Link copied!
Sign in / Sign up
32
Shares

गर्भारपणात झोप का लागत नाही आणि त्यावर काय उपाय करायचा


गर्भारपणात काही स्त्रियांना एका समस्येला तोंड द्यावे लागते आणि ती म्हणजे रात्री झोप न लागणे. काही स्त्रियांनी सुद्धा विचारले होते की, गरोदरपणात रात्री झोप लागत नाही त्यासाठी काय करता येईल. ही समस्या खूप त्रासदायक ठरते कारण ह्याचा तुमच्या आरोग्यावर व बाळावरही परिणाम होत असतो. म्हणून ही समस्या लवकरच सोडवायची. आणि दिवस पूर्ण उदासवाणा जातो जर झोप पूर्ण झाली नाहीतर. तेव्हा ह्याची कारणे समजून घेऊ.

झोप न येण्याची कारणे

१) भीती व घाबरणे - ह्या वेळी हार्मोनल बदल होत असल्यामुळे छातीत घाबरल्यासारखे वाटते, काहीवेळा रात्रीच पोट दुखायला लागते, काही स्त्रियांना वेगळीच भीती की, माझे बाळ व्यवस्थित असेल ना ! त्याला गर्भात काही झाले नसेल ना !

२) ऍसिडिटी - ह्या दिवसात खूप ऍसिडिटी होते. त्यामुळे अस्वस्थ वाटून छातीत जळ-जळ वाटते. म्हणून ह्या कुशीवरून त्या कुशीवर पडूनही झोप लागत नाही.

३) काही दुखणी - जसे की, खूप पाठ दुखणे, पाय सुजल्यामुळे, उलट्या येत आहेत असे वाटणे. व दुपारी उशिरा झोप घेतल्यामुळेही झोप येत नाही. अति चिंता व काळजी घेणे. ह्या सर्व कारणांमुळे झोप यायला अडचण होते.

गरोदरपणात झोपेमध्ये त्रैमासिकानुसार होणारा बदल

पहिले त्रैमासिक - हे दिवस गरोदर स्त्रीसाठी खूप कठीण असतात. तुम्हालाही अनुभव असेल की, पूर्ण रात्र डोळे उघडून झोपेची वाट बघत असतात तरी झोप लागत नाही. कारण हार्मोन्स मुळे खूप प्रोजेस्टेरॉनची निर्मिती होते त्यामुळे तुम्हाला वारंवार लघवीला उठावे लागते. आणि ह्याची तीव्रता खूप असल्याने तुम्हाला झोप लागत नाही.

दुसरे त्रैमासिक - ह्या दिवसात तुम्हाला थोडी -थोडी गाढ झोप यायला लागते. कारण प्रोजेस्टेरॉनची मात्रा खूप कमी झाल्याने शरीर हलके होऊ लागते. आणि लघवी जास्त येत नाही.

तिसरे त्रैमासिक - ह्यात प्रसूतीच्या कळा कधी कधी होत असल्यामुळे झोपेमध्ये खूपच अडथळा येतो. आणि ह्या कळा पहिल्यांदा गर्भ धारण करणाऱ्या स्त्रीला खूपच अडचणीचे ठरते.

झोप येण्यासाठी काही उपाय

१.१) झोप घेण्याच्या अगोदर कोमट पाण्याने अंघोळ करावी. आवडते पुस्तक वाचावे. चित्रपट पाहावा.

१.२) रात्री झोपताना पाय आणि पोटाची थोडी हलकी मालिश करून घ्यायची.

१.३) तुमचे जेवण खूप मसालेदार ठेवू नका. आणि झोप घेण्याच्या अगोदर चहा व कॉफी किंवा शीतपेय घेऊ नका. जमल्यास कैमोमाइल चहा घ्या.

१.४) सकाळी व संध्याकाळी थोडे चालणे आणि हलक्या शारीरिक हालचाली करत चला. आणि ध्यान केल्यावर खुप शांत आणि हलके वाटते म्हणून ते नियमित करत चला.

खूप महत्वाचे

संशोधनानुसार असे आढळून आले आहे की, ज्या स्त्रिया ६ ते ७ तास गाढ झोप घेऊ शकत नाही त्यांना लेबर पेन चा खूप त्रास होतो आणि सिझेरियन प्रसूतीची शक्यता वाढून जाते. म्हणून गाढ झोप होईल ह्यासाठी प्रयत्न करा. चांगली झोप तुमच्यासाठी महत्वाची तर आहेच बाळासाठी सुद्धा महत्वाची आहे.   

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon