंध ठेवा आणि कंडोमचा वापर करा याने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची पूर्व लक्षणे असणारे जननेंद्रियावरील चामखीळ,HIV आणि chlamydia यापासून तुमचे संरक्षण होऊ शकते.Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon