Link copied!
Sign in / Sign up
10
Shares

गर्भारपणातील समागम दरम्यानची उत्कटता स्त्रीसाठी आनंददायक असते

गर्भवती स्त्री किंवा जाणाऱ्या आईसाठी गर्भारपणातील लैंगिक संबंध किंवा लैंगिक आनंदाचे शरीराला विविध फायदे होतात. शरीराची प्रतिमा सुधारण्यासाठी, नाते संबंध सुधारण्यासाठी आणि धडधडत्या हृदयासाठीही याचा फायदा होतो. अनेक स्त्रियांचा ऑर्गाझम म्हणजेच लैंगिक आनंद मिळवणे ह्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोन दुषित असतो. अर्थात त्यात काही अयोग्य किंवा चुकीचे नाही कारण लैंगिक आनंद मिळवण्याच्या या गोष्टी विषयी अनेक समजगैरसमज, भीती यामुळे असे होते. पण लैंगिक आनंद किंवा ऑर्गाझम हा गर्भवतींच्या आरोग्यासाठी चांगली गोष्ट आहे. आपल्या डॉक्टरांशी सल्लामसलत करा आणि लैंगिक आनंद किंवा ऑर्गाझममुळे प्रसुतीच्या दृष्टीने कोणताही धोका पत्करत नाही किंवा त्यामुळे मुदतपूर्व प्रसुती होण्याचा धोकाही नसतो. गर्भारपणात एखाद्या रात्री संपूर्ण लैंगिक आनंद मिळवण्यासाठी किंवा लैंगिकतेचा परमोच्च बिंदू गाठणे हे चांगले कसे असू शकते हे खालील गोष्टींच्या आधारे समजून घेऊ. 

१. उत्तम तणाव निवारक 

लैंगिक समाधान किंवा आनंद यामुळे अॅड्रेनालाईन नावाचा स्राव निर्माण होत असल्याने तणाव लगेचच निवळतो. त्याही पुढे जाऊन आपल्याल अधिक कृतीशील आणि हलके बनवतो. लैंगिंक संबंधामुळे आपल्याला आरामही वाटतो आणि झोप चांगली लागण्यास मदत होते.

२. पोटाच्या आकारात बदल

लैंगिक आनंद किंवा समाधान मिळाल्याने पोटातील आणि गर्भाशयातील स्नायू संकुचित होतात आणि टोकदार किंवा थोडासा त्रिकोणी आकार येते. हे सर्व अगदी नैसर्गिक आहे आणि त्यामुळे जाणाऱ्या बाळाला कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा हानी पोहोचणार नाही.

३ बाळाला कृतीशील ठेवते

आईच्या लैंगिक कृतीमुळे बाळ जागे होते आणि त्याचा हालचाल होण्यास कारण मिळते. हे नक्कीच चांगले चिन्ह आहे. याचाच अर्थ असा की बाळ जेव्हा गर्भाशयात असते तेव्हा ते सजग असल्याचा हा पुरावा आहे. जेव्हा गर्भवती स्त्रीला लैंगिक समाधान किंवा आनंदाचा परमोच्च बिंदू अनुभवला जातो तेव्हा आनंदासाठी कारणीभूत असणारे एन्डोमॉर्फिन नावाचे संप्रेरक स्रवते. या संप्रेरकाच्या स्रवण्यामुळे आई आनंदी होते पर्यायाने बाळही आनंदी होते. अर्थात या सर्व गोष्टींसाठी काही ठोस पुरावा मिळालेला नाही मात्र जोडीदाराबरोबर आनंदाचा काळ घालवला तर आपल्याला गर्भारपणात आनंददायक वाटते.

४. एकमेकांमध्ये नातेसंबंध फुलतात 

 यामुळे आपले नातेसंबंध जिवंत राहातात किंवा त्यात प्राण राहतो. आपला फेरोमोन्स, ऑरा आणि आपले सुंदर शरीर हे सर्वच आपल्या पतीला अतिआकर्षक वाटू लागते. असा बंध निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारे ऑक्सिटोसिन नावाचे संप्रेरक किंवा हार्मोन्स या लैंगिक सुखाच्या परम्मोच आनंदादरम्यान स्रवतात आणि हे हार्मोन्स पतीबरोबरचे नाते अधिक विकसित होण्यास मदत करते. जणू विश्वास, भावना, सहानुभुती आणि पाठिंबा यांची एक प्रकारे मजबूत भिंत उभी क़रण्यास मदत करते. आपल्या जोडीदाराबरोबर एक मजबूत नातेसंबंध बनवण्यात मदत होते.

५ लैंगिकतेचा परमोच्च बिंदू

गर्भारपणाच्या काळात अनुभवलेला लैंगिक सुखाचा परमोच्च बिंदू हा नियमितपणे अनुभवास येणाऱ्या सुखाच्या तुलनेत काही विशेष नव्हता असे बèयाच महिलांनी सांगितले. काही महिलांना अनेकदा हा परमोच्च सुखाचा बिंदू गाठता आल्याचेही सांगितले. जेव्हा लैंगिक सुखाची अपेक्षा असते किंवा लैंगिक सुखक्रियेची मनेच्छा असते तेव्हा ओटीपोटाच्या भागात रक्ताभिसरण वेगाने होते. त्यामुळे कोणत्याही प्रकारे उत्तेजना मिळाल्यानंतर संवेदना जागृत होतात. संवेदना खूप जास्त वाढल्यामुळेही लैंगिक सुखाच्या परमोच्च बिंदूपर्यंत सहजपणे पोहोचता येते.

सावधानतेचा इशारा-

गर्भाशयातील गर्भासाठी आणि गर्भवती साठी ऑरगाझम किंवा लैंगिकतेचा परमोच्च बिंदू गाठणे सुरक्षित असले तरीही काही लैंगिक आसने किंवा स्थिती या गर्भारपणासाठी योग्य नसतात. त्यामुळे लैंगिक सुखाचा परमोच्च बिंदू गाठताना योग्य त्या सुरक्षित स्थिती किंवा आसनात आनंद लुटा. आणि त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon