Link copied!
Sign in / Sign up
10
Shares

गर्भारपणात चहा आणि कॉफी प्यायची का ?

मस्त गरम-गरम चहा कॉफी हे अनेक जणांसाठी जणू शरिर चालवण्यासाठीची इंधन आहे आणि ज्या कॉफी आणि चहा सारख्या उत्तेजक पेयांशिवाय राहू शकत नाहीत अश्या आयांसाठी एक वाईट बातमी आहे.

१) तोंडाला पाणी सुटणाऱ्या आणि कधीतरी मस्त आल्हाददायक वाटणाऱ्या या पेयांतील कॅफेनचे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात आणि गर्भारपणात आपल्या पोटातील बाळाच्या आरोग्यावरही त्याचे वाईट परिणाम होतात.

जर आपण गर्भवती असाल तर चहा आणि कॉफी हे तुमच्यासाठी अजिबात चांगले पर्याय नाहीत हे थोडक्यात समजून घेण्यासाठी आम्ही मदत करतो आणि जर ही पेये प्यायची असतील तर किती प्रमाणात प्यावी ह्याविषयी देखील मार्गदर्शन करु.

२) चहा किंवा कॉफी तुमच्यासाठी वाईट का?

गर्भातील बाळाचे संरक्षण नाळेमुळे होत असते ही नाळ अर्धपारदर्शक लवचिक स्नायूने तयार झालेली असते. गर्भावतीला बाळाचे विषारी पदार्थांपासून संरक्षण करीत असले तरीही कॅफेन हा असा घटक आहे जो या नाळेच्या अडथळ्यातून पार आपली वाट शोधतो.

३) यामुळे कॅफेनचा बाळावर परिणाम होण्याची शंका निर्माण होऊ शकते आणि हा पदार्थ गुंतागुंतीचा असल्याने बाळाला तो लगेचच पचवता येत नाही. यामुळे वेळेपुर्वी प्रसुती होऊ शकते आणि बाळ कमी वजनाचे जन्माला येऊ शकते.

आईला देखील कॅफेनचा दुष्परिणाम सहन करावा लागू शकतो. कॅफेनमुळे मुत्रप्रवृत्ती वाढते आणि त्यामुळे सतत शू करायला जावे लागू शकते. तसेच मूत्रविसर्जनासाठी जाणाऱ्या गर्भवती स्त्रीला अस्वस्थता येऊ शकते. त्यामुळे गर्भारपणात अस्वस्थ करणाèया गोष्टींमध्ये कॅफेनचा समावेश सर्वात शेवटी असू द्या.

४) कॅफेनच्या सेवनाची सुरक्षित मर्यादा कोणती ?

कॅफेन हा घटक फक्त कॉफीतच नव्हे तर चहा, चॉकलेट आणि सर्दी, डोकेदुखीच्या औषधाच्या गोळ्या यांच्यामध्येही कॅफिन असते. त्यामुळे या सर्व उत्पादनांचे सेवन करताना अतिशय काळजीपूर्वक करणे या काळात खूपच महत्त्वाचे असते. आपण ज्या गोष्टी विकत घेतो त्या प्रत्येक गोष्टीवर लिहिलेली माहिती वाचावी.

५) अभ्यासाअंती दिवसभरात २०० मिलिग्रॅम कॅफेनचे सेवन करणे मान्य आहे हे प्रमाण वाढता कामा नये. एक कप इन्स्टंट कॉफी किंवा दोन कप ब्रुवड कॉफी एवढ्यावरच समाधान मानावे लागेल आणि आरोग्यदायी गर्भारपणासाठी एवढ्या प्रमाणावर थांबावे लागेल. गर्भारपणात कॅफेज किंवा कॉफी बारमध्ये कॉफी पिण्याचा सल्ला मुळीच दिला जाणार कारण एस्प्रेसो आणि त्यासारख्या इतर कॉफींमध्ये २०० मिलीग्रॅमच्या मर्यादेपेक्षा कॅफेनचे प्रमाण अधिक असू शकते.

गर्भारपणात थकवा जाणवतोच पण खूप अधिक आलेला थकवा घालवण्यासाठी एक कप जास्त दुधाचा चहा घेतल्या कॅफेनचे अधिक प्रमाण टाळण्याचा सुरक्षित उपाय आहे.

६) अर्थात चहा आणि कॉफी प्रेमी असाल तर हे सर्व ऐकण्याची तुमची मनःस्थिती नक्कीच नसणार हे आम्हालाही कळते आहे पण ह्या गर्भवती असणाऱ्यांच्या सुरक्षित आरोग्यासाठीच ही माहिती दिली जाते आहे. चहा, कॉफी याच्याऐवजी फ्रुट स्मुदीजचा आनंद घेऊ शकता. या स्मुदीजमधून जाणाऱ्या आईला आणि गर्भातील बाळाच्या आरोग्यासाठीही उत्तम आहे. त्यामुळे गर्भारपणाच्या काळामध्ये बाळासाठी आणि स्वतःच्या आरोग्यासाठी या सवयींपासून दूर रहा.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon