Link copied!
Sign in / Sign up
0
Shares

गर्भारपणात ऑस्टियोपोरोसिस(अस्थिक्षय) टाळण्याचे ६ उपाय(मराठीतून)

         ऑस्टियोपोरोसिसला वैद्यकीय भाषेत ‘अस्थिक्षय’ असे म्हटले जाते. ही अवस्था सर्वसाधारणपणे वृद्ध व्यक्ती किंवा गर्भवती महिलांमध्ये पहायला मिळते. या अवस्थेत हाडे ठिसूळ आणि अशक्त होतात. आपले शरीर सातत्याने हाडांच्या उती/पेशी शोषून घेते त्या जागी नव्या उती/पेशी निर्माण होतात पण ‘ऑस्टियोपोरोसिस’ मध्ये ही प्रक्रिया मंदावते.

ऑस्टियोपोरोसिसची काही विशेष लक्षणे दिसत नाहीत मात्र हात, पाय किंवा नितंब इथल्या हाडांच्या नाजूकपणा किंवा ठिसूळपणाने प्रभावित व्यक्तींच्या लक्षणातून हे समजले आहे. अनेक लोकांमध्ये जोपर्यंत त्यांची हाडे मोडत नाहीत तोपर्यंत याची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत.

ऑस्टियोपोरोसिसच्या उपचारांमध्ये हाडांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी किंवा अशक्त असलेल्या हाडांना मजबुती देण्यासाठी औषधोपचार, आरोग्यदायी पोषक आहार आणि वजन उचलण्याचे व्यायाम यांचा फायदा होतो.

‘ऑस्टियोपोरोसिस’ कुपोषण किंवा मोठ्या शारिरीक इजेस कारणीभूत होऊ शकतो त्यामुळे भविष्यात हाडांची घनता कमी होण्याची स्थिती उद्भवू शकते.

गर्भारपणाच्या काळात ‘ऑस्टियोपोरोसिस’ विकसित होऊ नये म्हणून काही मार्ग आहेत.

 योग्य पोषक घटक आणि कॅल्शिअम चे सेवन

गर्भारपणाच्या काळात स्त्रियांनी एक वेळ नाही तर दोन वेळ व्यवस्थित जेवले पाहिजे हेच बऱ्याचजणी विसरतात. आवश्यक त्या सर्व पोषक घटकांनी युक्त असलेला आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हाडे बळकट आणि आरोग्यपूर्ण होण्यासाठी कॅल्शिअम हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो त्यामुळे आहारात कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असले पाहिजे.

 व्यायाम आणि योग

गर्भवतीने तंदुरुस्त आणि आरोग्यदायी राहणे हे खूप जास्त गरजेचे असते. शारिरीक आरोग्य आणि हाडांची रचना मजबूत राखण्यासाठी व्यायाम आणि योग ह्या दोन मार्गांचा खात्रीने वापर करता येईल. गर्भारपणाच्या नंतरच्या महिन्यांमध्ये (शेवटच्या तिमाहीत) व्यायाम करता येणार नाही कदाचित मात्र या परिस्थितीत योगअभ्यास व्यायामाला उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो.

 डी जीवनसत्वाचा पुरेसा पुरवठा

दर दिवशी १०-१५ मिनिटे हात, चेहरा पैकी त्वचेचा कुठलाही भाग अतिनील बी किरणांच्या संपर्कात आल्यास डी जीवनसत्व मिळते. दिवसाच्या कोणत्या वेळेत सूर्यप्रकाश मिळतो, जगाच्या कुठल्या भागात आपण राहातो आणि त्वचेचा रंग कसा आहे त्यावर सूर्यप्रकाशापासून किती प्रमाणात डी जीवनसत्वाची निर्मिती होते हे अवलंबून असते. डी जीवनसत्व आहारातून, पूरक आहारातून मिळू शकते. सूर्यप्रकाश, तेलकट मासे जसे सामन, सार्डीनेस आणि मॅकरेल, अंडी, लिव्हर हे खाद्यपदार्थ डी जीवनसत्त्वाचे विविध स्रोत आहेत तर काही देशांमध्ये मार्गारिन(कृत्रिम लोणी), दुग्धोत्पादने आणि सिरील्स(धान्ये) यामधूनही डी जीवनसत्व मिळते.

 एरोबिक्स आणि वजन उचलण्याचे व्यायाम

जोडीदाराबरोबर एरोबिक्स क्लासला जाण्यातही आनंद मिळू शकतो. एरोबिक्समुळे आपल्या हाडांना लवचिकता आणि मजबुती येते. रोजच्या दिनक्रमात वजन उचलण्याच्या काही व्यायामाचा अंतर्भाव करता येऊ शकतो. अर्थात वजन उचलण्याचे व्यायाम करताना प्रशिक्षक किंवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावे.

 औषधोपचार

ऑस्टियोपोरोसिसची स्थिती प्रतिबंध करण्यापलीकडे गेली असेल तर औषधोपचांराची मदत घेता येते. लवकर बरे होण्यासाठी आपल्या डॉक्टरांकडे जाऊन त्यांनी दिलेल्या औषधांचा कोर्स पूर्ण करा. ‘बिस्फॉसफोनेटस’ हे औषध ऑस्टिओपोरोसिस साठी डॉक्टरांनी सांगितलेले आहे.

ऑस्टिओपोरोसिसची वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसून आल्यास डॉक्टरांना दाखवण्यात हयगय करू नका.

 

 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon