Link copied!
Sign in / Sign up
42
Shares

या गोष्टींनी तुम्ही गर्भारपणातले आणि प्रसूतीमधले धोके टाळू शकतात

 

गरोदरपणात स्त्रीची काळजी घेणे आवश्यक असते. बऱ्याच वेळा योग्य काळजी न घेतल्याने गरोदरपणात आणि प्रसूती दरम्यान अनेक गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते.पुढील काही गोष्टींनी तुम्ही गर्भारपणातले आणि प्रसूतीमधले धोके टाळू शकतात. या गोष्टी कोणत्या ते आपण पाहणार आहोत. 

१) तुम्हाला गरोदर होऊन आता ३ महिने झाले असतील तर नाव नोंदवून घ्या.

२) धनुर्वात प्रतिबंधक लस दोन वेळा घेऊन घ्यावी. पहिल्या वेळी लस गर्भारपणाचे निदान पॉझिटिव्ह झाल्यावर लगेच घ्यावी. आणि दुसऱ्या वेळी लस पहिली लस घेण्याच्या ४ आठवड्यानंतर.

३) ऍनेमिया होणार नाही यासाठी लोहाच्या व कॅल्शियमच्या गोळ्या योग्य प्रमाणात घेत राहा. आणि त्या गोळ्या स्तनपान चालू आहे तेवढ्या वेळपर्यंत घ्या.

४) सकस आहार घ्या. सकस आहार खूप महत्वाचा आहे त्याविषयी आम्ही अगोदर बरेच लेख गरोदर स्त्रियांच्या आहारबाबतीत लिहले आहेत. ते तुम्ही आमच्या वेब पोर्टलला पाहू शकता.

५) काही समस्या आल्या असतील किंवा त्रास होत असेल. उदा. रक्तदाब वाढणे, गर्भाची हालचाल मंदावणे, अंगावरून रक्त/ किंवा पाणी जाणे, अनेमिया, वजन कमी होणे, इतर कोणताही त्रास होत असेल तर त्याचे निदान करून घ्या. आणि त्यावर उपचार करून घ्यावा.

६)  प्रसूती ही प्रशिक्षित दाई, डॉक्टर, नर्स, किंवा आशा( डिलिव्हरी करणारी प्रशिक्षित दाई) महिलेकडून करून घ्यावी. कारण प्रसूतीत ऐनवेळी येणाऱ्या धोक्यांना ही माणसं सांभाळू शकतील. आणि डिलिव्हरी करणे ही गोष्ट तितकीच गुंतागुंतीची आहे. आणि जर एखादे वेळी, गर्भ आडवा होणे, वर खाली असणे, कमरेची हाडे निरुंद असणे, अतिरक्तदाब वाढणे, अशी समस्या आलीच तर, अशावेळेस यांचा अनुभव कामास येत असतो तेव्हा याबाबत ही दक्षता घ्यावी.

७) गर्भारपणात नियमित तपासणी करत राहावी. कुठेही करा खाजगी दवाखान्यात किंवा सरकारी दवाखान्यात. सरकारी दवाखान्यातून लोहाच्या गोळ्या घेऊ शकता. 

इतर स्त्रियांनासुद्धा प्रसूती होण्यात काही अडचण येऊ नये म्हणून त्यांनाही हा लेख पाठवावा. या संबंधी आणखी माहिती पुढील लेखात देऊ. जेणेकरून तुमची प्रसुती सुखकर होईल.

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना नवीन वर्षाची एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon