Link copied!
Sign in / Sign up
30
Shares

गर्भारपणातील आराम आणि दैनंदिन कामे

गर्भारपणात गरोदर स्त्रीला या काळात जपून राहा असे सांगतात,तसेच शरीराची हालचाल न झाल्यामुळे विविध समस्या निर्माण होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे किती प्रमाणात आराम करावा आणि किती आणि कोणत्या प्रकारची कामे शरीराची हालचाल चालू ठेवायला करावी याबाबत गरोदर स्त्रीचा नेहमी गोंधळ होतो.

गरोदरपणात किती व्यायाम करावा आणि किती किती आणि कोणत्या प्रकारची कामे करावी हे प्रत्येक गरोदर स्त्रीच्या गरोदरपणावर अवलंबून असते. काही स्त्रियांना पहिल्या काही महिने खूप जपायला सांगतात तर काही स्त्रियांना पूर्ण गरोदरपणात पूर्ण आराम करायला सांगतात. त्यामुळे याबाबतीत डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा ठरतो. तरी या काळात साधारणतःसामान्य गरोदरपण असणाऱ्या  स्त्रियांनी कोणती कामे करावी आणि किती प्रमाणात व्यायाम करावा हे आपण पाहणार आहोत. 

कोणती कामे करावी आणि करू नये. 

 

 

गरोदरपणात हलकी फुलकी कामे करायला काहीच हरकत नाही. स्वयंपाक करणे, झाडलोट करणे, भांडी घासणे अशी सहज करता येण्याजोगी कामे करावीत. गरोदरपणात जड उचलणे, ढकलणे, जास्त जिने चढणे,जड ओझी उचलणे किंवा डोक्यावरून वाहणे अश्या अतिश्रमाची व पोटावर ताण पडतील अशी कुठलीही कामे करू नयेत.

व्यायाम

 

गर्भारपणात चालण्याचा व्यायाम चांगला. ज्या स्त्रिया घरातील हलकी-फुलकी कामे करतात त्यांना विशेष व्यायामाची गरज नसते.  आवश्यकता नसते ही गोष्ट खरी असली तरी बाळंतपण सुलभ परंतु  मोकळ्या हवेत फिरायला जाणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम योगासने करवीत याचा फायदा तुम्हांला  प्रसूतीच्यावेळी होतो 

विश्रांती

 

 

 गरोदर मातेने दुपारी एखादा तासतरी आराम करावा परंतू गाढ झोपणे टाळावे. तसेच रात्री ८ ते ९ तास शांत झोप मिळाली पाहिजे. शेवटच्या काही महिन्यात गर्भाचा दाब जठारावर दाब येतो.  त्यासाठी डोक्याशी उशी घेऊन डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे दाब पडणार नाही व झोपही चांगली लागेल.
Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon